Oct 24, 2021
कथामालिका

संसार हा सुखाचा...! ( भाग 7 )

Read Later
संसार हा सुखाचा...! ( भाग 7 )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..सकाळ झाली...तिघही पटापट आवरून तयार झाले..पुन्हा एकदा डॉक्युमेंट्स चेक झाले...विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उजळणी करून झाली... मग ब्रेकफास्ट करून निघायचं होतं...विनयने टॅक्सी आधीच बुक करून ठेवली होती...ब्रेकफास्ट ला अनेकविध पदार्थ होते...पण कोणालाच काही जाणं शक्य नव्हतं...सिद्धीला थोडं खाऊ घालून तिघेही निघाले...विनय प्रियाला धडधडतच होतं... सिद्धी सुद्धा बावरली होती ...आधीच गर्मी त्यात फॉर्मल कपडे , हातात डॉक्युमेंट्स , सतत येणारा घाम आणि टेन्शन यामुळे अगदी वाट लागली होती...
तिथे पोचल्यावर आपल्यासारखेच अनेक लोक बघून त्यांच्या जीवात जीव आला ..इथे येणाऱ्या प्रतेकाची परिस्थीती सारखीच होती....कोणीच कोणाशी बोलत नव्हतं... सिद्धी बिचारी गांगरून बसली होती...
अनेक काऊंटर वर प्रोसेस सुरू होती...आधीच्या फॉर्मालिटी पूर्ण झाल्या , आता फक्त मुख्य इंटरव्ह्यू बाकी होता...आणि तोच सगळ्यात महत्त्वाचा आणि अवघड होता...प्रत्येक काऊंटर वर वेगळे वेगळे ऑफीसर होते...प्रत्येकाला प्रश्न विचारणं सुरू होतं...
प्रियाने मनातल्या मनात अंदाज बांधायला सुरुवात केली होती ....पाच नंबरचा ऑफीसर अगदी जुजबी प्रश्न विचारताना दिसत होता...त्याच्या प्रश्नांना उत्तर देणे सोपे आहे असं तिला वाटलं ...त्या काऊंटर वरून परत जाणारा प्रत्येक माणूस हसून जात होता तर तीन नंबरच्या काऊंटर वरचा ऑफीसर खूप कडकं वाटत होता....त्यांच्यासमोर दोन लोकांना त्याने नाही म्हणून परत पाठवलं होतं...
सात नंबरला एक बाई होती तिला बघून तर प्रिया खूप घाबरली...तिच्यासमोर एक लहान मुलगी जोरात भोकाड पसरून रडत होती पण त्या ऑफीसरला तिची दया नाही आली...नाही नाही काही झालं तरी सात नंबर नको यायला...प्रियाला त्या लहान मुलीच्या जागी सिद्धीच दिसू लागली आणि तिची धडधड अजुनच वाढली...
प्रत्येकाच्या चेहेर्यावर दिसणारे भाव बघून अजुनच भीती वाटत होती ....
" आपल्याला पाच नंबर ला बोलवायला पाहिजे , तो ऑफीसर सगळ्यांना व्हिसा देतोय...जास्त प्रश्नही विचारत नाहीये...आपला नंबर आला की तिकडेच जाऊया पटकन...काही झालं तरी तीन नंबर वर नाही जायचं...फारच खडूस वाटतोय तो ऑफीसर...आणि ती सात नंबर वाली बाईसुद्धा डेंजर दिसतेय..." प्रिया विनयच्या कानात पुटपुटली...
" अगं काय बोलतेस हे , तसं काही नसतं आणि आपल्याला नंबर मिळतो आधीच तिकडेच जावं लागतं...सगळ्यांना एकत्र बोलवतील असही नाही...गप्प बस आता फालतू विचार करू नको...फक्त काय उत्तर द्यायची ते आठव..." विनेयने प्रियाची विचारांची दिशाच थांबवली...
प्रिया मनातल्या मनात देवाची प्रार्थना करू लागली ....तितक्यात त्यांना नंबर मिळाला...
नको तेच झालं होतं...विनयला तीन नंबर आणि प्रिया आणि सिद्धीला सात नंबर...
प्रियाची धडधड पराकोटीला पोचली...एकमेकांना बेस्ट लक देऊन प्रार्थना करत दोघे बसले...विनयला बोलावण्यात आलं...प्रियाने बाप्पाचा धावा सुरू केला... विनयला बरेच प्रश्न विचारले जात होते...
तितक्यात प्रिया आणि सिद्धीला ही बोलावण्यात आलं...
फक्त एक दोन जुजबी प्रश्न विचारून प्रियाला विनय सोबत थांबण्यास सांगितल गेलं...पण तिचा आणि सिद्धीचा पासपोर्ट मात्र त्या ऑफीसर ने ठेऊन घेतला...प्रिया विनयच्या मागे जाऊन उभी राहिली... " काँग्राचूलेशन्स...युवर व्हिसा इस कन्फर्म..यू विल गेट इट विथीन अ विक..." हे शब्द कानावर पडले आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली... व्हिसा मिळाला होता आठवड्या भरात घरी पाठवणार होते ते...
आता वातावरणात अचानक थंडावा निर्माण झाला...सगळेजण ऑफीसर अगदी प्रेमळ भासू लागले....टेन्शन जाऊन आता ह्रुदयात आनंदाचे टिन टिन वाजू लागले...इतक्या वेळ देवाचा धावा करणारे मन आता देवाला धन्यवाद देऊ लागले होते...
तिघेही बाहेर आले...
प्रिया आणि विनयने आई बाबांना फोन करून आनंदाची बातमी दिली ....
टॅक्सीत बसल्यावर प्रियाने विनयच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे डोळे मिटून घेतले....भर दुपारी सुद्धा शितलतेची अनुभूती देणारा तो दिवस खरंच आगळा होता...हॉटेलवर येऊन विनयने आधी सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवले आणि मग तिघेही फ्रेश झाले...मन आनंदाने भरलं असलं तरीही पोटात मात्र आता भुकेची जाणीव झाली होती...सकाळी टेन्शनमध्ये कोणालाच काही गेलं नव्हतं...
" बोल बच्चा काय काय खायचं ? आज हवं ते ऑर्डर कर मम्मा काहीच बोलणार नाही...आणि राणीसरकार तुमचीही ऑर्डर सांगा ..." विनय चा आनंद प्रियाने हळूच कॅमेरात टिपला...
तिघांची मस्त मजेत जेवणं झाली मग रूम मध्ये आरामात बसून पुढचा प्लॅन आखण सुरू झालं...
" आज संध्याकाळी इथे शॉपिंग करूया , आणि मग उद्या साईट सीईंग करूया दिवसभर...परवा तर निघायचं ना परत..." प्रियाचा प्लॅन दोघांनाही आवडला... तसच करायचं ठरलं...
रात्र होईपर्यंत तिघही मस्त फिरत होते... इथलं मार्केट खूप छान होतं...प्रियाने न विसरता आई , बाबा , अनिता ताई , भावजी आणि त्यांच्या मुलांसाठीही त्यांना आवडतील असे गिफ्ट घेतले...शॉपिंग झाल्यावर मस्त जेवण झालं आणि तिघेही रूम वर येऊन मस्त झोपून गेले...उद्या सकाळी लवकर फिरायला निघायचं होतं...
दुसऱ्या दिवशी मंडळी सकाळीच निघाली...आज कितीतरी वर्षांनी प्रियाने गुलाबी वन पिस घातला होता...लग्नानंतर पहिल्या वाढदिवसाला विनयने तिला गिफ्ट दिला होता...घरी आई बाबा असल्यामुळे तिला असे कपडे घालतच येत नव्हते ...किती सुंदर दिसत होती प्रिया...मोकळे सोडलेले केस...कानात ऑक्सीडाईस कानातले, गळ्यात तसच नाजूक मंगळसूत्र...तिच्याकडे पाहून विनयची विकेट उडाली...
" राहू दे ना फिरायला जायचं...इथेच रूम मध्ये एन्जॉय करूया...तुला असं बाहेर घेऊन जाणं धोक्याच आहे...इतकी सुंदर मुलगी बघून लोक घायाळ व्हायचे..." विनय हळूच प्रियाच्या कानात पुटपुटला...
" चल काहीतरीच काय...दहा वर्षांची लेक आहे आपल्याला विसरलात वाटतं मिस्टर...आणि ती इथे वाट बघतेय आपली...तिला सांग तसं..." लाजून विनयला डोळा मारत प्रिया म्हणाली...
तिच्या गालावरची लाली पाहून विनय पुन्हा एकदा घायाळ झाला...प्रिया पटकन वाट बघणाऱ्या सिद्धीला घेऊन बाहेर पडली...
दिवस मस्त गेला...खूप दिवसांनी असं मस्त एन्जॉय केलं...वातावरण खूप छान होतं...आणि आनंदी मनासोबत ते अजुनच धुंद होऊन जातं...तिघांनी खूप मज्जा केली...भरपूर फोटो काढले...हवं तिथे फिरणं , हवं ते खाणं , खरंच इतका सुंदर दिवस फुलपाखरासारखा उडून गेला...राहिल्या फक्त आठवणी ह्रुदयात आणि कॅमेरात जपून ठेवलेल्या...
रूम वर येऊन सगळं आवरून तिघेही झोपेच्या अधीन झाले...उद्या सकाळी परत जायचं होतं...
सकाळी लवकर फ्लाईट होतं... खरंतर अजून इथून जाण्याची तिघांचीही ईच्छा नव्हती...पण जाणं भागचं होतं...
तिघे घरी परत आले...घरी येताच सिद्धी खेळायला पळाली...विनय आणि प्रिया एकमेकांमध्ये हरवले...
तितक्यात फोन आला , बोलता बोलता विनयच्या चेहेर्यावरचे भाव बदलले... त्याच्या चेहेर्यावरचा आनंद हळूहळू ओसरत गेला...

काय झालं असेल ? कोणाचा फोन असेल ? विनयला अशी कोणती दुःखद बातमी मिळाली ? ....जाणून घेऊया पुढील भागात ...लवकरच....!

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र किंवा घटनेतील साधर्म्य केवळ योगायोग समजावा ! यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही...फक्त निखळ मनोरंजन करण्याचा मानस आहे !!

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing