सून नाही ती - लेक आहे आमची ( भाग - 3 )

Sanika


 ( मागच्या भागात आपण बघितले - सानिका ला पारस चं वागणं बदललेलं वाटू लागल होत.....  आता पुढे...)

        सानिका - स्वाती ला सांगू लागली........मी आता जॉब ला जाऊ लागली होती, आई - बाबा बाळाला छान  सांभाळत होते, त्यामुळे राघव  ची तशी मला काळजी नव्हती.. पण पारस ला काय झाले आहे ते कळत नव्हते.. पारस आता माझ्याशी अंतर ठेवून वागू लागला होता... माझ्याशी नीट बोलत होता पण त्याच्या मनात  काय तरी चाललंय असं सतत मला वाटत राही...

         मी त्याला दोनदा विचारून ही बघितलं तर तो बोलला एका मोठ्या प्रोजेक्ट वर ऑफिस मध्ये काम चालू आहे ते प्रोजेक्ट मी लीड करतोय, ते प्रोजेक्ट जर फायनल झाले तर माझं लगेचच प्रमोशन पण होईल. मी आणि माझी एक कलीग स्नेहल मिळून आम्ही दोघं हे प्रोजेक्ट हॅन्डल करतोय.. त्यामुळे जरा त्या गडबडीत आहे सध्या, ते विचार डोक्यात चालू असतात... बाकी काहीच नाही...मला ही तेव्हा ते कारण पटलं.. मी म्हंटल बरं ठिक आहे.

       पारस तसा हुशार होता...त्यामुळे मला पण वाटलं कि त्याला प्रमोशन हवंय आणि त्या साठी तो मेहनत घेतोय म्हणून त्याला टेन्शन असेल... आणि मी तो विषय सोडून दिला... दोन दिवसांनी पारस मला बोलला कि त्याला पुण्याला जायचं आहे, जरा प्रोजेक्ट बद्दल मीटिंग आहे ऑफिस ची... मी पण म्हंटल हो चालेल किती दिवसात परत येशील तर तो म्हणाला कि दोन दिवसांनी येईन... मी आणि आई - बाबा पण बोलले नीट सांभाळून जा...

         पारस पुण्यात पोचला आणि त्याने कॉल केला तो तिकडे पोचल्यावर, मी पण बोलली ठिक आहे काळजी घे...कामं झाले कि कॉल कर त्याने हो बोलून फोन ठेवला... मी पण मग राघव ला भरवणे , त्याला त्या नंतर झोपवणे ह्या गडबडीत पारस ला कॉल केला नाही..

        मग सकाळी मी ऑफिस ला जाताना त्याला कॉल केला तर तो तीन वेळा कॉल केला तरी फोन उचलेचना... मग मी पण म्हंटल कि तो मीटिंग च्या गडबडीत असेल... दुपारी करते पुन्हा फोन.. आणि मग मी त्या नंतर ऑफिस च्या कामात राहिली... मग संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर फोन केला तर पारस बोलला मी करतो नंतर मी गडबडीत आहे मग मी हो ओके बोलून फोन ठेवला...

       तिसऱ्या दिवशी सकाळी पारस आला पुण्यावरून मी तेव्हा ऑफिस ला निघायच्या गडबडीत होते मी त्याला विचारलं अरे कॉल का करत नव्हतास तर तो म्हणाला अग मी खूप गडबडीत होतो.. मी बरं आज ऑफिस ला जाणार आहेस का असं विचारलं तर तो म्हणाला कि दोन तास आराम करून दुपारी जाणार आहे.. मग मी हा ठिक आहे म्हणून निघाली....

         रात्री चं घरी गेल्यावर त्याच्याशी निवांत बोलू असा विचार करत मी ऑफिस ला पोचली. रात्री जेवण, भांडी, राघव ला भरवणे त्याला झोपवणे ही सर्व काम झाल्यावर मी  बेडरूम मध्ये गेले. पारस मोबाईल वर काहीतरी बघत बसला होता.. मला बघितल्यावर त्याने पटकन मोबाईल बंद केला.. मला ते त्याचं वागणं जरा विचित्र वाटल... पण मी काहीच बोलली नाही... मी विचारलं कशी झाली मीटिंग.. तर तो हा बरी झाली बोलून गप्प बसला... मी पुन्हा म्हंटल  टेन्शन मध्ये दिसतो आहेस काही प्रॉब्लेम आहे का.. तर तो नाही ग काहीच नाही..मी झोपतो आपण उदया बोलू... असं बोलून तो झोपला...मी विचार चं करत राहिली.. हा  का बोलणं टाळतोय माझं..

         दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला म्हंटल  आज आपण एकत्र जाऊया ऑफिस ला... मी मनात  म्हंटल म्हणजे त्याच्याशी नीट बोलता येईल... तर तो हो चालेल बोलला... आणि मग मी त्याला बोलली पंधरा मिनिट दे मला मी पटकन आरवून निघते... तो थांबला.. आणि पुढच्या दोनच मिनिटात त्याला ऑफिस मधून कॉल आला म्हणजे तो फोन वर हा स्नेहल बोल काय झाले असं बोलला मी किचन मध्ये होते... मी आलोच लगेचं असं तो बोलला मी बाहेर येऊन विचारलं... काय झाले काही प्रॉब्लेम आहे का तर तो म्हणाला कि मला ऑफिस ला लगेचच निघावे लागेल.. मग मी पण म्हंटल  बरं तुला गडबड असेल तर तु हो पुढे... मला अजून दहा मिनिट आहेत.. तो पटकन निघून गेला...

         आज रात्री काहीही करून त्याला विचारायचं चं कि तो हल्ली का गप्प गप्प असतो....असं ठरवून मी तो दिवस विचारात चं घालवला... रात्री मग त्याला विचारायला गेली तर त्याला स्नेहल असा कॉल आला मी त्याच्या मोबाईल वर बघितलं त्याने फोन उचलला  आणि बोलला मी करतो काहीतरी पैश्याची व्यवस्था... आणि फोन ठेवला त्याने...

          मी विचारलं अरे काय झाले कोणाला पैसे  हवे आहेत....तर तो म्हणाला कि माझ्याबरोबर प्रोजेक्ट वर काम करतेय ना ती स्नेहल माझ्या ऑफिस मधली मुलगी तिचे वडील खूप सिरीयस आहेत त्यांचे बायपास करायचे आहे तीला जरा पैसे हवे आहेत... मी म्हटलं हो का किती पैसे हवे आहेत तर तो म्हणाला एक लाख  मी म्हंटल  अरे बापरे... एवढे...तर तो म्हणाला तु नको लक्ष घालूस ह्यात मी बघतो काय ते.. आणि तो आडवा पडला बेडवर... मी विचार चं करत राहिली... असा काय हा नीट काहीच बोलला नाही...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - स्नेहल आणि पारस मध्ये नक्की काय चालू आहे आणि त्याचे सानिका च्या संसारावर काय परिणाम होणार आहेत ते.....)

लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे

( राहणार - देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all