संसाराची दोन चाके

कथा एका जोडप्याची

संसाराची दोन चाके..




"अनिश, थोडे पैसे ठेवून जा ना.."
" आता तर दिले होते ना तूला पूजा.. सतत कसे ग पैसे लागतात? तुला काय वाटते पैशाचे झाड आहे का? पैसे तोडून आणले आणि दिले.. तू पण ना.."
" हे एवढे बडबडायच्या आधी फक्त एकदा विचारायचेस ना कशासाठी हवे होते.." पूजाच्या डोळ्यात पाणी होते.
" झाली नाटके सुरू.. सांग पटकन."
" गेले दोन दिवस निमाला ताप आहे. डॉक्टरांकडे नेले होते.. त्यांना थोडा डाऊट आहे म्हणून त्यांनी सगळ्या टेस्ट करायला सांगितल्या आहेत.. आणि तू जे पैसे दिले म्हणतो आहेस ना ते एक तारखेला दिले होतेस.. आज पंचवीस तारीख आहे.. आणि त्या दिलेल्या पैशातच मी ताईंच्या दिराला आहेर केला होता.. आणि दोनदा मुलांना फिरवून आणले.."
" निमाला ताप आला हे बोलली नाहीस मला.." अनिशचा आवाज थोडा नरमला होता..
" काही सांगायला तू घरात होतास का? तुला ऑफिसमध्ये फोन करायचा नाही. तुला सकाळी काही सांगायचे नाही. रात्री तू उशीरा येतोस मग प्रश्नच नाही.."
" आताही नको.. आणि एवढी सकाळी कटकट करण्यापेक्षा तुझ्या अकाउंट मधले वापरले असतेस तरी चालले असते.." अनिशने निघताना टोमणा मारलाच.
" कोणते पैसे अनिश?"
" तुझा पी. एफ."
" काम करून तुझ्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला आहे बहुतेक.. मला जेव्हा नोकरी सोडावी लागली त्याचवेळेस तुमचे गावचे घर नव्याने बांधायचे ठरले. तेव्हा तूच म्हणालास ना, बँकेतून कर्ज घेण्यापेक्षा तू दे.. मी थोडे थोडे परत देतो. अजून एक रूपयाही आलेला नाही.. जाऊ दे.. जा तू.. मी बघेन माझ्या मुलीसाठी कसे पैसे आणायचे.. लठ्ठ पगाराची नोकरी ओवाळून टाकली तिच्यावरून.. मग काय हे औषधाचे पैसे नाही जमा करू शकणार?"


अनिशच्या या वागण्यावर काय घेईल पूजा निर्णय? बघू पुढील भागात.  तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा



सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all