सून नाही ती - लेक आहे आमची ( भाग - 8 )( अंतिम भाग ).

Sanika


( मागच्या भागात आपण बघितले - सानिका स्नेहल ला कॉल करते आता पुढे....)

           सानिका - स्नेहल ला विचारते कि तुझ्याकडे त्या हॉटेल चा नंबर आहे कां, स्नेहल हो बोलते आणि नंबर व्हॉट्स अप करते सानिका ला..... सानिका त्या हॉटेल मध्ये कॉल करून विचारते कि तुमच्याकडे सी सी टीव्ही ची सिस्टिम आहे कां, तर ते हो बोलतात.. सानिका मनातल्या मनात लगेचच देवाचे आभार मानते... पण ते हॉटेल वाले बोलतात...आम्हाला ते फूटेज असं कोणालाही द्यायची परमिशन नाही आहे.... सानिका बोलते तुमचा पत्ता द्या मला येऊन तुम्हाला भेटून सांगते कि कां मी हे फूटेज मागतेय... तेव्हा ते बोलतात बरं ठिक आहे या तुम्ही....

       सानिका सासू ला बोलते आई आता मला तिकडे ते फुटेज आणायला जावे लागेल.. मग पारस ला काय सांगणार कुठे जातेय ते... तर आई बोलतात तू जा मी त्याला सांगते कि कोल्हापूर ची माझी बहीण म्हणजे तुझी मावशी आजारी आहे तीला बघण्यासाठी सानिका दोन दिवस जाते आहे... हो चालेल असच सांगु... सानिका बोलते...

       सानिका दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला जायला निघते..चार तासांनी हॉटेल वर पोचते.. आणि त्या मॅनेजर ला विचारते तर तो आधी  मॅडम नाही देऊ शकत फुटेज...कितीही गरजेचं असलं तरी अशी कारण देतो, मग सानिका तिच्या एका पोलीस मित्राला फोन लावते आणि सांगते ह्या मॅनेजर बरोबर बोल.. मग त्या मित्राने दम  दिल्यावर मॅनेजर फूटेज दाखवतो सानिका ला... स्नेहल बोलते ते सगळं खरं असत.. त्यात स्नेहल ला धमकावंल्या चे पण फुटेज असत.. सानिका ते स्वतः कडे घेते आणि त्या मॅनेजर चे आभार मानून निघते...

        दुपार होत आलेली असते म्हणून सानिका एका हॉटेल मध्ये जेवायला थांबते आणि तिथे बसून विचार करते काय आणि कसं करू याचा.... सानिका च्या डोक्यात एक कल्पना सुचते.... ती म्हणते ह्यातलं थोडंसं कट करून स्नेहल ला धमकी दिलेला विडिओ पारस च्या ऑफिस मध्ये दाखवते मी.... पण ह्यात स्नेहल ची मदत लागेल.. तीला विचारते कि हे करता येईल कां... आणि आईंबरोबर पण हे सगळं डिस्कस करायला हवं.... सानिका - स्नेहल ला कॉल लावते आणि बोलते कि हे सगळं ऑफिस मध्ये सर्वांसमोर मला दाखवायचे आहे काय करता येईल... स्नेहल बोलते ताई नको अहो माझी बदनामी होईलं...... सानिका बोलते अग माझ्यावर विश्वास ठेव मी काहीही वावग दाखवणार नाही.....

       स्नेहल बोलते ताई - दुपार च्या वेळेत हे मी कॉपी करून घेते तुमच्याकडून, तुम्ही मला गुपचूप ऑफिस च्या खाली भेटायला या उदया दुपार चं... मग आपण भेटल्यावर ठरवू काय करायचं ते... सानिका हो चालेल बोलते... सानिका रात्रभर विचार करते कि काय करता येईल ह्याचा... सानिका बोलते कि स्नेहल ला सांगते तूझ्या ऑफिस मधल्या अजून कोण लेडीज कलीग असेल तर तिच्या कॉम्पुटर वर दुपारी सगळे जेवत असतील तेव्हाच हे लंच टाइम ला गुपचूप ऑन कर.म्हणजे आवाजाने सगळेच तिकडे बघतील.... आणि तो वेळ मला पण सांग म्हणजे मी पण त्या वेळी तिथे पोचते...

       स्नेहल - सानिका ने सांगितलं तसं करते आणि सानिका ला कळवते ताई मी तयारी केली आहे सर्व दुपारी लंच टाइम ला सगळे एकत्र असतील तेव्हाच ते मोठया आवाजात चालू होईल... ताई पण प्लीज तुम्ही पण याल ना वेळेवर मी एकटीच घाबरून जाईन.. सानिका बोलते तू काळजी करू नकोसं मी येते वेळेवर...

       सानिका ऑफिस खाली आल्यावर स्नेहल ला मेसेज करते मी येतेय वर तू विडिओ चालू कर असा... सानिका ला पण खरंतर मनातून वाईट वाटत असत कि आपल्या चं नवऱ्याबद्दल आपण हे असं सगळ कारस्थान करतोय.. पण ती म्हणते.... हे आज नाही केलं तर उदया अजून कोणतरी दुसरी मुलगी ह्याला बळी पडेल... आणि ती मन घट्ट करून ऑफिस मध्ये जाते तेवढ्यात तो विडिओ ऑन होतो सगळेच त्या दिशेने धावतात... पारस आणि तो दुसरा कलीग हा तर आपला आवाज आहे... असं बोलून पळतच जातात.....

