संस्कार वेली (भाग ३)

संस्कार


संस्कार वेली (भाग ३)

सोहम विमानतळावर उतरला. आई, बाबा सोना तिघांनाही त्याला पाहून गहिवरून आलं. त्याच्याबरोबर एक मुलगी होती. गोरेपान, भुरे केस लांब पण सोडलेले. धावत येऊन सोहमने आई बाबांना आधी मिठी घातली. काही मिनिटं सगळेजणच मुक्याने एकमेकाशी बोलत होते. मग सोहमने आई बाबांना वाकून नमस्कार केला. तेवढ्यात त्यांचे लक्ष बरोबर आलेल्या मुलीकडे गेले.

" आई बाबा सोना ही पमी, म्हणजे परमिंदर कौर. माझी बेस्ट फ्रेंड आणि अॉफिस कलीग. ". सोहम

"अच्छा, म्हरफणून तूरफू इरफिकडे येरफेत नरफव्हतास का? (एक भाषा फक्त बोलायची). " सोना.

" ए गप मी म्हंटल ती माझी मैत्रीण आहे. आणि मराठीत बोल. तिला कळत नाही मराठी" सोहम

" चला आता आधी घरी जाऊया. मग बोलू. अजून महिनाभर तरी आहे सोहम. हो ना रे? का पळणार आहेस लगेच." बाबांनी (शौनक) विचारले.

"हो, आपण इथे इथे डोळे लावून बसलोय आणि हा जायचा पळून आठवड्यात." ऋता

"नाही आई यावेळी पूर्ण महिना रजा मिळाली आहे. मस्त एंजॉय करूया. कुठेतरी फिरायला जाऊया." सोहम

सगळी घरी पोचली. सोहमने हातपाय धुऊन आधी देवाला नमस्कार केला. आणि परत आई बाबांना केला.

" सोहू, तू म्हणतोस ही तुझी मैत्रीण, मग ही तुझ्याबरोबर इकडे भारतात कशी आली." शौनक बाबा

" बाबा अरे ती मूळ भारतीयच आहे. पंजाब मधील लुधियाना तिच गावं. आईवडील कामानिमित्त परदेशी गेले आणि इकडची नाळ तुटली. पण हिला आपल्या देशाबद्दल खूप प्रेम आहे. तिला इकडे येऊन रहायचे आहे पण अजून चान्स मिळाला नाही. मी म्हणतोही तिला गमतीने \" एखादा पंजाबी शोधू का तुझ्यासाठी." सोहम

"का? महाराष्ट्रातील कोणी नाही चालणार का?"बाबा

" माहिती नाही. पण ती खरचं खूप चांगली आहे. स्वभावाने, वागणुकीने. पण फसलीय बिचारी. एका ख्रिश्चन मुलाशी लग्न केल पण टिकल नाही. आता डिव्होर्स झालाय. त्यामुळे निराश नाही झाली पण आई वडीलांपासून वेगळी झाली. एकटेपणा जाणवतो कधीतरी म्हणते. पण हसतमुख आहे. " सोहम

"चला जेवायला" ऋताने हाक दिली.
टेबलवर पाने वाढून तयार होती. पमीसाठी खास आलूपराठे केले ऋताने पण साधे महाराष्ट्रीयन पध्दतीने. बाकी दही, लोणच, लसणीची चटणी होतीच. शिवाय दहीभातही होता. जेवण झाली पमीला सगळं नवीन होत पण ती सगळ्यात मिसळण्याचा प्रयत्न कर होती. सोना सोहम बरोबर आई बाबा पण तिच्या बरोबर इंग्रजीतून संवाद साधण्यासाठी प्रयत्न करत होते. शेवटी तीच म्हणाली मला थोडथोठ हिंदी येत. तुम्ही हिंदीत बोललात तरी चालेल म्हणून.

हळूहळू पमीही त्यांच्यात मिसळली. शौनक आणि ऋताला ती सून म्हणून ही पसंत पडली.

आई बाबांनी हा विषय काढल्यावर सोहम विचारात पडला. तिचा घटस्फोट झालाय. ती अजूनही त्याचा विचार करत असेल तर त्याच्यात गुंतली असेल तर? तर आमच्या नात्याला न्याय देऊ शकेल ती. ते सगळं विसरून मीही तिच्याशी नीट वागू शकेन का?


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे


नक्की काय चाललयं सोहमच्या मनात?
(पुढच्या भागात

🎭 Series Post

View all