संसार वेल ( भाग 5)

Marriage Life

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

विषय- कौटुंबिक कथा
कथेचे नाव- संसार वेल ( भाग 5)

रिया- रोहीत हळू-हळू लहानाचे मोठे होत होते. त्यांचे बालपण ही आनंदात जात होते. रिया आठवीला असताना खूप आजारी पडली होती. नितीन व नयनाने दिवस-रात्र एक करून त्या संकटाला तोंड देऊन तिला त्या आजारातून बाहेर काढले होते. 

" रिया थोडी जरी आजारी पडली तरी ही मनात अगदी धस्सं होतं. नाही का नितीन ", ती त्या विचाराच्या तंद्रीतून बाहेर येत बोलत होती.
" हो, मला ही तो प्रसंग अजून डोळ्यासमोरून जात नाही. आपण दोघांनी हिमतीने तिला बरं केलं होतं. पण खरं सांगू का नयना, मी तेव्हा आतून खूप खचलो होतो. पण तुझ्यापुढे मी खंबीर आहे असा भासवत होतो ", तो नयनाकडे पाहत म्हणाला.

"  माझी ही तीच अवस्था होती नितीन, खूप कठीण प्रसंग आपल्यावर आला होता पण आपण त्यातून सही सलामत बाहेर पडलो ", ती सुस्कारा टाकत बोलली.

" नको त्या कडू आठवणी , न आठवलेल्याच बऱ्या. चल , आपण थोडासं बाहेर फेरफटका मारून येऊ या. मुलांनाही सोबत घेऊन जाऊ ", असं म्हणत तिने रोहित- रियाला आवाज दिला.

ते दोघे कधी ही बाहेर जाण्यासाठी तयारच असत. 

नितीनही मग मूडमध्ये येऊन मुलांशी बोलू लागला " मग कुठे जाऊया आपण ?"

मुलांना बीचवर जाण्याची इच्छा होती. पण पावसाचे दिवस असल्याने नयनाने,' आपण पिक्चरला जाऊया ' असे सुचवले.

रोहितला मात्र एका ठिकाणी बसून राहणे खूप जीवावर यायचे. 

" पिक्चर चा प्लॅन असेल तर मला नको. मी घरी गेम खेळत बसेन", रोहित खाली बसत बोलला.

पण नयनाचा अट्टाहास असायचा की सोबत मुलांना घेऊनच बाहेर फिरायला जायचे. ती शक्यतो क्वचितच मुलांना एकटं घरी सोडत असे. 

" ठीक आहे.  तुम्ही ठरवा . तुमच्या प्लॅननी आपण जाऊ ", नयना रोहित जवळ येत बोलली.

तसा रोहित खूश झाला.

" आपण शॉपिंगला जाऊ या. तिथून पुढे पार्कमध्ये फिरू व नंतर लॉंग ड्राईव्ह ला जाऊ या. काय म्हणतो रोहित, प्लॅन कसा आहे ?" रिया ने आपला मोर्चा रोहित कडे वळवला.

रोहितला लॉंग ड्राईव खूप आवडत होते पण ते नाईटला. शॉपिंग त्याला कंटाळवाने वाटायचे. 

सर्वांनू मते रियाचा प्लॅन फॉलो करायचे ठरले.

सर्वजण तयार होऊन घराबाहेर पडले. नितीन सतत फोनवरच असायचा . त्याचा कंपनीचे कॉल्स घेण्यात तो व्यस्त असायचा. पण नितीन व नयनाचे आयुष्य मात्र मुलांच्या सभोवती च फिरत असायचे. त्यामुळे ते नेहमी मुलांना वेळ देत असत व मुलांकडे लक्ष ही ठेवत.

" मला खूप सारे टॉप्स व जीन्स घ्यायची आहे. मॅचिंग इयरिंग्स , सँडल्स ,मेकअप किट पण घ्यायचे आहे. सो सगळ्यांनी पेशन्स ठेवा. तिथे गेल्यावर गडबड करायची नाही. नाहीतर मग सरळ घरी निवांत झोपा काढू " रिया ने आईकडे कटाक्ष टाकला.

रिया ची लिस्ट ऐकून सगळ्यांनी फक्त माना डोलावल्या व मंद स्मित केले. कारण तिची शॉपिंग म्हणजे अख्खा दिवस जातो हे सगळ्यांना ठाऊक झाले होते. तरीही तिच्या हट्टापाई सगळेजण तिच्या सोबत राहत होते. 

