संसाराची रेसिपी संसार हा सुखाचा होत नसतो तो करावा लागतो. संसार हा एकट्याने होत नाही, त्याला विश्वासाची जोड लागते. वरण भात पोळीबरोबर लोणच्याची ही फोड लागते. साहित्य :- २ वाट्या सहनशीलता, १ चमचा मस्करी, ३ लिटर आपुलकी, चिमूटभर अबोला,१ वाटी प्रोत्साहन, २ मोठे चमचे विश्र्वास, थोडासा मोह आणि चवीपुरते भांडण. कृती :- प्रोत्साहन व विश्वास निवडून त्यातील मस्तर व रागाचे खडे निवडून घ्या. आता त्यामध्ये सहनशीलता मिसळून बारीक वाटावे नंतर मोहाची कढई गरम झाली की त्यात आपुलकी ओतावी मंद गतीवर मोठ्या प्रेमाने व समाधानाने उकळावे. चांगली उकळी आल्यानंतर त्यात थोडे चवीपुरते भांडण टाकावे , वरुन चिमूटभर अबोला टाकून चांगला खरपूस हा पदार्थ करावा व मस्करीचा मसाला टाकावा व घरातील सर्वांना हा पदार्थ वाढवा. क्षमा करा हा पदार्थ आमच्याकडे मिळत नाही प्रत्येकाने आपापल्या घरी जाऊन हा पदार्थ करावा खूप रुचकर लागतो . कारण हा पदार्थ आहे संसार... प्रत्येकाची चव थोडी ज्याच्या त्याच्या पद्धतीची असू शकते कधी आंबट तर कधी गोड. म्हणून म्हणतात "अरे संसार संसार...जसा तवा चुल्ह्यावर.. आधी परिस्थितीचे चटके ... नंतर समाधानच हसू...". स्वस्थ राहा. मस्त खा.