"आईना चश्मा देऊन खाली येत होती आणि तिचा पाय घसरून खाली आली ती...बघवत नव्हत भाऊजी माझ्या लेकीकडे..माझी मायु...शुद्ध हरपली ओ तिची.."सारिका रडत रडत सांगू लागली. सागर पण खुर्चीत डोक्याला हात लावून बसला होता.
"वहिनी..तुम्ही शांत व्हा बघू आधी अस रडू नका आणि आई तुम्ही जास्त स्ट्रेस घेऊ नका बर..गिरीश..मी आईंना आणि कियांशला घेऊन घरी जाते. तू इकडे सांभाळ तोवर..!"कियारा
"नाही नाही..माझ्या मायुला बघितल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही.."वत्सला ताई रडत रडत बोलत होत्या.
"हे बघ आई.. कीयारा बरोबर बोलतेय.. तू घरी जाऊन रिलॅक्स कर जरा..बघ काय अवस्था करून घेतली आहेस रडून रडून आणि आपली मायु शुद्धीवर आली की मी फोन करेनच ना..तू जा घरी आणि आराम कर जरा.. कियारा..जा तू दोघांना घेऊन आणि गाडी सावकाश चालव पोचलीस की एक कॉल कर." गिरीश सूचना करत बोलला. कियारा पण होकारार्थी मान हलवत चावी घेते आणि दोघांना घेऊन घरी जाते.
इकडे आय.सी.यू मधे मायरावर उपचार सुरू असतात. डोक्यातून रक्तस्त्राव जास्त झालेला असतो पण दोन अडीच तासांनी डॉक्टर आय.सी.यू मधून बाहेर येऊन मायरा आऊट ऑफ डेंजर असल्याचं सांगतात. गिरीश लगेच घरी फोन करून कळवतो.
कियारा पण मायरासाठी डाळ तांदळाची मऊ खिचडी बनवते आणि इतरांसाठी पोळीभाजी बनवून हॉस्पिटलमधे जाते. मायराला वॉर्ड मधे शिफ्ट केलेलं असत. काहीवेळाने मायरा शुद्धीत येते.
"मम्मा....मम्मा.." डोळे कीलकीले करत मायरा सारिकाला आवाज देते.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे
क्रमशः
@श्रावणी लोखंडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा