संक्रांत कुणावर?(भाग चार)अंतिम

सण कधीच वाईट नसतात


‌"कस आहे माझं पिल्लू.. हा.. बर वाटतेय का आता?डोकं दुखतय का ग खूप?" सारिका लेकीचा हात हातात घेऊन भरल्या डोळ्यांनी तिला विचारत होती.

"मम्मा..रडू नको. मी तुझी स्ट्राँग गर्ल आहे ना! मी रडते का बघ." आपल्या छोटुश्या हाताने डोळे पुसत मायरा बोलत होती.

"हो मग..आमचा बच्चा आहेच स्ट्राँग..ही मम्माच रडवी आहे.." सागर डोळ्यातलं पाणी लपवत बोलला.

"चला चला.. आता डॉक्टरांनी जेवायला सांगितल आहे. काकूनी मस्त मऊमऊ खिचडी आणली आहे. गुड गर्ल सारखी खाऊन घ्या आणि थोडा आराम करा म्हणजे पटापट बरं होऊन आपण मस्ती करूया." कीयारा वातावरण हलक करायला बोलली.
********
संध्याकाळी वत्सला ताई आल्या...

"ए माझं पिल्लू... कस वाटतंय ग आता...आणि अशी ग कशी पडलीस? नुसती धावत पळत असतेस.. लक्ष नसत कुठेच. हजारदा सांगितल आहे धावत जाऊ नको शिड्यांवर पण ऐकत नाही कुणाचं.."वत्सला ताई नातीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलत होत्या.

"आज्जी..मी ठीक आहे आता आणि तू पण मम्मा सारखी रडू नको..मी लवकर बरी होणार."मायरा आज्जीला समजावत बोलली.


"हो ग आमची आज्जी बाई.." वत्सला ताई तिचा पापा घेत बोलल्या.

"पण आज्जी..मी जर काकू सोबत गेले असते तर पडले नसते ना ग..तू का नाही मला पाठवलं?" मायरा चेहरा पाडत बोलली.

"अगदी बरोबर..आई.. अहो आपले सण कधीच आपल्यावर किंवा आपल्या मुलांवर येत नसतात अहो. संक्रांत आहे म्हणून तुम्ही मायू ला पाठवलत नाही पण काय झालं? ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडतातच. तुम्ही..मी किंवा आणखी कोणीच ते रोखू नाही शकत. आपणच जर आपल्या सणांबद्दल अशी अफवा पसरवली तर बाकी लोक काय शिकणार त्यातून? एक मॅसेज व्हॉट्स ॲपवर फॉरवर्ड काय होतो त्याची कोणतीही शहानिशा न करता आपण तो सगळ्यांना पाठवत राहतो. त्यावर वायफळ चर्चा देखील करतो पण हा मॅसेज आला कुठून त्यात किती तथ्य आहे याचा विचार करतो का? मोठी माणस काहीतरी विचार करून बोलत असतील पण काही गोष्टींचा विचार मोठ्यांनी देखील करून बघावा. आज जर मायू आमच्या सोबत आली असती तर हा अपघात झाला नसता. यावरून इतकं तरी लक्षात घ्या आई.. जे व्हायचं आहे ते त्यावेळी होणारच आणि आपले सण कधीच आपल्या मुलांचं वाईट चिंतणार नाही." कियारा वत्सला ताईंच्या हातावर हात ठेवत बोलली.

वत्सला ताई काही न बोलता फक्त डोळ्यातलं पाणी झरू देत होत्या...
समाप्त...
(आपल्या सणा वारांवर जर आपणच शंका घेतली तर आपण इतरांना काय शिकवणार. संक्रांत हा सण नव्या वर्षात सगळ्यांच्या आयुष्यात गोडवा भरण्याचा गोड सण आहे. कुठलीही चुकीची माहिती पसरवून अंधश्रध्देला पाठिंबा देऊ नये. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफ करा.)
धन्यवाद...
@श्रावणी लोखंडे.

🎭 Series Post

View all