Oct 24, 2021
कथामालिका

संसार हा सुखाचा...! ( भाग 6 )

Read Later
संसार हा सुखाचा...! ( भाग 6 )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..प्रियाने विनयला फोन केला , विनय दहा मिनिटात पोचतो म्हणाला तशी प्रियाने सरप्राइज ची मज्जा अजून वाढवण्यासाठी विनयला सांगितलं,
" अरे एक प्रॉब्लेम झालाय , मी घरी नाहीये... सिद्धीला मी सोडलय तिच्या मैत्रिणी कडे...आता काहीच सांगता येणार नाही , घरी आले की बोलू...." अर्धवट बोलून प्रियाने फोन ठेऊन दिला आणि दोघी मायलेकी सगळे लाईट बंद करून गुपचूप आत जाऊन बसल्या...
विनयला खूप टेन्शन आलं होतं...प्रियाने अर्धवट सांगितल्यामुळे त्याला जास्तच काळजी वाटत होती...घरात येऊन तो लाईट लावणार इतक्यात...
फॅन सुरू झाला...विनयच्या डोक्यावर फुलांची उधळण झाली...
" काँग्राचूलेशन्स अँड सेलिब्रेशन ....सरप्राइज...!! " प्रिया आणि सिद्धी आतून नाचत गात आल्या...
विनय क्षणभर स्तब्ध झाला आणि त्याने भावना विवश होऊन प्रियाला मिठीत घेतलं...मग सिद्धीसुद्धा दोघांना येऊन बिलगली...
दोघींनी मिळून मस्त घर सजवल होतं...विनयच्या आवडीच्या साडीत प्रिया एकदम मस्त दिसत होती....
" भारीच सरप्राइज दिलं तुम्ही दोघींनी... लव्ह यू स्वीट हार्ट...तुझा फोन आल्यावर किती घाबरलो होतो मी... जिवाचं पाणी पाणी झालं माझ्या...याचा बदला मी नक्कीच घेणार...पूर्ण वसुली करणार मी..." विनय हळूच प्रियाच्या कानात पुटपुटला...तशी प्रिया अजुनच सुंदर दिसू लागली...लाजेने तिचे रूप अजुनच खुलत होते...
विनय फ्रेश व्हायला आत गेला...बघतो तो काय सुंदरसा शर्ट त्याला दिसला...खूपच आवडला त्याला तो...
" अहो साहेब... बघताय काय असे तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या बायकोने आणलाय तो...चल आवर पटकन सिद्धी वाट बघतेय ...अजून सरप्राइज बाकी आहे..." विनयच्या मिठीतुन स्वतःला कसबस सोडवत प्रिया बाहेर पळाली...
विनय तयार होऊन येईपर्यंत दोघींनी टेबल सजवले...
किती रुबाबदार दिसत होता विनय...खरंच अजूनही छान मेन्टेन ठेवलं होतं विनयने सुद्धा स्वतःला...दोघांची जोडी अगदी दृष्ट लागण्यासारखी होती... सिद्धीसुद्धा आज कितीतरी दिवसांनी मम्मी पप्पांना इतकं आनंदात बघत होती...तो चिमुकला जीव सुद्धा अगदी आनंदाने फुलून गेला होता...!
टेबल सुंदर सजवलेलं होतं...विनयच्या आवडीचा पाईन्यापल केक आतुरतेने वाट बघत होता आणि सिद्धी सुद्धा ...
सिद्धीची गडबड चालूच होती...
" पप्पा हा केक मी चॉईस करून आणलाय स्पेशली तुमच्यासाठी...मला चॉकलेट केक आवडतो म्हणून नेहेमी तुमच्याही बर्डेला तुम्ही चॉकलेट केकच आणता ...पण टुडे इज युवर डे...म्हणून आज तुमचा फेवरेट केक...या ना लवकर..." तिने पटकन पप्पा चा हात धरून केक कापला आणि मग पप्पाला भरवला... विनयच्या डोळ्यात आनंदाश्रू होते...आपली चिमुकली कधी इतकी मोठी झाली हे त्याला कळलंच नव्हतं...
प्रिया सुद्धा भरल्या डोळ्यांनी बापलेकीच प्रेम कॅमेरात साठवत होती....सगळ्यांनीच मग एकमेकांना केक भरवला...मस्त फोटोसेशन झालं....
आज प्रियाने मस्त विनयच्या आवडीचा सगळा बेत केला होता... स्वीट कॉर्न सूप , मंचुरियन ,श्रीखंड , छोले , बिर्याणी , रायता...आणि मग पुन्हा डेझर्ट सुद्धा स्पेशल होतं...प्रिया जेवण गरम करायला गेली आणि विनय ,सिद्धीने आजी आजोबांची आठवण काढत त्यांना व्हिडिओ कॉल केला... सिद्धी खूपच उत्साहात होती...तिने सगळं सगळं आजी आजोबांना रंगवून सांगितलं...आणि मग विनयने फोन घेतला...
" कसे आहात तुम्ही आई बाबा ? आज मस्त सरप्राइज दिलं मला दोघी मायलेकीनीं... सिद्धीने सगळं सांगितलच आहे ना...फारच खुशीत आहे आज पोर...फोटो पाठवतो तुम्हाला...उद्या आम्ही निघू दुपारी...परवा आहे इंटरव्ह्यू आशीर्वाद द्या ! बिल्डर पंधरा दिवस तरी येणार नाही म्हणाले भावजी...येऊन जा मग तुम्ही परत...मी जाईन जेव्हा रजिस्ट्रेशन करायचं तेव्हा...करू का तुमची तिकीट बुक ? आम्ही सोमवारी येऊ परत तुमचेही सोमवारचे काढतो तिकीट...आधी यायचं तरी काही प्रोब्लेम नाही पण तुम्ही एकटे राहाल म्हणून म्हणालो..."
" वा मज्जा चालू आहे मग तुमची आम्ही नाही म्हणून तिथे ...आशीर्वाद तर असतातच आई वडिलांचे मुलांना मग मुलं कसेही वागोत...बघ तुला जमलं तर ये नाही तर बघू आम्ही कसं करायचं ते...आणि फ्लॅट आम्हा दोघांच्या नावावरच घ्यावा लागेल ना मग आम्हाला इथे रहावच लागेल...उगीच या , जा खर्च कशाला तुला आमचा..." आईच्या खवचट बोलण्याने विनयचा सगळा मुडच गेला...पण प्रिया आणि सिद्धी समोर तसं न दाखवता तो जेवायला बसला...
" आई बाबांनी आशीर्वाद सांगितलेत ग आपल्याला...आणि फ्लॅट च काम करूनच येतो म्हणालेत ते...तू ही बसायचं सोबत जेवायला ...आम्ही दोघं मदत करतो तुला..." विनय प्रियाला म्हणाला ....
मस्त सजलेल्या टेबल वर नवीन डिनर सेट मध्ये गरमा गरम सूप आणि मंचुरियन ने जेवणाची सुरुवात झाली... विनयने हळूच किचन मध्ये डोकावून मेनू बघून घेतला होता...प्रियाने इतकं खपून त्याच्या आवडीच सगळं जेवण बनवलं होतं त्यामुळे तो खुश होता...गोड पोरगी , इतकी छान बायको आणि सोबत आवडीच सुग्रास जेवण ! आईच्या बोलण्याचा विसर पाडण्यासाठी हे सगळं खूप होतं...
सिद्धी सूप पिण्यात मग्न होती ही संधी साधून प्रियाने पटकन विनयला घास भरवला...तिखट मंचूरियन अगदी गोड लागलं विनयला...मग गरमा गरम छोले , पुरी आणि श्रीखंड आहहा ...सगळ्यांनी मनसोक्त ताव मारला...पप्पाला बोटाने श्रीखंड चाटताना बघून सिद्धी हसू लागली...
" अगं बोटाने चाटायची मज्जाच वेगळी...पण फक्त घरीच हा..." विनयने सिद्धीला सुद्धा बोटाने श्रीखंड चाटवल आणि तिलाही ते खूप आवडलं...
" वॉव हे तर खूपच यम्मी लागतंय ...आता मी सुद्धा असच खाणार..." प्रियाने दटावल तसा विनय म्हणाला..
" पण ही गंमत फक्त तू मी आणि मम्मा असतांनाच करायची बरं का...पप्पा असं श्रीखंड खातो हे कोणाला म्हणजे कोणाला सांगायचं नाही ...प्रॉमिस...! कोणासमोर फक्त चमच्याने खायचं !" विनयने सिद्धीकडून प्रॉमिस घेतलं तसं प्रियाचा जीव भांड्यात पडला ! हो नाहीतर ही पोरगी अशीच खाईल कोणासमोर आणि पप्पाचही भांडं फोडायला पुढे मागे बघणार नाही !!
हसत खेळत जेवणं झाली आणि मग सिद्धीच्या रेसिपीनी बनवलेलं स्पेशल फ्रूट आईस्क्रिम आलं...विनयची तर आज खूपच मज्जा झाली होती...लेकीच्या हाताने तिने बनवलेलं फ्रूट आईस्क्रिम खाताना पुन्हा एकदा त्याचं मन भरून आलं...
पप्पाच्या कुशीत सिद्धी झोपून गेली...प्रिया सगळं आवरून आली आणि आई बाबांना फोन फोन करणार तर विनयने " जाऊ दे झोपली असतील मी बोललो मघाशी , तू कामात होतीस म्हणून नाही बोलावलं तुला..." असं सांगून तिला थांबवलं...त्यांच्या वागण्यामुळे तिचा इतका छान मुड त्याला घालवायचा नव्हता...
" अनु डार्लींग खरंच आज खूपच खुश केलास तू काय काय सरप्राइज मस्त प्लॅन केला होता ...आणि दिसत किती गोड होतीस...बाहेरची घरची सगळी कामं सहज करतेस आणि मलाही खुश ठेवतेस...आणि किती सुंदर मेन्टेन केलंय तू स्वतःला खरंच अजूनही तुला असं पाहिलं की कालिजा खलास होती माझा..." विनयने लाजून चूर झालेल्या आपल्या लाडक्या बायकोला मिठीत घेतलं...
सकाळी दोघेही लवकर उठले... प्रियाने घरचं आवरलं आणि विनयने पुन्हाएकदा सगळी डॉक्युमेंट्स चेक केली... प्रियाच्या आई बाबांचा शुभेच्छा देण्यासाठी फोन आला...लेक जावयाला खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन काळजी घ्या असं अनेकदा बजावून त्यांनी फोन ठेवला ..
निघताना आई बाबांचा आशर्वाद घ्यावा म्हणून प्रियाने फोन केला..." आई बाबा थोड्या वेळात निघतोय...तुमचा आशर्वाद पाठीशी असू द्या...आमची काही काळजी करू नका...तुम्ही तुमची काळजी घ्या...पोचलो की फोन करतोच..ताई कुठे आहेत ? त्यांनाही सांगा "
" हो ठीक आहे. अनिता कामात आहे " इतकचं बोलून आई बाबांनी फोन ठेऊन दिला...
प्रियाच्या मनात पुन्हा काहीतरी लागलं...आई बाबा अजूनही नाराज वाटतायेत ?
पण आता निघायची वेळ झाली होती...सगळं पुन्हा एकदा चेक करून देवाच्या पाया पडून तिघे निघाले...!
एयरपोर्ट वर पोचल्यावर सिद्धी आनंदाने बागडू लागली...तिघेही खूप आनंदात होते...नाही म्हणायला आई बाबांचे वागणे विनय आणि प्रिया दोघांनाही बोचत होते पण एकमेकांना दुखवायचे नाही म्हणून दोघेही खुप आनंदात असल्याचं भासवत होते...
फ्लाईट मध्ये बसल्यावरही सिद्धीची अखंड बडबड सुरूच होती...लवकरच फ्लाईट पोचल. वातावरण अगदी सुखावह होतं...तिघेही सामान घेऊन हॉटेलवर आले...कंपनीने खूप मोठं फाईव्ह स्टार हॉटेल बुक केलं होतं...जणू एखादा राजमहालच... विनयने आणि प्रियाने आपापल्या आई बाबांना पोचल्याचा फोन केला...तिघेही फ्रेश होऊन जेवायला गेले...मस्त बुफे होता असंख्य पदार्थांची रेलचेल होती अगदी...मनसोक्त जेऊन आजूबाजूला चक्कर मारून आले...किती सुंदर गार्डन होतं...स्विमिंग पुलही होता....सिद्धी मनसोक्त खेळली आणि प्रिया विनय सुद्धा एकमेकात रमले...
रूम वर जाऊन मस्त बेड वर सगळे पहुडले... सिद्धीला लगेचच झोप लागली पण प्रिया आणि विनय थोडे काळजीत होते...उद्याच सगळं नीट पार पाडू दे अशी देवाला प्रार्थना करत होते...उद्या सकाळी खरी परीक्षा होती...प्रियाला तर सारखी भीती वाटत होती...आपण काही चुकीचं बोललो तर ....वेळेवर काही वेगळंच घडलं तर...एक ना दोन हजार प्रश्न तिच्या डोक्यात भुंगा घालत होते...

पुढे काय होईल ? कसा होईल इंटरव्ह्यू ? विनयला व्हिसा मिळेल का...? जाणून घेऊया पुढील भागात...!

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र किंवा घटनेतील साधर्म्य केवळ योगायोग समजावा ! यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही...फक्त निखळ मनोरंजन करण्याचा मानस आहे !!

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing