Oct 24, 2021
कथामालिका

संसार हा सुखाचा...! ( भाग 11 )

Read Later
संसार हा सुखाचा...! ( भाग 11 )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


आईंची घुस फुस चालूच होती.बाबा तसे वरवर शांत होते पण मनातून थोडेसे दुखावले गेले होते.आई आडून आडून आठवण करून द्यायचा प्रयत्न करत होत्या पण अनिता आणि प्रिया जाणून बुजून विषय टाळत होत्या.
" मुलांनो उद्या शॉपिंग ला जायचं आहे तुम्हा सगळ्यांना कपडे घ्यायचे आहेत...आजिबात किर किर करायची नाही.सकाळी ब्रेकफास्ट झाला की निघायचं एक दिवस नाही खेळलात तर काही बिघडत नाही समजलं ? उद्या कोणाचं नाटक नकोय मला " मुलांची शॉपिंग च्या वेळी नेहेमीच चालणारी कुर कुर चांगलीच माहिती असल्यामुळे अनिताने आधीच मुलांना दम दिला .खेळणं सोडून शॉपिंग ला यायला मुलं नेहेमीच कंटाळायाची .पण आता पर्याय नव्हता...
" आई बाबा तुम्ही बोर व्हाल आणि दमाल उगीच , त्यामुळे घरीच थांबा.आम्ही दोघी मुलांची शॉपिंग उरकतो आणि मग हवं तर तुम्ही या तिकडे मग तुमचेही कपडे घेऊन टाकू मुंजीचे . की आम्हीच करू तुमची खरेदी ? "
" अहो ताई आताच तर नवीन कपडे आणले ना आम्ही आई बाबांना ते छान आहेत ना ...आणि गेल्या महिन्यात सुद्धा आईंसाठि एक छान साडी आणली होती तिचीही घडी अजून त्यांनी मोडली नाहीये ती आणायला सांगता येईल विनयला. आणि बाबांचे सुद्धा बरेच नवीन कपडे पडून आहेत घरी ते आणता येतील ना...काय करायचे आहेत अजून कपडे... बघा म्हणजे तुम्हाला हवे असतील तर घेऊ अजून पण उगीचच वायफळ खर्च करू नका असं आई बाबाच म्हणतात नेहेमी ....हो ना आई , बाबा " प्रियाने अगदी वर्मावर बोट ठेवले . आईंची अगदी वाचाच बसली...
\" आपलेच बोल आपल्याला सूनावतेय ही कालची मुलगी ? पण आता गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता... हीचं ठीक आहे पण आपली स्वतःची पोर सुद्धा यात सामील झाली...इतका खर्च करतायेत पण आई बापासाठी थोडासा खर्च करायला तयार नाहीत ही मुलं...\" आई मनातल्या मनात घुसफुसत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत गप्प राहिल्या...! आणि म्हणाल्या ,
" मुंजीसाठी मुलांना आणि तुला , जावई बापूंना कपडे घ्या तुमच्या आवडीचे आमच्याकडुन...आम्ही आलो असतो पण तुम्ही नको म्हणताय ना आणि आमची पसंती तुम्हाला लोकांना काही आवडत नाही...अहो पैसे द्या ! सिद्धीला पण घे तिला आवडेल तसा ड्रेस..."
" ताई जरा जास्तच बोलले ना मी , असं कधीच बोलले नव्हते आईंशी यापूर्वी...किती वाईट वाटलं असेल त्यांच्या मनात...देवा मला माफ कर..." प्रियाला आपल्या बोलण्याची खूप लाज वाटत होती...
" नाही ग इतकं काही नाही , आपल्याला इतकं नाटक करावच लागेल नाहीतर सरप्राइज ची मज्जा कशी येणार " अनिताने हसून प्रियाला टाळी दिली.
दुसऱ्या दिवशी अनिता आणि प्रिया मुलांना घेऊन शॉपिंग ला गेल्या...अनिताने मुलांना विश्वासात घेऊन सरप्राइज बद्दल सगळं सांगितलं आणि हे एक सेक्रेट आहे त्यामुळे आजी आजोबांना काहीच समजणार नाही असं वागा म्हणून वचनही घेतलं ...
मुलांना खूप आनंद झाला... नेहाच्या डोक्यात एक कल्पना आली..." आपण सगळ्यांनी मस्त परफॉर्म करूया आणि आज्जी आजोबांना खुश करूया एकदम " सगळ्यांनाच तिची कल्पना खूप आवडली !
" तुम्ही मुलं करा परफॉर्म आम्हाला नाही जमणार बाबा , अनु ताई तुम्हीही छान करता डान्स . तुम्ही आणि भाऊजी सुद्धा करा मस्त " प्रिया म्हणाली...
" नाही नाही आपण सगळ्यांनी मिळून करायचं परफॉर्म " मुलं हटूनच बसली...
" प्रिया अगं असं काय करतेस , खरंच आपण करूया ना सगळे मिळून...फार काही नाही साधसच काहीतरी करु पण हो म्हण तू...मी विनयला आणि सुजयला पटवते..." आता मात्र प्रियाचा नाईलाज झाला आणि तिने होकार दिला...
" मम्मा माझी डान्स टीचर आहे ना ती देईल आपल्याला तयारी करून..आपल्या घराजवळ तर राहते...तू बोल तिच्याशी .ती असे खुप परफॉर्मन्स बसवते नेहेमी..." नेहाने आईला योग्य सल्ला दिला
" हो असच करूया...जातानाच जाऊया तिच्याकडे...प्रॅक्टिस पण झाली पाहिजे आपली...घरी आई बाबांसमोर कसं जमणार पण ? काहीतरी विचार करावा लागेल..." अनिता म्हणाली
मुलांची मस्त शॉपिंग झाली...तिघांनीही सारखे कपडे खरेदी केले.नंतर मस्तपैकी आईस्क्रिम चा फडशा पाडून वरात निघाली...सगळे घरी न जाता नेहाच्या डान्स टीचर गीता मॅम कडे गेले...
गीता एक मस्त मुलगी होती...अनेक गोष्टी सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकवन्याची कला तिच्याकडे होती.प्रत्येकाला आपल्या कुवतीप्रमणे शिकवून पण तरीही त्यात एक छान आणि वेगळा टच देऊन प्रत्येक इव्हेंट अगदी थाटात करण्यात तिचा हातखंडा होता...अनिताने तिला सगळं सांगितलं...\" कोणालाच कधीच अनुभव नाहीये , पहिल्यांदाच परफॉर्म करायचं ठरवलं आहे आणि विनय इथे नाही पण त्यालाही सोबत घ्यायचय \" हे तिने आवर्जून सांगितलं... तसच घरी काहीच प्रॅक्टिस शक्य नसल्याचं सुद्धा सांगितलं...
" मी करते काहीतरी विचार...तुम्ही सगळे उद्या या...मी दोन तीन परफॉर्मन्स सुचवते मग फायनल करूया...जमल्यास तुमच्या मिस्टरानाही घेऊन या म्हणजे सगळ्यांना एकदमच समजावता येईल..." गीता मॅम म्हणाल्या...
\" उद्या संध्याकाळी सात वाजता येतो \" असं म्हणून सगळी मंडळी घरी आली.
" आलात का ? झाली का खरेदी ? बघू बघू...हे काय चार चार ड्रेस प्रत्येकाला ? इतके कशाला घेतले ? मुंजीला एकच पुरे ना आणि इतके ढीगभर कपडे पडून आहेत घरात , लहान होतात लगेच ....उगीच वायफळ खर्च करता तुम्ही..." आजही आई बाबांसाठी काहीच आणलं नाही याची खंत त्यांना होतीच...
" आज्जी आजोबा हा बघा हा ड्रेस मी मुंज झाल्यावर घालणार आणि हा आहे ना तो तुमच्या..." छोटा यश काहीतरी बोलून सरप्राइज फोडेल या भीतीने अनिताने त्याला मध्येच थांबवले...
" चला चला हात पाय धुवून घ्या पटकन मामी खाऊ करतेय तुमच्यासाठी...आणि हे सगळं आत नेऊन ठेवा , पळा पटकन " असे म्हणून त्याच्यावर डोळे वटारून अनिताने मुलांना आत पाठवले आणि स्वतःही मागोमाग गेली...
" काय रे यश , सरप्राइज फोडणार होतास ना आत्ता ....बघ हा तू सिक्रेट ठेऊ शकणार नसल्यास तू नाही आमच्या टीम मध्ये , मग प्रॉमिस करा सगळ्यांनी कोणीच सिक्रेट सांगायचं नाही आज्जी आजोबांना नाहीतर सगळा फ्लॉप शो होईल आपला "
" नाही नाही आम्ही सिक्रेट ठेऊ , प्रॉमिस प्रॉमिस " मुलं म्हणाली !
तरीही मुलांवर लक्ष ठेवायचं अस अनिताने ठरवलं.
रात्री सुजय घरी आल्यावर गुपचूप अनिताने त्याला आपला प्लॅन सांगितला...सुजय तर एकदम एक्साईट झाला...त्याने लगेच विनयला फोन केला...तो तयारच नव्हता ...
" अहो भाऊजी कसं शक्य आहे ? एकतर मी कार्यक्रमाच्या फक्त चार दिवस आधी पोचणार कधी करू प्रॅक्टिस ? आधीच मी हे असं काही केलं नाहीये यापूर्वी नकोच ते तुम्ही सगळे करा "
" अरे असं काय करतोस ? तू फक्त हो म्हण .आणि आम्ही सगळे सुद्धा कुठे काय करतो असं ? आता चान्स मिळालाय तर करूया ना जरा मज्जा... बरं असं करू , ट्राय करूया जमलं तर ठीक नाही तर सोडून देऊ...मग तर झालं ना आणि तुझी सगळी तयारी मी करून देईल...आता तरी ओके ना...आणि ती गीता मॅम भारी आहे म्हणे..." सुजय विनयला मनवत होता , शेवटचं वाक्य हळू आवाजात बोलला तरी अनिताने ऐकलंच...
" अगं म्हणजे शिकवतात छान आसं म्हणायचं होतं ..."
" हो का ...तुला काय रे माहिती ? आगाऊपणा करायचा नाही , आणि आम्ही सगळे असणार आहोत सोबत समजलं ...त्यामुळे काहीच स्कोप नाही आणि तसंही आता साता जन्माची बुकिंग माझ्याशी आहे हे लक्षात असू द्या ! माझ्या सध्या भोळ्या भावाला उगीच काहीतरी बोलून भडकावू नकोस समजलं...? कळलं ना विन्या ? स्पीकर फोन चालू आहे , तू सगळं ऐकतोयेस ते माहिती आहे मला...आता पटकन हो म्हण बर..." अनिताने सुजयला आणि विनयला ऐकवलं...
" तुमची आज्ञा शिरसावंद्य...आता मला हो म्हणाण्याशिवाय काही ऑप्शन ठेवलाच नाही तुम्ही लोकांनी...करा काय करायचं ते बंदा हाजिर है...बाकी कुठपर्यंत आलीय तयारी ? तुम्ही दोघी शॉपिंग करताय म्हणजे दुकानात काही उरलं नसेलच म्हणा , रोज अख्खं दुकान घरी घेऊन येत असाल...भाऊजी आता एखादं घर घ्या अजून ..." विनायने अनिताला चिडवायला सुरुवात केली...
" खरंय रे बाबा , आज तर झोपायला जागाच नाही मला " सुजय सुद्धा सामील झाला...
" हो हो आता बाहेरच झोपा मग , आणि आता फक्त तुमच्या दोघांची शॉपिंग बाकी आहे ती राहू देऊ ...जुनेच घाला तुम्ही कपडे ...घरात जागा नाही ना " प्रियाही सामील झाली...
" माफ करा बायांनो नेहेमीप्राणेच हरलो आम्ही...आता आमचीही शॉपिंग छान करा नाहीतर तुमच्यापुढे हसं होईल आमचं..." दोघेही म्हणाले ....
अनिता आणि प्रियाने एकमेकींना हसून टाळ्या दिल्या आणि मग विनयला सगळं समजावून सांगितलं...तितक्यात रूम च्या बाहेर कोणीतरी उभ राहून आपलं बोलणं ऐकतय असं त्यांना जाणवलं...
अनिता ने हळूच दार उघडलं... दारात आई उभी होती...
अरे देवा ! आईनी सगळं ऐकलं की काय ? झालं आता सगळं सरप्राइज बोंबललं...इतक्या सगळ्या प्लॅन्स वर पाणी फिरल असं वाटून सगळेच हिरमुसले...!!

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र किंवा घटनेतील साधर्म्य केवळ योगायोग समजावा ! यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही...फक्त निखळ मनोरंजन करण्याचा मानस आहे !!


पुढे काय होईल ? आईला सगळं कळालं असेल का ? सगळ्यांच्या सरप्राइज च काय होईल ...? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्कीच वाचा...!

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing