सून नाही ती - लेक आहे आमची ( भाग - 6 )

Sanika


     ( मागच्या भागात आपण बघितलं कि सानिका - स्नेहल ला भेटायला जाते - आता पुढे....)

        सानिका - स्नेहल ला भेटल्यावर पहिला प्रश्न विचारते, ये स्नेहल बाई तुला काय हवंय आताच सांग काय ते..... कां माझ्या संसाराची वाट लावते आहेस.. तर ती गप्प चं बसते, सानिका ओरडून बोलते कां काय झालं आता कां गप्प आहेस - झाली चूक  पारस ची त्याबद्दल मी त्याला बरोबर करणार चं आहे.....त्याला शिक्षा देणारच आहे... मी त्याच्यावतीने तुझी माफी मागते ..... स्नेहल रडायला चं लागते... ताई मी काहीच बोलणार नाही नाहीतर मी कामं नीट करत नाही सांगून पारस  सर मला नोकरीवरून काढून टाकतील............मी त्यांच्या हाताखाली कामाला आहे ताई. .........ते बॉस आहेत आमच्या टीम चे.... प्लीज मला समजून घ्या ताई प्लीज... मला त्यांनी धमकी दिलीय कि मी आज तुम्हाला काहीच सांगायचं नाही आहे असं...काय मला सांगायचं नाही म्हणजे... मी भेटणार हे पारस बोलला ना तुला.. हो ताई म्हणून चं धमकी दिलीय त्यांनी तुम्हाला काही न सांगण्याची....

       सानिका विचारात चं पडली.... आणि बोलली.....अग बाई .......तू पैसे मागते आहेसना सारखे पारस कडे...... स्नेहल बोलली.... ताई मी फक्त दोनदाच पैसे माझ्या बाबांच्या ऑपेरेशन साठी  मागितले होते ते पण ऑफिस च्या पगारातून कट करून घ्या असं बोलले होते..ताई मी गरीब घरची मुलगी आहे... माझ्याकडे बाबांसाठी एवढे पैसे नव्हते, त्यात माझी आई पण कॅन्सर ने लहानपणी चं वारली आहे....मी खरंच बाबांच्या बायपास साठी चं फक्त पैसे मागितले होते... मी पाहिजे तर तुम्हाला हॉस्पिटल चे उदया पेपर्स दाखवते बाबा ऍडमिट असल्याचे...

        सानिका बोलली अग काय प्रकरण आहे हे... तू सांग नीट... तर स्नेहल रडायला चं लागली आता सानिका ला पण वाटू लागले कि ही मुलगी साधी दिसतेय तर आणि तशी गरीब पण वाटतेयं.... पण हे प्रकरण काय आहे मग... सानिका बोलली हे बघ स्नेहल मी कोणाला काहीच सांगणार नाही अगदी पारस ने विचारलं तरी मी काहीच बोलणार नाही त्याला....... मी पाहिजे तर माझ्या एकुलत्या एक मुलाची शपथ  घेते बसं... पण आता नीट सांग काय ते...... तेव्हा कुठे स्नेहल रडायची थांबली...

       सानिका बोलते अग पण मी तुमच्या दोघांचे फोटो बघितले आहेत विचित्र...त्या वरून चं मला हे प्रकरण कळले आहे............ स्नेहल बोलू लागली अहो ताई ते पारस नेच काढले आहेत.... आणि आता त्या फोटो वरून मला तो धमकी देतोय कि मी हे वायरल करेन अशी.. अग पण तुमच्या दोघांचे आहेत ते...स्नेहल बोलू लागली ताई बरेच माझ्या एकटीचे पण आहेत...आणि स्नेहल ने ते फोटो पटकन सानिका ला दाखवले.. हे मला पारस नेच व्हॉट्सअप केले आहेत... असं बोलली....सानिका ला पण आता वाटू लागलं कि ही मुलगी खरं बोलतेय....

       स्नेहल सांगू लागली - दोन महिन्यापूर्वी एका मीटिंग साठी ऑफिस मधून मी, पारस सर आणि अजून एक कलीग अशा आम्हा तिघांना पाठवलं होत... सानिका म्हणाली अग हो ते माहिती आहे मग तिथे काय घडलंय - स्नेहल रडून सांगू लागली ताई मीटिंग झाल्यावर एका हॉटेल मध्ये मला एक वेगळा रूम आणि पारस आणि अजून एक जेन्टस कलीग ह्या दोघांना एक रूम अशा दोन रूम्स बुकिंग केल्या होत्या...

      मीटिंग छान  झाली, आम्ही हॉटेल मध्ये चं जेवलो आणि वर आलो मी माझ्या रूम मध्ये गेली... ते दोघे त्यांच्या रूम मध्ये गेले... रात्री चे दहा वाजले होते मी पण फ्रेश होऊन झोपायला चं चालली होती, तेवढ्यात रूम चा दरवाजा वाजला... मी कोण आहे विचारलं तर पारस सर बोलले अग आम्ही दोघे आहोत मी त्यांना आत घेतलं आणि विचारलं काही कामं होता कां तर ते म्हणाले अग खाली गेलो होतो राऊंड मारायला तर थंडा घेऊन आलो होतो.. तर म्हंटल तुला पण द्यावा म्हणून आलो द्यायला...

        मी पण हो चालेल ना म्हंटल आणि मी तो थंडा पियाली... आणि मला झोप चं येऊ लागली.. काय झालं कळेचना... मी त्या दोघांना बोलू लागली मला झोप येतेय तर ते दोघं जोरात हसले मी घाबरली कि ह्यांनी काय टाकलं होत ह्यात.......पण मला बोलता बोलता झोप आली आणि मी पडली....आणि मग ह्या दोघांनी माझ्यावर बलात्कार केला ताई, त्यांनी काय मिसळलं होत त्या थंडा मध्ये काय माहित त्यामुळे मला गुंगी चं खूप होती डोळयांवर...मला प्रतिकार चं करता येत नव्हता...हे दोघं माझ्या नग्न शरीराचे फोटो पण काढत होते, दोघं माझ्या त्या तशा अवस्थेत माझ्या बाजूला बसून तसले घाणेरडे सेल्फी पण घेत होते...

        मी बेशुद्ध होऊ लागले होते पण हे दोघं तुटून पडले होते माझ्या शरीरावर... स्नेहल जोरजोरात रडू लागली... सानिका हे सगळं ऐकून हादरली.... काय अस जोरात बोलली... आणि मग सकाळी शुद्ध आल्यावर मी तातडीने निघाली तिथून तर ह्या दोघांनी मला रूम मध्ये घेऊन दरडावंल, धमकी दिली कि कोणाला हे बोललीस तर याद राख अशी, तू कोणाला बोललीस तर तुझा जॉब गेलाच असं समज असं बोलले...

           मग ऑफिस मध्ये हे दोघे पुन्हा मला त्रास देऊ लागले...आणि पुन्हा तीच मागणी करू लागले मी नाही नाही करत होते सारखी त्याचा त्यांना राग येत होता... माझ्या घरची परिस्थिती गरीब - बाबा पेशंट त्यात त्यामुळे मी जॉब सोडू शकत नाही हे त्या दोघांना चांगलेच माहीत आहे... त्यामुळे ते माझा वापर करतायत.

      ताई त्या नंतर पुन्हा एकदा ऑफिस च्या मिटिंग साठी ह्या दोघांनी मला नेलं होत तिथे चं तेव्हा पण जबरदस्ती केली माझ्यावर ह्यांनी... ताई मला ना आई ना बहीण मी हे कोणाला सांगू पण शकत नव्हती... मी कंप्लेंट तरी काय करणार होते ह्यांची... पुरावा कुठे होता माझ्याकडे आणि ह्यांनी पैसे दाबले असते ह्या प्रकरणात आणि स्वतः ला सोडवलं असत.. माझी उगाचच बदनामी झाली असती म्हणून मी ऍकशन घेतली नाही.. ताई प्लीज तुम्ही सोडवा ह्या सगळयातुन मला प्लीज....

        सानिका बोलली..... ( स्नेहल कां कोण जाणे पण मला तू बोलते आहेस ते सगळं खरं वाटतंय )....आणि पारस जे सांगत होता आतापर्यंत ते सगळं खोटं चं वाटत होत त्याने सांगितलेलं......त्यामुळे आता तू बघ मी त्या दोन नराधमांना काय शिक्षा करते ती.... तुझी ही सानिका नावाची बहीण आता तूझ्या पाठीशी आहे आता मी तुला ह्यातून सोडवणार चं तू आता काळजी करू नकोसं.... स्नेहल हे ऐकून सानिका ला मिठी मारून रडते...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सानिका पारस ला काय शिक्षा करते ते....)

( लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.)

( राहणार - देवरुख - रत्नागिरी )....


🎭 Series Post

View all