ती शॉप मध्ये शॉपिंग करते तोपर्यंत हे तिघेही आपआपले शॉपिंग आजूबाजूच्या शॉप मध्ये करत बसायचे. त्यामुळे त्यांचा वेळ जात होता.

" रिया आटप पटकन. गेले तीन तास झाले तुझी शॉपिंग काही संपता संपत नाही. रोहित वैतागलेला आहे. आम्हां तिघांचीही शॉपिंग संपली. आमचे तिघांचे मिळून जेवढे बजेट झाले तेवढे फक्त तुझ्या एकटीचे झाले. थोडसं ऍडजेस्ट करायला शिक " नयना तिला समजावत होती.

रिया ने पटकन आपला हात आवरता घेतला व ते सगळेजण मॉलमधून बाहेर पडले. 

रिया मात्र खूश होती कारण तिने तिच्या मनासारखी शॉपिंग केली होती. रोहित ने ही शॉपिंग केली होती पण त्याला खूप आनंद झाला असे नव्हते. 

मुली ह्या छोट्या -छोट्या गोष्टींनी खूप आनंदी होत असतात. 

सगळेजण पार्कमध्ये एक -दोन तास मनसोक्त फिरत होते. स्नॅक्स ही खाऊन फस्त केला होता. 

" मम्मा आज डिनर आपण बाहेरच करणार आहोत का?" रियाने नयनाला विचारले.

" म्हणजे तुला भूक आहे? " तिच्याकडे डोळे मोठे करत ती बोलली.

" मम्मा, शॉपिंग करून मनाचं समाधान होतं पण पोटाचं काय ?" रिया केवीलवाने चेहऱ्याने तिच्याकडे पहात बोलली.

सगळेजण मात्र तिच्या या परिस्थितीचे हसू करत होते. आता मात्र तिचा चेहरा रडवेला झाला होता. 

नितीनने यातून मार्ग काढला. 

" हो , आपण डिनर व लॉन्ग ड्राईव्ह करूनच घरी लेट जाणार आहोत . सो जस्ट चील" नितीन नयनाकडे पहात बोलला.

नयनाला हे अपेक्षितच होते. 

" माझ्या आवडीचे रेस्टॉरंट असेल फक्त वेळ तुम्ही सांगा ", तो म्हणाला.

रोहितला मात्र जेवणामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. त्याचे डोळे फक्त रस्त्याकडे लागले होते. त्याला ड्रायव्हिंग शिकायची होती व त्यासाठी तो धडपडत होता. 

" डॅडी , डिनर चे नंतर बघूया. आपण सध्या आपल्या लोकेशनला तर पोहोचू. चला- चला पटकन कार मध्ये बसा " , असे म्हणत रोहित कारकडे निघूनही गेला. 

रिया ही त्याच्या मागे धावत सुटली.

" आपली मुले कधी मोठे झाली , कळाले ही नाही. आपल्या- आपल्या आवडीनुसार सगळेजण मनसोक्त आनंद लुटतात ", नयना कौतुकाने बोलत होती.

 " बरंय , निर्णय घेण्यामध्ये ते सक्षम झाले आहेत. आपल्याला काही टेन्शन नाही" , असे म्हणत नितीन ने ही दुजोरा दिला.

सर्वजण कार मध्ये बसून लॉन्ग ड्राईव्ह ला निघून गेले. 

" आत्ता आठ वाजले आहेत तर मला डिनर चा टाईम सांगा जवळपासच्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये कार थांबवेन ", नितीन ने आपली बाजू क्लिअर करून टाकली.

" साधारणतः अकरा वाजता आपण डिनर करूया. चालेल", रोहित म्हणाला.

सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या.

वातावरण मस्त छान होते. बाहेर पावसाचे वातावरण होते पण पाऊस सुरू नव्हता. मंद वारे वाहत होते. सगळेजण मस्त म्युझिक व ड्राईव्ह चा आनंद घेत एन्जॉय करत होते. 

डिनर करून परत ते तिथून रिटर्न घरी पोहोचायला पहाटेचे दोन वाजले होते. सगळेजण अजूनही फ्रेश वाटत होते. चौघांनाही सुट्टी सोबत एन्जॉय करायला आवडत असे. 

घरी आल्यानंतर प्रत्येक जण फ्रेश होऊन आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. उद्यापासून सगळ्यांचे रुटीन आपापले सुरू होणार होते. 

आजची सुट्टी म्हणजे त्यांची एक एनर्जी होती उद्याच्या कामासाठी.

समाप्त

नाव - सौ. ज्योत्स्ना लोकप्रिय गायकवाड
टीम-  सोलापूर


🎭 Series Post

View all