       विडिओ ऑन होतो, सगळे पारस आणि त्या कलीग कडे बघू लागतात... आणि रागाने बघू लागतात.. तेवढ्यात सानिका समोर येते... आणि  पारस च्या बॉस ला बोलते सर आता तुम्हीच ह्या दोन नराधम माणसांना शिक्षा द्या... बॉस पण खूप चिडतात आणि बोलतात.. तुम्हा दोघांना मी आताच्या आता कामावरून काढून टाकतोय....... बॉस स्नेहल ला पण बोलतात तू बोलली कां नाहीस स्नेहल हे सगळं अग तू माझ्या मुलीसारखी आहेत एकदा बोलली असतीस तरी मी ह्यावर ऍकशन घेतली असती.. स्नेहल बोलते सर हे दोघे मला सतत नोकरी जाईल अशी भीती घालत असायचे... म्हणून मी बोलली नाही... सानिका घरी जायला निघते...

         सानिका घरी पोचते तिच्या पाठोपाठ पारस ही घरी पोचतो.. आणि दरवाजातुन चं सानिका वर जोरात ओरडायला लागतो.....कोणी सांगितलं होत तुला हा शहाणपणा करायला नोकरी घालवलीस ना माझी... तेवढ्यात सानिका ची सासू बाहेर येते आणि बोलते आता हे घरं पण तुझं नाही... ह्या घरातून पण मी तुला बाहेर काढतेय... आताच्या आता निघून जायचं घरं सोडून... पारस रडतो आई काय बोलते आहेस तू हे मी वारसदार आहे ह्या सगळयांचा हे घरं आता बाबांच्या नावावर असलं तरी भविष्यात ते माझ्याच नावावर होणार आहे...

       आई बोलते... हे घरं मी कालच माझ्या एकुलत्या एक लेकीच्या म्हणजे ( सानिका ) च्या नावावर केलंय... आता तुझ्या सारख्या नीच वृतीच्या माणसाला आमच्या सभ्य माणसांच्या घरात जागा नाही... तू इथून चालत व्हायचं... पारस चे बाबा बोलतात... मी सुरवातीला सानिका च्या बाजूने नव्हतो खरं तर... पण मग विचार केला ह्या दोघींचे बरोबर आहे तुझी ही विकृत वृत्ती फोफावत जाईल... त्यापेक्षा ह्या गोष्टीला आळा बसला पाहिजे.. म्हणून मी पण घरं सानिका च्या नावावर करायला परमिशन दिली...

       पारस ला आता बोलायला काहीच उरत नाही.. तो बेडरूम मध्ये जातो आणि त्याची बॅग भरून घेऊन येतो आणि निघताना सानिका ला बोलतो मला दुसरीकडे नोकरी मिळेल...  मी माझा माझा जगेनच... पण तू कशी करशील गं तूझ्या त्या कमी पगारात सगळं... आता आई बाबा नाचतायत तूझ्या पाठून पण बघ तू ते मला पुन्हा बोलावतील लवकर चं घरी......सानिका ला रडायला चं येत....

         आणि मग पारस निघून जातो...... पारस सुरवातीला सात - आठ दिवसांनी रोज यायचा बाळाला बघायला पण आई त्याला घरात  घेत नसतं सरळ  बोलत बाहेर बसं उंबरठ्यावर आणि बाळाला बघ आणि जा... मग कंटाळून पारस ने सहा महिन्यानी येणंच बंद केलं...आणि त्या नंतर त्याने मोबाईल नंबर पण बदलला..

       आई - बाबा, मी आम्ही तिघेही त्याला एक वर्षाची शिक्षा देऊन पुन्हा घरी बोलावणार होतो.. पण मनातून वाटे - काय चूक होती आई - बाबांची - त्यांचे संस्कार तर चांगलेच होते, माझी काय चूक होती कि पारस ला मी अशी आवडेनाशी  झाले आणि त्याच्यात ही दुसऱ्या कोणावर तरी जबरदस्ती करण्याची घाणेरडी विकृती आली. त्यामुळे नको वाटे त्याला बोलवायला... आता सध्या त्याचा मोबाईल नंबर नसल्याने तो कुठे असतो हे घरात कोणालाच माहीत नाही...

       आणि मग अशाप्रकारे सानिका कायम ची त्यांची लेक बनून राहू लागली.. शेजारी पाजरी विचारू लागले म्हणून सानिका सासू - सासर्यांना घेवून दुसरीकडे राहायला गेली... ..आणि आई - बाबांचा मुलगी  म्हणून सांभाळ करू लागली....घरचं सगळं व्यवहार एकटीच समर्थ पणे सांभाळू लागली.. सुरवातीला तीला खूप जड गेलं हे सगळं चं पण हळू हळू जमलं.. तिलाही खूप दा पारस ची आठवन येई... पण सासूबाई तीला धीर देत असत......आयुष्य एकटीने चं जगायची तीला पण आता सवय होऊन गेली....

अशाप्रकारे ही कथा इथे संपते  आहे...पुन्हा भेटू लवकर चं एका नवीन कथेसह...

( लेखिका - सौ. सोनाल गुरुनाथ शिंदे )

( राहणार - देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all