संकल्प गोड खाण्याचा

माझा नवीन संकल्प...
प्रशांत हा एक गोड खाऊ मुलगा आहे.. गोडाधोडाच जेवणं केल तरी जेवण झाल्यावर एखादा लाडू किंवा तत्सम गोड पदार्थ .. काहितरी हवंच त्याला...!
त्याला व्यायाम वगैरे गोष्टी बोरिंग वाटतात.. दर वर्षी तो एक संकल्प करतो..

' या वर्षी पासून दिवसातून एकदाच एक गोड पदार्थ खायचा..'आणि या मुलाला.. जेवायला आमरस खाऊन सुध्दा त्याला दोन ग्लास मँगो मिल्क शेक हवा असतो..
आज महिन्याच्या सुरवातीला त्याने संकल्प केला आहे.. नेहमी सारखा.. आज पासून गोड गोड बंद... हे सगळं तो वहीत लिहीत होता..

मगाच पासून त्याच्या कडे बघणार महेश त्याच्या समोरची वही उचलुन बघतो.. आणि त्याने लिहिलेला संकल्प वाचतो... त्याला विचारतो...

" हे तु लिहिलं आहेस..?.." महेश

" हो.." प्रशांत

" तु खरचं गोड खाण सोडणार आहेस..?.." महेश आश्चर्याने विचारतो..

" हो ss...!.. " तो समोरच्या वाटीतला एक घास घेत म्हणाला..

" कधी पासून..?."

" एक तारखे पासून.." तो दुसरा घास खात म्हणाला..

" मग तू हे गुलाबजाम का खात आहेस...?.."

"अरे महीना सुरू व्हायला अजून पंचवीस दिवस बाकी आहेत.. म्हणून मी आधीच गोड खाऊन घेतो.." प्रशांत कुल पणे म्हणाला..

" आणि हे काय आहे..?.."  महेश वहीच पुढचं पान उलटून वाचत त्याला विचारतो...

" यादी..!.." प्रशांत अजुन एक गुलाब जाम खात म्हणाला..

"इतकी मोठी..!.." महेश आश्चर्याने विचारतो..

" मग आता गोड पदार्थ खायचे सोडायचे आहेत तर या महिन्यांत सगळे गोड पदार्थ एकदा मन भरून खाऊन घेतो..." प्रशांत..

अजून एकदा गुलाब जाम वाटीमध्ये वाढून घेत म्हणाला... आता त्या वाटी मध्ये पाच सहा गुलाबजामचा डोंगर ... वाढून घेतला होता त्याने..

तर त्या वही मधील गोड पदार्थांची यादी बघुन महेशला भोवळ यायला लागली होती ...

प्रशांत ने त्याला आठवणारे सगळे गोड पदार्थ एका कागदावर लिहून ठेवले होते.. तीच यादी महेश वाचत होता.. की प्रशांतच्या पुढच्या बोलण्याने तो चक्करच यायला लागली ...

" महेश.. मी गोड पदार्थ खायचे बंद करणार आहे ते सेलेब्रलेशन साठी मस्त पैकी सहा सात थरांचा ' फ्रेंच स्टाइल सेव्हन लेअर गातो 'केक ऑर्डर कर..!.. आणि त्याच्या सोबत पिस्ता बाखलावा.. चंपाकळी.. आणि रसमलाई.. म्हैसुर पाक .. झालंच तर जिलबी.. श्रीखंड.. बासुंदी.. s.... "

पुढची त्याची यादी ऐकायला महेश शुध्दीवर नव्हता... तो कधीच खाली पडला होता... चक्कर आली होती त्याला.. प्रशांत च्या गोड न खाण्याचा संकल्पाच सेलेब्रशन बघुन...