Aug 09, 2022
कथामालिका

संसार हा सुखाचा...! ( भाग 15 )

Read Later
संसार हा सुखाचा...! ( भाग 15 )यशला घेऊन सगळे हॉस्पिटल मध्ये आले...तो अजूनही बेशुध्द होता...सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले होते...अनिता सतत रडत होती...अनिताच्या डोळ्यातले पाणी सुद्धा थांबत नव्हते...नेहा आणि सिद्धी सुद्धा खूपच घाबरून गेल्या होत्या... प्रिया अनिताला सावरण्याचा प्रयत्न करत होती...नेहा आणि सिद्धीसुद्धा सुजयच्या कुशीत शिरून रडायला लागल्या...विनय हॉस्पिटल ची फॉर्मलिटी पूर्ण करत होता...
डॉक्टरांनी यशला तपासले...डोक्याला आतून मार लागला होता...वरून काहीच रक्तस्त्राव झालेला नव्हता पण तो बेशुद्ध झाल्यामुळे सगळ्या तपासण्या करणं गरजेचं होतं...
रात्र होत चालली होती.... विनयने नेहा आणि सिद्धीला प्रियासोबत घरी पाठवलं आणि कॅन्टीन मधून खाण्याचे पदार्थ आणून अनिता आणि सुजयला जबरदस्तीने खायला लावलं...
प्रियाने ही मुलींना थोडं खाऊ घालून झोपवलं...तिला एकटीला खूप भीती वाटत होती....सगळ्या तपासण्या पूर्ण होईपर्यंत काहीच सांगता येणार नव्हतं...
डॉक्टरांनी काही प्रार्थामिक तपासण्या केल्या आणि पुढचे चोवीस तास खूप क्रिटिकल असल्याचं सांगितलं...
अवघा आठ वर्षाचा तो कोवळा जीव कसं आणि किती सहन करत असेल ? एरवी एका जागी पाच मिनिटं शांत न बसणारा तो सगळ्यांचा जीव की प्राण होता पण आता त्याला या अवस्थेत बघणं कोणालाच शक्य नव्हतं...
अनिताने देवाचा धावा सुरू केला... सुजयने सेकंड ओपिनियन घ्यावे म्हणून दुसऱ्या डॉक्टरशी संपर्ग साधायची तयारी सुरू केली...घरी प्रियाने देव पाण्यात ठेवले....
सकाळ झाली...प्रियाने आत्याला बोलावून घेतलं...त्यांना सगळी कल्पना दिली आणि मुलींना त्यांच्याकडे सोडून चहा , नाश्ता घेऊन ती तातडीने हॉस्पिटल मध्ये गेली.
थोड्या वेळात डॉक्टर आले...लवकरच यशचे रिपोर्ट्स मिळणार होते पण अजूनही तो शुद्धीवर आला नव्हता...यशचा हात हातात घेऊन अनिता मूकपणे अश्रू ढाळत होती...डोळे मिटून ती देवाचा धावा करत होती....
अचानक यशचा तिच्या हातात असलेला हात हलला...अनिताने पटकन डोळे उघडले आणि..." मम्मा काय झालं ? मी कुठे आहे ..." असा क्षीण आवाज तिच्या हृदयापर्यंत आला..तिच्या काळजाच्या तुकड्याचा ... यशचा होता तो आवाज...
अनिताने त्याला कुशीत घेतलं ! दोघा मायलेकरांचं प्रेम बघून तिथे असलेल्या डॉक्टरचही काळीज आनंदांनं भरलं....त्यांनी यशला तपासले आणि आता काही काळजी करण्याचं कारण नाही असं सांगितलं...
" यश एकदम ठीक आहे...कुठलीच काळजी करायचं कारण नाही...आपण सगळ्या टेस्ट केल्या आहेत .... सगळं अगदी नॉर्मल आहे...पडल्यामुळे घाबरून लहान मुलांमध्ये असं होण्याची शक्यता असते...नशीब चागलं म्हणून काही झालं नाही...दोन तीन दिवस जरा आराम करू द्या त्याला बस बाकी काही नाही...काही वाटलं तर फोन करा...." डॉक्टरांच्या बोलण्यामुळे सगळ्यांच्या जीवात जीव आला...
" डॉक्टर याची मुंज आहे पुढच्या आठवड्यात...तेव्हा काय करू ...प्रोग्राम कॅन्सल करावा का...फार काळजी वाटते यशची...जीवावरच बेतलं होतं पण तुमच्यामुळे सगळं ठीक झालं..." सुजयला अजूनही टेन्शन होतं म्हणून त्याने डॉक्टर ला डायरेक्ट विचारून घेतलं...काही झालं तरी यशच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेण्याची त्याची तयारी नव्हती...
" नाही नाही त्याची काही गरज नाही...यश अगदी फीट आहे...तुम्ही प्रोग्राम करू शकता...फक्त एक दोन दिवस त्याच्याकडे लक्ष ठेवा...यश बेटा आता शांत पणे खेळायच... नो धडपड ओके ? बी लाईक ए गुड बॉय...काही त्रास झाला तर लगेच सांगायचं...." डॉक्टरांनी सांगितलं आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला...एक खूप मोठं संकट अगदी सहज टळलं होतं...डॉक्टरांचे अनेकदा आभार मानून झाले ... अनिताच्या डोळ्यातलं पाणी अजूनही थांबत नव्हत...
यश आता एकदम ठीक होता...त्याची बडबड सुरू झाली होती...घरी जाण्यासाठी तो अधीर झाला होता...हॉस्पिटल मध्ये त्याला बोर होत होतं....तो अनिताच्या कुशीत विसावला ! आपण ठीक आहोत तरी मम्मा का रडतेय हेच त्याला कळत नव्हत...
अनिताने हात जोडून डॉक्टरांचे आभार मानले " डॉक्टर खरंच तुम्ही देवासारखे धाऊन आलात...इतक्या मोठ्या संकटातून आमच्या यशला बाहेर काढलत...कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू " अनिता अजूनही भावनाविवश झाली होती...
" थँक्यू डॉक्टर अंकल...मला काय झालं ते माहीत नाही मला पण सगळे रडतायेत म्हणजे नक्कीच मी मोठा पराक्रम केला असेल...पण आता मला छान वाटतय आणि इथे बसून बोर पण होतंय...घरी जाऊ द्या ना मला प्लीज...आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे डान्स ची आणि क्रिकेट मॅच पण आहे आमची... नेक्स्ट वीक माझी मुंज आहे आणि अजून सरप्राइज प्रोग्राम पण आहे...पप्पा आपण डॉक्टर अंकलला पण बोलावू या ना ...." यश निरागसपणें म्हणाला ...सगळे आनंदाने हसले...
" हो खरंच डॉक्टर तुम्ही नक्की या आमच्या कडे प्रोग्राम ला मी तुम्हाला इन्वीटेशन पाठवतो .तुमच्या फॅमिली सहित जरूर या...तुमचे आभार मानायला खरंच शब्दच नाहीयेत तरी पण खूप खूप आभार तुमचे..." सुजय ने डॉक्टरांना प्रोग्रामला येण्याची विनंती केली...
डॉक्टर हसले..." हो हो नक्की येणार...या आमच्या इतक्या गोड पेशंट च इन्वाइट आहे ते कसं काय सोडणार मी...आणि यश बेटा आता तू घरी जाऊ शकतोस...फक्त दोन दिवस नो प्रॅक्टीस आणि नो क्रिकेट ...आणि घरातच आराम करायचा , फक्त दोन दिवस मग तू छान एन्जॉय कर.." डॉक्टरांची परवानगी मिळाली तसा यश अजुनच खुश झाला...सगळे रिलॅक्स झाले...!
सुजय डॉक्टरांशी बोलून बाकीच्या फॉर्मलीटी पूर्ण करायला गेला...थोड्याच वेळात सगळी प्रोसेस पूर्ण झाली की घरी जाता येणार होतं...
प्रियाने साहिलला जवळ घेतलं...त्याच्या चेहेर्यावर दिसणारा आनंद बघून सगळेजण कालपासूनचा त्रास आणि टेन्शन जणू विसरूनच गेले होते...अनिताच्या डोळ्यात सुद्धा आता आनंद दिसत होता.
" ताई मी घरी जाऊ का ? तुम्हाला अजून वेळ लागेल सगळ्या फॉर्मलीटी पूर्ण करून यायला...आत्या चे दोनदा फोन येऊन गेलेत...मुलीही खूप बावरून गेल्या आहेत...यश बाळा खायला मस्त खाऊ करते तुझ्यासाठी ये लवकर " प्रिया त्याला पुन्हा एकदा कुरवाळून म्हणाली...
" हो ठीक आहे ...निघ तू ...विनय तू ही जा घरी ...आम्ही येतोच थोड्या वेळात...आता काही काळजीचं कारण नाही " अनिता म्हणाली तसे विनय आणि प्रिया घरी निघाले...
घरी पोचताच नेहा आणि सिद्धी प्रियाच्या गळ्यात पडल्या...दोघीही खूप घाबरल्या होत्या...
यश म्हणजे दोघींचा लाडका भाऊ होता...घरातलं शेंडेफळ म्हणून यश सगळ्यांचा खूपच आवडता होता...
" अगं यश एकदम ठीक आहे...थोड्या वेळात घरी येतोय आपला लाडका.." प्रिया म्हणाली. तश्या सिद्धी आणि नेहा खूप आंनंदल्या...आत्या सुद्धा सगळं ठीक आहे म्हणून देवापुढे दिवा लावायला गेल्या...
प्रियाने सुद्धा लगेच साहिलचा आवडता शिरा करून देवाला नैवेद्य दाखवला...विनयला पाठवून प्रियाने पनीर , मटार आणि डेकोरेशनच सामान आणून घेतलं...
मुली आणि विनयने मिळून घर सजवल आणि प्रियाने यशच्या आवडीचे पदार्थ तयार केले...
पनीर बटर मसाला , मटार पुलाव , बुंदी रायता आणि शिरा बघून स्वारी खुश होणार होती...
औक्षण करण्यासाठी आरतीच ताट तयार करून प्रिया आणि सगळी मंडळी यशची वाट बघत बसली...
आत्या आणि मामांना प्रियाच खूप कौतुक वाटलं...इतक्या अवघड परिस्थीत सुद्धा तिने सगळं किती छान सांभाळलं होतं...
" फारच गुणी आहे बाबा विनय तुझी बायको...खरंच आम्हाला आमच्या सुनेचा खूप अभिमान आहे...अश्या वेळी माणूस खूप घाबरुन जातो पण हिने किती छान सांभाळलं सगळं...आणि आता यशच्या स्वागताची हि तयारी , देवाला नैवेद्य हे सगळं करायला सूचण हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे...आणि प्रेम सुद्धा किती करते मुलांवर...आणि आम्हा सगळ्यांना तर अगदी आपुलकीने जपते..." आत्या सुनेच्या कौतुकात मग्न होत्या...
विनय आनंदाने प्रियाकडे बघत होता ... सिद्धी आणि नेहा प्रिया बरोबर यशला सरप्राइज देण्यासाठी ग्रीटिंग करण्यात गुंतलेल्या होत्या...बायकोच्या अभिमानाने विनयच हृदय भरून आलं...!
बराच वेळ झाला तरी अनिता , सुजय आणि यश घरी आले नाहीत...वाट बघून सगळे कंटाळले तसा विनयने सुजयला फोन केला पण त्याने उचलला नाही , अनिताने सुद्धा फोन उचलला नाही...विनयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली....


पुंढे काय होईल ? यश घरी आल्यामुळे सगळ्यांची चिंता खरंच मिटेल ना ? प्रोग्राम नीट पार पडेल का ? जाणून घेऊया पुढील भागात...!

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून पात्र किंवा घटनेतील साधर्म्य केवळ योगायोग समजावा ! यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही...फक्त निखळ मनोरंजन करण्याचा मानस आहे !!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing