संसार न सुटलेल कोड...

संसार.,

संसाराचं न सुटलेल कोड.....                                                       अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर.. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर.........संसाराच्या नावाखाली दोन वेगवेगळी माणसं एकाच घरात राहायला सुरुवात करतात. 'ती एकत्र आहेत' असं नाही म्हणता येत. दोन वेगेवेगळी मनं. दोघांचे विचार वेगवेगळे .मतं वेगवेगळी. आवडी निवडी वेगळ्या. होमकुंडासमोर हार घातल्या घातल्या स्वत:ला समोरच्याच्या हवाली करायचं, सात वचने घ्यायची व ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायाचा.                                                           लहानपणा पासूनच्या सगळ्या सवयी एका क्षणात परक्या करायच्या. त्याग, समजूतदारपणा हे सगळं मोठं मोठं क्षणात समजून घ्यायचं. इतकं सोप्पं असतं का हे सगळं ? पण करणं भाग असतं. 'संसार' हा विस्कटलेल्या पसाऱ्यासारखा असतो. थोडं देऊन थोडं घेऊन सगळं गोळा करावं लागतं. हरवलेलं शोधावं लागतं आणि लपवलेलं मिळवावं लागतं. समोरचा नेहमीच चुकीचा कसा असू शकेल? संसारासाठी मनं शांत हवी. समोरच्याचं म्हणणं ऐकून घेण्याची हिंमत हवी, धीर हवा. भांडायला बहुतेक सगळ्यांना जमतं, मांडायला नाही जमत. भांडलं कि तुटतं अन् मांडलं कि एक जोडत.                                                                                खरचं संसार हा एकाच्या जोरावर नाही चालत त्याला दोन्ही बाजू भक्कम असाव्या लागतात... कधीकधी रागाने तर कधी प्रेमाने एकमेकांना समजून घ्यावे लागते... एकाची चूक असेल तर ती दुसऱ्याने सावरावी लागते...एकमेकाच्या हातात घेऊन,कधी आबंट गोड होऊन आलेल्या परिस्थितीचा हसतमुखाने सामना करावा लागतो याचे नाव संसार....