मकर संक्रात - 14 जानेवारी 2022..

Sankrant
मकरसंक्रांत हा सण १४ जानेवारी आणि लिप वर्ष असल्यास १५ जानेवारीला असतो. या दिवसांमध्ये उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात. या वर्षी 14 जानेवारी ला च संक्रात आली आहे.

भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवशी साजरा होणाऱ्या मकर संक्रांत या सणाला महाराष्ट्रात शेतकीय महत्त्व देखील आहे. हरभरा, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ असे सर्व पदार्थ देवाला अर्पण केले जातात.

संक्रांतीच्या दिवशी सर्व कुटुंबीयांना, आप्तेष्टांना व शेजारी-पाजारी सर्वांना तिळगुळ वाटले जातात. “तिळगुळ घ्या गोड बोला” असे बोलले जाते. तिळगुळ वाटण्यातून सर्वांप्रती असणारा स्नेहभाव व प्रेमभाव दर्शविला जातो.

स्त्रियांसाठी मकर संक्रांती दिवसापासून हळदी-कुंकू लावण्यास सुरुवात होते. हळदी-कुंकू लावण्याचा शेवट “रथसप्तमी” या दिवशी होतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी काळी साडी नेसण्याची प्रथा देखील आहे.

तिळात खूप स्निग्धता असल्याने त्याचा वापर तिळगुळ बनवण्यात करतात. स्नेहाची गोडी वाढावी म्हणून गुळात टाकून तिळगूळ बनवले जातात. येथे स्नेह म्हणजे तिळ असे अभिप्रेत आहे, तर गूळ हा गोड पदार्थ म्हणून प्रचलित आहे.

या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो . मकर संक्रांती पासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते तसे दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो व रात्र लहान होऊ लागते .

मकर संक्रांत हा सण देशातील विविध राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.जसे महाराष्ट्रात – मकर संक्रात ,तामिळनाडू – पोंगल ,गुजरात व राजस्थान – उत्तरायान ,पंजाब कर्नाटक ,केरळ ,बिहार ,आंध्रप्रदेश – संक्राती ,आसाम – बिहू इत्यादी.

सर्वांना मकर संक्रांती च्या खूप खूप शुभेच्छा...

नमस्कार. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )