Oct 24, 2021
कथामालिका

संसार हा सुखाचा...! ( भाग 9 )

Read Later
संसार हा सुखाचा...! ( भाग 9 )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


मुलं , आई , बाबा सगळे जेवायला बसले...प्रिया आणि विनय सुद्धा नाईलाजाने उठून आले.विनय जेवायला बसला...प्रिया अनुच्या मदतीला गेली... जेवतांना विनयने बोलायचा प्रयत्न केला पण कोणीच धड बोलत नव्हतं.. कसबस थोडंसं जेऊन विनय उठला...अनिता आणीं प्रिया न बोलता जेवल्या आणि फक्त कामापुरते बोलत दोघींनी मिळून सगळं आवरलं... प्रियाची अवस्था खूपच ऑकवर्ड झाली होती...पटापट सगळं आवरून ती हॉल मध्ये आली.आई बाबा मुलांना घेऊन शेजारच्या गार्डन मध्ये फिरायला गेले ...आता मात्र विनयचा संयम संपला...तो अनिताच्या समोर जाऊन उभा राहिला ...
" ताई आता तुझी सुटका नाही... खरं खरं सांग सगळं काय चालू आहे ते ...आता माझा पेशन्स संपला... प्लीज बोल ना ग माझ्याशी ..." विनय अगदी काकुळतीला येऊन अनिताला म्हणाला तशी ती जोरजोरात हसू लागली...
प्रिया आणि विनय पुन्हा गोंधळले...
" विन्या अरे ती एक गंमत आहे ...खूप कंट्रोल केलं मी पण आता नाही होत सांगते सगळं...बसा बघू दोघं आधी...आणि टेन्शन घेणं बंद करा बरं...आणि मला खरंच माफ करा , तुम्ही दोघं इतक्या दिवसांनी आलात आणि मी धड बोलले सुद्धा नाही तुमच्याशी..." अनिता ताईने दोघांची माफी मागत प्रियाला मिठी मारली...
प्रिया आणि विनयच्या मनातलं टेन्शन तर दूर झालं पण नक्की काय चाललंय याची उत्सुकता लागली होती...
" तायडे आता बास हा मस्करी...जीवात जीव नव्हता आमच्या , किती त्रास दिलास ...आता घडा घडा बोल बरं "
आता सगळं सांगवच लागणार हे अनिताला कळून चुकलं...आता लपवण्यात काही अर्थ नव्हता...तिने काय घडलंय ते सगळं अगदी सविस्तर दोघांना सांगितलं...
दोघांनीही मोकळा श्वास सोडला...खूप दिवसांपासून मनावर असलेला ताण दूर झाला होता...!
आई , बाबा आणि मुलं घरी आली.आईंनी विनयकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि ती रूम मध्ये जाऊ लागली...तितक्यात...विनय तिच्या जवळ आला...
" आता पुरे ग...मला तायडीने सगळं सांगितलं.खरंच किती भारी अक्टिंग करता तुम्ही सगळे ! मानलं बुवा तुम्हाला.." आईने विनयला जवळ घेतलं...
" देवा देवा किती त्रास झाला मला माहितेय का तुम्हाला ? तू समोर नव्हतास तेव्हा ठीक होतं पण तुम्ही इथे आल्यापासून काही खरं नव्हतं माझं...कधी एकदा लेकराला जवळ घेते आणि मनसोक्त गप्पा मारते असं झालं होतं मला...हे सगळं तुझ्या तायडीच कारस्थान आहे बरं , आणि त्यात तुझे बाबाही सामील आणि जावई बापू तर अगदी आघाडीवर...मग माझं काय चालणार ? ऐकावंच लागलं मला...किती त्रास झाला माझ्या लेकराला...किती खुशीत होतास व्हिसा मिळाला म्हणून आणि आम्ही सगळ्यांवर पाणी फेरलं.चल आता देवापुढे पेढे ठेव आणि नमस्कार कर माझ्यापुढे..." लेकाला सगळं समजल्यावर आईंचा जीव भांड्यात पडला...
" अरे फक्त आईच्या जवळ गेलास आणि बापाला विसरलास का लेका...खूप अभिमान वाटतोय तुझा राजा...शाब्बास !! आपल्या घरण्यातला पहिला तू परदेशी जाणारा..." बाबांनी मायलेकरांच्या मध्ये जाऊन विनयला मिठीत घेतलं !
प्रिया च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...तिने पटकन पेढे आणले आणि विनयच्या हातात दिले...सगळ्यांनी देवापुढे पेढे ठेवून नमस्कार केला आणि मग एकमेकांची तोंडे गोड झाली !
आता सगळे अगदी रिलॅक्स होऊन गप्पा मारत बसले...
" प्रिया आणि सिद्धीने तुला सरप्राइज दिले ना तेव्हापासून मलाही तुला सरप्राइज करायचे होते.काहीच सुचत नव्हते शेवटी तुझ्या लाडक्या आईलाच पडायचं ठरवलं...मग सगळेच सामील झाले प्लॅन मध्ये आणि मग मज्जाच मज्जा..." अनिता ताई विनयला म्हणाली !
" अगं पण घाबरून आम्ही ताबडतोब निघालो असतो मग...आणि सात दिवस इतका त्रास झाला त्याचं काय ? तायडे मी वसूल करणार आहे बरं तुझ्याकडून..." विनय हसत म्हणाला...
" अरे तसं कसं झालं असतं ? आमच्या गुप्तहेर होता ना तुमच्या सोबत... सिद्धी तिकडची सगळी गुप्त माहिती पुरवत होती ना आम्हाला...तुम्ही येणार हे सुद्धा माहिती होतं आम्हाला..." अनिताने लाडक्या भाची ला कुशीत घेतलं...दोघींनी हसत एकमेकींना टाळ्या दिल्या !
" अरे देवा म्हणजे घरातच भेदी होता तर...त्यामुळेच रोज दुसऱ्या खोलीत जाऊन फोन वर बोलणं चालू असायचं...इतकी आगाऊ असशील असं वाटलं नव्हतं बरं सिद्धी...घरी चल बघतेच तुला..." प्रिया म्हणाली...लाडक्या लेकीचे प्रताप आता त्यांना कळत होते...
" खबरदार माझ्या नातीला कोणी हात लावाल तर... अगं गंमत होती ती...तिला काही बोलायचं नाही...हे सगळं कारस्थान तुझ्या नणंदेच्या सांगण्यावरून झालंय...तुम्ही आपापसात बघा काय ते... आम्हाला कोणी काही बोलायचं नाही..." आज्जी नातीच्या मदतीला आली तशे सगळेच पोटभर हसले !
" चला आता पुढचं प्लॅनिंग कसं काय ते ठरवूया..मला जास्त नाही राहता येणार...दोन दिवसात निघायचं आहे..." विनय म्हणाला .
" इतक्या लवकर कसं होईल सगळं ? साहिलची मुंज करुया .कारण मग तुम्ही जाणार ...म्हणून ही सगळी खटपट...किती टेन्शन मध्ये होतात तुम्ही ...आपण सगळे एकत्र काही वेळ आनंदात घालवावा म्हणून हा प्लॅन केला मी...नाहीतर तुम्ही आलाच नसतात ना.आणि मग जाण्याच्या घाईत कुठे जमलं असतं...मग कधी भेटू काय माहिती..." अनिताच्या डोळ्यात पाणी आलं...सगळेच मग भावूक झाले.प्रियाने अनिताला जवळ घेतलं...
" ताई खरंच खूप छान आहे तुमची कल्पना ...आणि गरज आहे आपल्या सगळ्यांना हा आनंदी सहवासाची...तिकडे गेलो तरी येतच राहू आम्ही नेहेमी , आणि तुम्ही सगळ्यांनी सुध्दा नक्की यायचं तिकडे...आपण असं करू ह्यांना जाऊ दे दोन दिवसांनी...आम्ही थांबतो इकडे आणि मग आपण सगळं प्लॅन करून आठ पंधरा दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून सगळं छान करू...की तिकडच्या घरी करायचा कार्यक्रम...म्हणजे तिकडच्या मित्र मंडळीना सुद्धा बोलवता येईल...? "
" नको तिकडे नको , आपले सगळे जवळचे नातेवाईक इथून जवळपास आहेत त्यांना इथेच येणे सोयीचे होईल...सगळ्यांना बोलवायची इच्छा आहे माझी...किती वर्षात काही कार्य झालं नाही घरी आणि नंतरही कित्येक वर्षात काहीच नाही ...तुमच्या मित्र मंडळींसाठी वेगळी पार्टी ठेव तु जातांना आता फक्त नातेवाईक आणि आमची मित्र मंडळी असू दे... बघा काय वाटतं तुम्हाला...? " बाबांनी आपला विचार सांगितला...
" हो खरं आहे ह्यांचं... तसच करूया ...विनू तू जा तुझी कामं आटप...प्रियाला राहू दे इथेच...पोरी करतील सगळी तयारी...दिवस ठरला की मात्र सुट्टी काढून ये...नवीन घराचा ताबाही मिळेल. तुझं जाण्याचं काय ठरतंय ? तारीख वगेरे काही सांगितली का ? मला खरंतर अजूनही तूम्ही जावं असं वाटतं नाही...
अहो हो हो लगेच नका रागाने पाहू माझ्याकडे...मी फक्त इच्छा बोलून दाखवली...पोराच्या प्रगतीच्या आड मी येणार नाही...विनू पण तू एकटा राहशील ना नीट थोडे दिवस ? जमेल ना ... बायकोशिवाय पानही हलत नाही तुझं..." आई म्हणाली तशी प्रिया लाजली .
" हो आई मी करेन मॅनेज...प्रिया माझी सोय लावून देईल...मस्त करूया प्रोग्राम...खरंच किती वर्षांनी कार्य होणार आपल्याकडे...मी असं करतो उद्याच निघतो म्हणजे अजून एक दिवस सुट्टी नंतर घेता येईल..पैशांची कुठलीच काळजी करू नका..मनसोक्त शॉपिंग करा , मेन्यू सुद्धा मस्त ठेवूया...तश्या ह्या दोघी असल्यावर काही बघायलाच नको ...काय ग तायडे ? " विनय म्हणाला
" हो बाबा ऑर्डर सोडण्यात तू पटाईत आहेत , आणि आता तर काय मॅनेजर साहेब घरी दारी सतत ऑर्डर्स सोडून काम करवून घेतात...आम्ही बिच्चारे काम करत राहणार...तुला सांगते प्रिया हा विन्या लहान होता माझ्यापेक्षा तरीही सगळी कामं माझ्या कडून अगदी सहज करवून घ्यायचा बर .. आणि..." अनिताने विनयची पोल खोलायला सुरुवात केली तशी विनय तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला " आता पुरे हा, मी जातांना हा वेगळा प्रोग्राम ठेवूया तुझा..\" भाई की शैतानी , बेहेना की जुबाणी \" मग तर झालं ..आता चला लिस्ट करूया काय काय करायचं ते..."
" मॅनेजर साहेब ऑर्डर सोडायला तयार ..." प्रिया हळूच अनिताच्या कानात पुटपुटली...दोघींनी हसून एकमेकींना टाळ्या दिला आणि विनयने लटक्या रागाने डोळे वटारले...
अनिता खरंच एक खूप छान मुलगी होती...विनयवर तिचं खूप प्रेम होतं. प्रियाला सुद्धा एका लहान बहिणीप्रमाणे ती वागवयाची...खूप सुंदर नाते होते त्यांचे...कधी कधी तर प्रियाला प्रश्नच पडायचा की ही खरंच आइंची लेक आहे का ? सिद्धी तर आत्याची भारी लाडकी आणि नेहा , यशवर सुद्धा प्रिया आणि विनय पोटच्या लेकरांसारखे प्रेम करायचे.भाऊजी सुद्धा खूप चांगले होते.विनय आणि प्रियाचं खूप छान पटायचं त्यांच्याशी.प्रियाला तर ते त्यांची धाकटी बहिण मानायचे...दोन्ही कुटुंब अगदी दृष्ट लागावी अशीच होती...
मुलेही एकमेकांवर खूप माया ठेवून होती...त्यांची मस्त मस्ती सुरू होती...झोप कशी सगळ्यांपासून दूर पळून गेली होती...कितीतरी दिवसांनी सगळे एकत्र आनंद लुटत होते...!!

पुढे काय होणार ? कसा होईल कार्यक्रम ? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा...!!

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र किंवा घटनेतील साधर्म्य केवळ योगायोग समजावा ! यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही...फक्त निखळ मनोरंजन करण्याचा मानस आहे !!

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing