सनकी मैत्रीण

राधा:"स्मिता,माझ्या लग्नाला पाच वर्षे झाले पण पाच दिवस सुखाचे नाही,माझा नवरा मला रोज मारझोड करतो,दारू पितो... म्हणून मी अश्या व्यक्तीच्या शोधात होते ,जो मला समजून घेईल"स्मिता:"अगं, पण मग हे असे कोणालाही आयुष्यात आमंत्रण द्यायचे का??



राधाचा रोजचा दिनक्रम होता मॉर्निंग walk ला जाणे..
आजही चिंटू शाळेत गेला आणि राधा walking ला गेली.
मोबाईल खिशात आणि मस्त कानात हँडस फ्री घालून ती गाणी ऐकत असे.आजही तेच केले..

सकाळची थंड हवा.कोवळी किरणे .अगदी प्रसन्न वाटत होते. आजूबाजूला हिरवीगार झाडे. पानावर पडलेले दवबिंदू. टपरीवरच्या वाफाळत्या चहाचा सुगंध. रोजचेच चेहरे होते.लहान मूल खेळत ,बागडत होती.80 पार केलेले आजोबा व्यायाम करत होते .फुलपाखरं ह्या झाडावरून त्या झाडावर फिरत होती.

तितक्यात पाठी कोणीतरी हात ठेवला.पाहते तर पाठी स्मिता होती.स्मिता तिची कॉलेजची मैत्रीण. क्षणभर राधा चकीत झाली.खूप वर्षांनंतर दोघी भेटल्या होत्या.दोघीही खुश झाल्या.

स्मिता:"ओळखलं का??

राधा:"हो ,स्मिता ना?

स्मिता:"हो स्मिता"

राधा:"अगं किती बदलली आहेस गं"

दोघीनी मिठी मारली..

डोळे भरून एकमेकींना पाहिले.

स्मिता:"हो गं काळानुसार बदल होतातच ,बरं ते सोड .तू कशी आहेस?कुठे असते?


राधा:"अगं मी इथेच स्वतःच घर घेतले आहे..पाच वर्षांपूर्वी लग्न झाले,तीन वर्षांचा मुलगा "


स्मिता:"ओह ग्रेट"


राधा:"तुझं काय चालू आहे?तू सांग कशी आहेस?


स्मिता:"माझी लग्नाची शोध मोहीम सुरू आहे.शिक्षणासाठी बाहेरगावी होती .कोणाचाच संपर्क नव्हता.. आता आले..मी कंपनीत नोकरी करते. आताच आम्ही इथे शिफ्ट झालो.मी इथे घर घेतले"


राधा:"भारीच की,आता रोज भेट होईल आपली"


स्मिता:"हो ,आता रोजच भेटू,मी सुद्धा रोज येते walking ला"


राधा:"मस्तच,चल छान चहा घेऊया, इथे मस्त चहा भेटतो"


स्मिता:"चालेल ,चल"


दोघीही टपरीवर चहा पिण्यासाठी गेल्या..
कॉलेजच्या गप्पा सुरू झाल्या.


राधा:"तुला आठवते का आपली पहिली भेट?"


स्मिता :"आपली पहिली भेट विसरणं शक्य आहे का?"


राधा हसू लागली.

स्मिता:"तुला तर हसूच येणार, चांगली माझी फजिती केली होतीस"


राधा:"धम्माल आली होती,कसा झाला होता तुझा चेहरा..तुझा फोटो काढला होता मी तेव्हा, आजही जपून ठेवला आहे बघ"


स्मिता:"तू ना राधा खरंच वेडी होतीस बघ"


राधा:"वेडी होती म्हणजे ,आताही आहे"


स्मिता:"पण मला सांग हे तू का केले??


राधा:"अगं, काय झालं माहीत आहे ती सारिका होती ना तिच्यात आणि माझ्यात पैज लागली.वर्गात जी पण मुलगी पहिली येईल ना ,तिला पुन्हा वर्गाच्या बाहेर पाठवायचे..तब्बल 500 रुपयांची पैज होती..मग काय तू मला भेटली.नवीनच तुझं ऍडमिशन, माझी करामत माझ्या पूर्ण वर्गाला माहीत ,फक्त तुला सोडून"


स्मिता:"म्हणूनच तर फसले मी"


राधा:"मग मला युक्ती सुचली"


स्मिता:"हो माहीत आहे काय युक्ती सुचली"


राधा:"आठवतंय काय म्हणाली होती मी "

स्मिता:"चांगलच आठवतंय,आलीस आणि म्हणाली तुला हेड मॅम नी बोलवलं आहे,मी सुद्धा घाबरली. आल्या पावली परत.मॅडम कडे गेली आणि विचारले ,तुम्ही बोलवलं का मला.त्या नाही म्हणाल्या. कश्या बघत होत्या त्या मला.आणि तुम्ही सगळे पाठून हसत होता.रडूच आले मला.मनात विचार केला ,कॉलेज change करावे.


राधा :"ए पण तुझा चेहरा आजही विसरली नाही बघ"


स्मिता पण हसू लागली.तुझ्या सारखी तूच होतीस.स्मिता म्हणाली.


राधा:"आजही काही कमी नाही हा मी"


स्मिता:"आता तू काही चॅलेंज घेऊ शकत नाही,मला तर अजिबात वाटत नाही"

राधा:"demo बघायचा"


स्मिता:"दाखव बरं demo"


राधाने आजूबाजूला पाहिले..

एक व्यक्ती बसला होता ...

त्याच्याकडे ईशारा करत म्हणाली.

"स्मिता,बघ हा जो पाठी माणूस मोबाईल मध्ये डोकं घालून बसला आहे ना , त्याला प्रपोस करणार"


स्मिता :"अगं वेडी आहेस का काय?"
असे कोणत्याही व्यक्तीला जाऊन प्रपोस करणार म्हणतेस,काहीही चॅलेंज नको घेत बसू. मला काही पटलं नाही तुझं हे असलं वागणं,लग्न झाले आहे ना तुझं,मुलगा आहे .कसंही वागायचे का राधा? आता तू काही कॉलेजमध्ये नाहीस ,ह्याचे भान ठेव. तू लहान राहिली नाहीस"


राधा:"अगं ,ठीक आहे गं,दिसतोय भारी हा तो...मला तर जाम आवडला.

स्मिता क्षणभर विचारात पडली हिला काय वेड लागले की काय?..

राधा:"दोन मिनिट हा,जरा चिंटूच्या मॅडमचा फोन येतो आहे ,आलेच मी."


राधा जरा लांब गेली..


इथे स्मिताला काही तीचे वागणे पटेनाच..


तिने विचार केला ,ह्या राधापासून चार हात लांब राहिलेलं बरं, कशीही डोक्यावर पडल्यासारखी वागते..परपुरुषावर नजर .कसली विचित्र वागते आहे.कसलेच भान नाही..


राधा आली.

राधा:"स्मिता,बघ मी चॅलेंज accept केले हा"

स्मिता:"तू असं काही करणार नाही"


राधाने स्मिताकडे दुर्लक्ष केले..

राधाने त्या माणसाला आवाज दिला.तोसुद्धा लगेच आला.

स्मिताला फारच असहज वाटत होते.


राधाने हात मिळवला.

तो माणूस राधाकडे पाहून हसत होता.

राधाने त्या माणसाला त्याचे नाव विचारले..

स्वतःचा फोन नंबरही दिला..

स्मिताला फार राग आला.असे अनोळखी व्यक्तीला आपली माहिती कशी काय देऊ शकते राधा..?


नंतर त्या माणसाने राधाचा हात पकडला..

स्मिताला वाटले ,राधा काहीतरी बोलेल, पण राधा अगदी नॉर्मल गप्पा मारत होती.

राधा स्वतःहून उद्या कुठे भेटायचे चर्चा करू लागली..


स्मिता राधाला म्हणाली:"अगं ,काय हे राधा.असे अनोळखी पुरुषासोबत वागायला बरं वाटतं का?"


राधा:"शांत हो स्मिता, चालतं गं हे सगळं. इतकं ओव्हर रिऍक्ट नको करुस"


स्मिता:"अगं ,पण तुझ्या नवऱ्याला हे सर्व कळलं तर?"

राधा:"नाही कळणार त्याला काही"


स्मिता:"अगं ,ए बाई वेडी झालीस का तू ?अशी डोक्यावर पडल्यासारखी काय वागते. बालबुद्धी,

स्मिता त्या माणसाला पाहून बोलू लागली.."ओ मिस्टर ,तुम्हालाही कळत नाही का. तुम्हाला दिसत नाही का हीचे लग्न झाले आहे.खुशाल हात पकडून बसला आहात तिचा.सगळे पुरुष असेच असतात..


राधा स्मिताला म्हणाली.."तू माझ्यासोबत बाजूला ये जरा,काही बोलायचे आहे"


स्मिता:"मला काही बोलायचे नाही तुझ्याशी..जातेय मी"


राधा:"प्लिज स्मिता एकदा ऐक ना माझे"


स्मिता:"बोल लवकर कय बोलायचे ते ,मला उशीर होतो आहे"


राधा:"स्मिता,माझ्या लग्नाला पाच वर्षे झाले पण पाच दिवस सुखाचे नाही,माझा नवरा मला रोज मारझोड करतो,दारू पितो... म्हणून मी अश्या व्यक्तीच्या शोधात होते ,जो मला समजून घेईल"


स्मिता:"अगं, पण मग हे असे कोणालाही आयुष्यात आमंत्रण द्यायचे का??


राधा:"माहीत नाही गं,ह्याला पाहिले आणि असं वाटलं हाच माझ्या जीवनाचा साथी. first sight love"


स्मिता:"मला तुझं काही कळत नाही. तु आधी डिवोर्स घे नवऱ्याकडून आणि मग काय पुढे पाऊल उचल, हे असे नको वागू भरकटल्या सारखे"


राधा:"मी भरकटले होते पण आता नाही,आता मी योग्य मार्गावर आहे,हाच तो ज्याच्या मी शोधात होते"


स्मिता:"चल मी जाते"


राधा:"स्मिता थांब ना थोडा वेळ प्लिज,किती वर्षाने भेटतो आहोत.नको ना जाऊ"


स्मिताची इच्छा नव्हती पण तरीही ती थांबली.


राधा त्या व्यक्तीला म्हणाली : "मला तुम्ही आवडला,लग्न कराल माझ्याशी"


स्मिता पहातच बसली..

तो व्यक्ती:"हो चालेल ना,मी आहे लग्नाला तयार"


स्मिताने कपाळावर हात मारला..

ती आता काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला विश्वासच बसत नव्हता की राधा अशी वागते आहे..


स्मिता रागातच उठली...


निघू लागली..

तोच राधाने तिचा हात घट्ट पकडला ..

मोठमोठ्याने हसू लागली..ती व्यक्तीही हसू लागला..


स्मिताचा पारा चढला.


तो व्यक्ती राधाला म्हणाली "राधा ,पुरे आता.मैत्रीण आहे ही,इतकेही छळु नये"


स्मिताला काही कळेना.दोघे हसू लागले.

स्मिता:"काय चालू आहे तुमच्या दोघांचे?"


राधा हसू आवरत म्हणाली..

स्मिता,हे जे समोर बसले आहेत ना माझ्या ,त्यांची ओळख करून देते..राज कदम .माझे पतीदेव..


स्मिता :"काय ?हे तुझे Mr??

राधा :"हो गं,हे माझे Mr. आहेत... आम्ही दोघांनी मिळून तुझी फजिती केली.."


स्मिताने राधाच्या पाठीत धपाटा मारला..

"तू ना राधा,खरंच वेडी होती,आहेस आणि राहशील.. किती विचित्र वाटलं माहीत आहे मला हे तुझं असं वागणं.. आणि जीजू तुम्ही सुद्धा तसेच.. दोघांनी चांगलीच माझी फजिती केली"


राज:"हे बघ,हे सर्व तुझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून .मघाशी तिने फोन करून मला acting करायला लावली आणि मी केली.पण sorry हा."


राधा:"sorry काय,हक्काची मैत्रीण आहे..मी तर अशीच वागणार,काय स्मिता आता इतक्या वर्षांनंतर भेटलो आहोत तर,भेट लक्षात राहायला हवी ना??

स्मिता:"हो गं बाई,ही भेट कधीच विसरणार नाही,तुला साष्टांग दंडवत .


असे म्हणत तिने कोपऱ्या पासून हात जोडले...



तिघेही आता खळखळून हसत होते..

समाप्त.


राधासारखी अवखळ मैत्रीण असेलच तुमच्या आयुष्यात, नक्की कंमेंट मध्ये सांगा...

लेख आवडला असेल तर लाईक, शेअर ,कंमेंट जरूर करा..मला फॉलो करायला विसरू नका..

©®अश्विनी कुणाल ओगले..