सून नाही ती - लेक आहे आमची ( भाग -5 )

Sanika

   

( मागच्या भागात आपण बघितले - सानिका ला - पारस आणि स्नेहल च्या अफेअर बद्दल कळतं -  आता पुढे.......)

           सानिका बोलते - पारस मी तुमचे फोटो बघितले आहेत - आता खरं  बोल काय ते -  पारस बोलतो ती स्नेहल आणि मी जेव्हा पहिल्यांदा मीटिंग साठी पुण्याला गेलो होतो... तेव्हा..... तेव्हा काय पारस बोल मी टेन्शन मध्ये आलीय.. सानिका बोलली.. आई पण रडू लागली होती एव्हाना..... बाबा पण ओरडले बोल काय करून बसला आहेस ते......

             मीटिंग संपल्यावर रात्री - एका मोहाच्या क्षणी मी आणि स्नेहल जवळ आलो आणि चुकून मी सगळ्या मर्यादा ओलांडून बसलो... चूक झाली माझी...... काय... असं बोलून सानिका रडायला लागली.. सासू ने पटकन सानिका ला जवळ घेतलं, आणि बोलू लागली....तू रडू नकोसं पोरी चूक पारस ची आहे तू त्रास करून घेऊ नकोसं स्वतः ला..... आई बोलू लागल्या.... मग आता पुढे... काय.....

        पारस बोलू लागला. ती स्नेहल आता सारखे पैसे मागते माझ्याकडे... काही ना काही कारण काढून... आणि नाही दिले पैसे तर धमकी देते कि ऑफिस मध्ये सगळ्यांना सांगेन असं....मग तू आतापर्यंत किती पैसे दिले आहेस तीला.....बाबा बोलले...पारस बोलला - आतापर्यंत एक लाख दिले आहेत.. बाबा म्हणाले अरे देवा....

          सानिका म्हणाली आतापर्यंत जे झाले ते झाले मला त्या स्नेहल चा मोबाईल नंबर दे... मी उदया भेटते तीला आणि विचारते ये बाई कां माझ्या संसारावर सावट आणते आहेस.... उदया चं भेटते संध्याकाळी तीला... बघू काय बोलते ते...सानिका ची सासू पण बोलली हो सानिका तू भेट आणि तीला चांगलीच ओरड... हे सगळं कधीपर्यंत थांबवणार आहेस ते पण विचार तीला.... पारस बोलतो अग सानिका थांब माझ्या प्रमोशन ला पंधरा चं दिवस उरलेत त्यात ह्या स्नेहल ने गोंधळ घातला तर माझी पोस्ट जाईल... हे ऐकून सानिका चांगलीच भडकली... अजून पण तुला प्रमोशन ची पडली आहे.. गेलं उडत तुझं प्रमोशन.... सानिका ओरडून बोलली....

     ...पण कां कोण जाणे सानिका ला अजूनही वस्तुस्थिती काहीतरी वेगळीच आहे असं वाटत होत... ती रडून पारस ला विचारते.... पारस मी शेवट चं विचारतेय हे सगळं खरं आहे ना कि तू  वेळ मारून न्यायला काहीतरी उगाचच आम्हाला सांगतो आहेस...पारस गप्प बसला.. आई बोलल्या अरे काय विचारतेय पोरगी अजून काही असेल तर सांग बाबा, ह्या वयात हे असं काही बाही ऐकायला नको वाटत.. एकदाच सांग सगळं खरं काय ते....

       पारस बोलतो सानिका माझ्यावर विश्वास ठेव, प्लीज हे पंधरा  दिवस थांब... माझं प्रमोशन झाले कि मीच त्या स्नेहल चा काटा काढतो बरोबर..मी तिची कंप्लेंट करतो बॉस कडे.. .अगदी काकूळतीला येऊन पारस बोलत होता... बाबा पण बोलले सानिका पंधरा दिवस थांबूया... पण प्रमोशन झालं कि एक दिवस ही आम्ही थांबणार नाही हा पारस.. हा बाबा चालेल असं पारस बोलला...

         सानिका ला वाटत होत कि अजूनही कुठे तरी पाणी मुरतंय, हा खरं बोलत नाही आहे असं... दुसऱ्या दिवशी उठल्यावर आई बोलतात - आजपासून पारस चं प्रमोशन होईपर्यंत त्याच्याशी घरातलं कोणीही बोलणार नाही..

      पारस ला बाळाला हात लावायची ही परमिशन नाही... त्याला कळूदेत कुटुंबाची किंमत... कोणीच त्याचं कामं करायचं नाही, तो त्याचं ताट स्वतः वाढून घेईल, आणि एकटाच जेवेल... त्याचे कपडे तोच धुवेल, त्याच्या जेवणाची भांडी तोच घासेल... सानिका ची किंमत कळूदेत त्याला... सानिका आणि बाबा हो बोलतात... पण पारस असं कां - बोलतो त्यावर आई बोलतात तुला शिक्षा नको कां.... ही शिक्षा काहीच नाही आहे ह्यातून अजून काय वेगळं कळले तर काय शिक्षा होईल ती बघ...

       घरात आता पूर्वीसारखं चैतन्य राहिलं नव्हत. सगळेच गप्प गप्प असायचे... आई - बाबा पण काळजीत होते.... सर्व चं एक एक दिवस मोजत होते... असं करता करता पंधरा दिवस होतात.. आणि मग एके दिवस पारस येऊन सांगतो माझं प्रमोशन झालं मी बॉस झालोय एका टीम चा.. कोणालाच आनंद होत नाही... सानिका बोलते स्नेहल चा नंबर दे... पारस ही नंबर देतो... सानिका  आई - बाबांनसमोर तिचा नंबर लावते तर फोन नॉट रिचेबल येतो... सानिका बोलते कां रे कॉल लागत नाही... पारस बोलतो आता मला काय माहित...

       सानिका दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा कॉल लावते आणि त्या स्नेहल ला बोलते मला तुला भेटायचं आहे तर ती सरळ नाही चं बोलते कां कशाला भेटायचं आहे, कां मी भेटू तुम्हाला... असं  बोलते, शेवटी सानिका भडकून बोलते तू भेटते आहेस कि मी ऑफिस ला येऊन तमाशा करू सरळ.... तेव्हा कुठे ती तयार होते...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - स्नेहल काय सांगते ते, पारस ने सांगितलेलं सत्य असत कि स्नेहल सांगते ते......)

लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.

( राहणार - देवरुख - रत्नागिरी )...

( कथा आवडल्यास जरूर लाईक करा...)

🎭 Series Post

View all