प्रगती आज मोहितला लग्ना आधी भेटायला जाणार होती, त्यासाठी दोन दिवस खास खास dress निवडून ठेवले होते, त्यावर matching jewellery ही निवडून ठेवली होती, एक छोटासे watch, hills चे shoes ,एक scarf, आवडता perfume ,गॉगल घालून ती सज्ज होती .ती मोहितला कॅफे मध्ये भेटायला जाणार होती, gate मधून scooty काढली, एकदा तीने सहज बघायचे म्हणून, money पॉकेट तपासून पाहिले ,पैसे होते, तिला आपल्या होणाऱ्या नवऱ्याला काही खास अशी आठवण म्हणून gift घ्यायचे होते. त्याला ह्या पहिल्या भेटेची आठवण म्हणून खास काही तरी देणार होती.तिला आपल्या होणाऱ्या नवऱ्या विषयी खूप आदर वाटत होता आणि मनात त्याच्या बद्दल प्रेम ही दाटून येत होते, तिला अभिमान वाटत होता की तो इतका मोठा माणूस तिच्या नशिबात आला आहे ,तिला सुख खऱ्या अर्थाने मिळाले आहे. आता देवाकडून तिला काही नको होते.?इकडे हा खूप वेळ पहात होता, बराच वेळ होऊन ही ती आली नव्हती, आणि ती तिकडे त्याच्यासाठी gift खरेदी करत होती, हा हॉटेल मध्ये वेळे आधीच पोहचला होता.तो तिथे बराच वेळ झाल्या नंतर तो आता चिडला होता, तिला फोन न करता तो तिथून निघून गेला होता. त्याला एकाही वाक्याने तिला कळवावे ,किंवा विचारावेसे वाटले नाही की ती कुठल्या अडचणीत तर सापडली नाहीस ना, किंवा तुला इतका वेळ का लागत आहे. मी निघालो आहे, वाटल्यास उद्या भेटू. ह्या त्याच्या वागण्याचा एकेरी बाणा लक्षात घेता तो एक अती शिष्ट आणि उद्दट मुलगा वाटत होता.मोहित अती लाडावलेला आणि एकुलता एक मुलगा होता, त्याला मागेल तेव्हा आई वडिलांनी सगळे उपलब्ध करू दिले होते, नकार ऐकण्याची त्याला सवय नव्हती, त्याच्या वस्तू कोणी वाटून घ्यायला भावंड ही नव्हती म्हणून त्याला, प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा ,त्याग ह्या नाते टिकवून ठेवणाऱ्या गोष्टी माहीतच नव्हत्या. buisness करतो म्हटल्यावर वेळेचा ही पक्का होता, त्यात त्याला आपलेच खरे कसे हे तो नेहमीच मानत होता.ह्या buisnessच्या पसाऱ्यात आणि भागदौड मध्ये इतका माहिती झाला होता की, त्याला इतर buisness मधील आणि आपल्याच सहचाऱ्या वर ही संशय घेण्याची वाईट खोड लागली होती . तो प्रत्येकाला त्याच संशय नजरेतून पहात असत. त्यात आता प्रगती त्याच्या आयुष्यात आली होती. एक खूप आदर्श मुलगी जी त्याला आवडली होती दिसायला ही छान, चार चौघात घेऊन गेले तरी लाज वाटणार नाही बायको म्हणून सांगण्याची ,असे त्याचे मत होते. त्याचे पैश्याने स्थान मोठे होते, नावलौकिक होते तरी तो माणूस म्हणून प्रगतीच्या लायकीचा नव्हता.इकडे प्रगती हॉटेल वर पोहचली होती, त्याचा सगळीकडे शोध घेत होती, तिने हॉटेलच्या staff कडे ही विचारणा केली होती, ती त्याच्या खरेदीमुळे आधीच खूप दमली होती, सकाळपासून तिने अन्नाचा एक कण ही खाल्ला नव्हता फक्त ह्या क्षणाच्या आनंदात. तिला वाटले त्याला यायला वेळ आहे, म्हणून तिनेच त्याला फोन केला, त्याला विचारले सगळे ठीक आहे ना, काही problem तर नाही झाला ना तुझ्यासोबत, कुठे आहेस, येणार आहेस की नाही ,? मी वाट बघत आहे इथे ठरलेल्या हॉटेल मध्ये.मोहित, तिला सांगतो, "अग मी तुझी वाट पाहिली आणि निघून आलो, मला जास्त वेळ कोणाची वाट पाहायला आवडत नाही मग ते कोणी किती ही महत्वाचे असो . माझ्यासाठी माझा buisness first मग इतर. तू आता निघून जा घरी बघू परत कधी "हे त्याचे शब्द ऐकल्यावर ती नाराज झाली होती, खरे तर ती आली होती वेळेवर ,त्यात तिची चूक नव्हती, पण हा गेल्याचे ही त्याने तिला सांगितले नाही, ना तिची साधी विचारपूस ही केली नाही.? तिला खूप वाईट वाटले होते, त्याचे तोडून बोलणे, कुठे तरी आपण ह्या नात्यातून जास्तीच्या अपेक्षा तर करत नाहीत हे कुठे तरी मनात आले होते, कुठे तरी वाटत होते ,हे नाते आपण विचार करत आहोत त्यापेक्षा खरंच योग्यतेचे आहे हे तिला वाटू लागले होते. तिला तिने खास पहिल्या भेटीसाठी आणलेले घड्याळ चांगलेच लक्षात राहीले.मागचा अनुभव असा मिळाला होता तरी तिने त्याला मोठ्या मनाने माफ केले होते, ती त्याला फोन करत पण त्याने कधी भेटण्याची तारीख सांगितली नव्हती. पण एकदा त्याने तिला त्याच हॉटेल मध्ये भेटायला बोलवले, time त्यानेच ठरवला होता .ती ठरलेल्या वेळी आवरून छान नटून बाहेर पडली होती ,अगदी वेळेवर न चुकता ती तिथे हजर होती, एक table बुक केला होता तिथे ती बसून होती, खूप वेळ झाला तरी तो मात्र आला नव्हता. तिने मागच्या वेळी जशी अधीर होऊन वाट पाहिली होती तशीच आजही ती वाट पहात होती.हॉटेल मध्ये बसलेली असतांना तिथे तिचा college मधील मित्र तिला भेटतो ,खूप दिवसांनी तो दिसला म्हणून त्यांच्या collegeच्या आठवणी काढतात, इकड्या तिकडच्या गप्पा होता, तितक्यात मोहित ही मागून येतो, पण तिला तो आलेला माहीत होत नाही,त्यांच्या किती तरी वेळ गप्पा चालूच असतात, आणि हा त्यांना मुद्दाम त्रास नको म्हणून आणि तो नेमका प्रगतीचा boy friend तर नाही हे जाणून घेण्यासाठी झाडामागून त्यांच्यावर नजर ठेवत असतो.अचानक तिला कोणी तरी लपून पहात असल्या सारखे दिसले, जणू मोहित सारखी आकृती होती..तिने संशय आला म्हणून त्याला फोन केला, आणि आश्चर्य काय तो लपून बघणारा दुसरा कोणी नव्हता, तो मोहीतच होता,पण त्याला कळले नाही काहीच असे तो वागत होता आणि त्या झाडामागून तो बाहेर पडला. तिने ही त्याची चोरी पकडली आहे हे त्याला भासवू दिले नाही.पण तिला त्याचा हा विक्षिप्त स्वभाव आज मुळीच आवडला नाही, जणू तो तिच्यावर पाळत ठेवून असतो, जणू त्याला तिच्या वागण्यावर संशय येतो अश्या प्रकारचे त्याचे वागणे होते. तिने आता प्रेमवेडी ही भूमिका न अंगीकारता शहाणपणाचा मार्ग अवलंबला होता ,आता तिला त्याचे विक्षिप्त वागणे खटकत होते, वेळीच थांबले नाही तर आयुष्याचे सगळेच गणित बिघडणार हे तिला वाटु लागले होते. तिने त्याला आता नकार द्यायचे ठरवले होते.लगाच्या आधीच होणारा नवरा संशय घेणारा असेल तर मग असला नवरा लग्नानंतर किती संशयी असू शकेल हा विचार लग्नानंतर करण्याची संधी ही मिळणार नसते, एकतर त्याला आहे तसे स्वीकारन रोज तोच त्रास सहन करायाची तयारी ठेवावी किंवा आताच न जमत असलेले लग्न मोडावे.?ती घरी आली तेव्हा मनावरचा एक ताण कमी झाल्यासारखे तिला वाटत होते, आज जर तिने त्याला अंध प्रेमात होकार दिला असता तर किती मोठी किंमत तिला चुकवावी लागली असती हे वाटत होते .ह्याच प्रेमासाठी ती आपले सर्वस्व पणाला लावायला निघाली होती पण वाचली ह्यात तिला समाधान वाटत होते आणि त्या मुलींसाठी वाईट वाटत होते ज्या त्याच्या दिखाव्याला भाळतील आणि लग्नाला ही तयार होतील.? जसे मी सुखरूप त्या जंजाळातून निघाले तशी देव त्यांना ही बुद्धी देवो हे मागणे ती मागत होती.
स्त्रीने एकवेळ पुरुषांच्या, नवऱ्याच्या सगळ्या चुका माफ कराव्यात पण संशय जर घेत असेल तर ती चूक नसून तुमच्या चारित्र्यावर घेतलेला आळ आहे,ज्याला वेळीच आळा घालावा, नाहीतर नात्याला तरी .असल्या नात्यात काही एक भविष्य नसून ते वेळीच तोडलेलेच बरे असते.
©️®️लेखन चोरी हा गुन्हा आहे आणि तो शिकल्या सवरलेल्या, वैचारिक लोकांनी व कोणी ही जाणून बुजून केल्यास त्याला कायद्यान्वये शिक्षेस पात्र ठरविण्यात येईल, लेख लिहितांना शक्यतो आपलेच विचार, theam line मांडावी, इतरांची चोरु नये ,समजदारास सांगणे न लागे.?* सदर नियम हे फक्त समजदार चोरास लागू आहेत.☺️जे मांजरासारखे डोळे मिटून दूध पीत असतात.