संस्कार वेली ( भाग १)

पिढीतून नव्या पिढीत संस्कार पाझरत जातात


संस्कार वेली (भाग १)

"मस्त रिमझिम पाऊसधारा. उर दाटून आला. पहिल्यांदा आपण पावसात भिजलेले आठवले. शौनक ऋताशी बोलत होता. "आठवत तुला? त्यावेळी M-50 होती माझी. तू मला बिलगून मागच्या सिटवर बसली होतीस. आणि छळत होतीस. गुदगुल्या तरी कान तरी चाव. वरुन धूंद करणारा पाऊस आणि जवळ तू बेधुंद. कसातरी संयम ठेऊन गाडी चालवत होतो.".

ऋता शौनकच्या कुशीत "हो आठवतं ना. सगळं आठवत. आपण खडकवासला रोडवर होतो. तूझ्या माझ्यातलं प्रेम दुथडी भरून वाहात होत. ".
"पण किती युध्द करावी लागली, ते प्रेम पूर्णत्वाला नेण्यासाठी." शौनक.
"हं. त्यांच्या दृष्टीने आपण चुकीचे होतो. आपला आंतरजातीय विवाह त्यांना मान्य होण शक्य नव्हते. पण आपल्या हट्टापुढे नमले शेवटी. "ऋता.

"पण आज 26/27 वर्षे झाली तरी आपला निर्णय चुकलायं असे वाटतं नाही. उलट आपली मूलं किती संस्कारक्षम आहेत. व्यवस्थित शिकलेली आहेत. आपण जाती पाती ऐवजी माणुसकीची शिकवण दिलीय त्यांना." शौनक.
"पण आता मुलांच्या लग्नाच ही बघायला हवं आपल्याला.
जुळी झाल्यामुळे दोघांचे सगळं बरोबरच झालयं. आता लग्नही बरोबर\" ऋता.
" सोना लग्नच करायचे नाही म्हणते. सोहम तर तिकडचीच आणतो की काय अशी शंका वाटते मला" शौनक.
" सोनाशी एकदा बोलायला हवं. नक्की का नाही लग्न करायचं तिला?

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

सोनाला लग्न का नाही करायचे? पुढच्या भागात पाहुया.

🎭 Series Post

View all