सून नाही - ती लेक आहे आमची ( भाग - 2 )

Sanika


      मागच्या भागात आपण बघितले कि - सानिका आपल्या मैत्रिणीला स्वातीला तिची कहाणी सांगत असते, आता पुढे.....................

        सानिका सांगू लागते....... पारस चे आई - बाबा खूप चांगली माणसं, त्यांना मुलीची खूप हौस  होती, पण पारस चं त्यांना लग्नानंतर नऊ वर्षांनी झाला होता. त्यावेळी सुद्धा डिलिव्हरी च्या वेळी खूप त्रास झाल्यामुळे त्यांनी नंतर दुसरा चान्स घेतलाच नाही.

          पारस एकुलता एक मुलगा, त्यात लग्नानंतर एवढ्या वर्षांनी झालेलं अपत्य त्यामुळे त्याला कधीच काही कमी पडू नये या कडे आई - बाबांनी कायम चं लक्ष दिल, आई - गृहिणी होत्या, बाबा - शिक्षक होते, संध्याकाळी ट्युशन पण घ्यायचे.. त्यांनी त्यांच्याकडे असलेला सर्व पैसा वापरून पारस ला इंजिनिअर केलं. पारस इंजिनिअर होऊन चांगल्या ऑफिस मध्ये जॉब ला लागला. त्यानंतर तीन वर्षांनी त्याचे बाबा रिटायर्ड झाले.. घरात सर्व छान चालू असे.

           आणि माझ्या माहेरी आम्ही दोन भावंड -  मी आणि दादा, मी लहान म्हणून कायम चं लाडकी मुलगी होते सर्वांची. आईकडे ( मी - पप्पा, आई, दादा, आणि आजी ) असं पाच जणांचे कुटुंब होत आमचं.. आजी खूप कडक त्यामुळे मी लग्नाआधी कायम पंजाबी ड्रेसेस चं घातले आहेत, कधीच जीन्स - टॉप आजीने  घालूनच दिले नाहीत मला..माझ्या पप्पा न चं इलेक्ट्रिक वस्तूंचे दुकान आहे, दादा पण त्यांना त्यात मदत करतो, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती लहानपणा पासून चं चांगली होती...

           मी पण शिकले, इंजिनीरिंग केलं आणि एका ऑफिस मध्ये जॉब ला लागले तिथे चं माझी आणि पारस ची मैत्री झाली. आणि मग तीन वर्षाच्या अफेअर नंतर आम्ही लग्न केलं, पारस चे आई बाबा एक महिन्याने माझ्याशी बोलू लागल्यावर एवढं सगळं सुंदर सुरु झाले होते कि काय विचारू नकोसं, माझे सासू - सासरे म्हणजे देव माणसं त्यांनी एवढे लाड केले ना माझे कि माझ्या माहेरी चं मी आहे काय असं मला कधीतरी वाटे, ते मला त्यांची मुलगी चं मानतात. 

          आई - बाबा एवढी चांगली माणसं कि काय विचारू नकोसं त्यांनी मला लग्नानंतर माहेर नाही असं कधी जाणवू चं दिल नाही, माझ्या माहेरी पप्पाना - त्यांची मुलगी गर्भश्रीमंत व्यक्तीला द्यायची होती आणि मी मिडल क्लास  त्यात मराठी असणाऱ्या पारस बरोबर लग्न केलं, ते पण पळून जाऊन त्यामुळे त्यांना ते पटलं चं नाही, मी लग्न केलं त्या दिवशी संध्याकाळी कॉल करून घरी सांगितलं - मी लग्न केलं आहे असं त्या दिवसापासून आज पर्यंत म्हणजे लग्नाला आता अठरा वर्ष होत आली आहेत तरी पप्पा - बोलत नाही आहेत. मध्यंतरी माझ्या दादा चे लग्न झाले, मला कोणीच लग्नाला बोलावलं नाही.

         पण दादा ची बायको- चांगली आहे..तिने दादा कडे हट्ट केला मला भेटण्याचा आणि एक दिवस मला भेटायला आली होती माझ्या घरी लग्न झाल्यावर दहा दिवसांनी, ती आणि दादा तेव्हापासून बोलू लागले आहेत माझ्याशी, आणि आई पण मग बोलू लागली... पण पप्पा अजून बोलत नाही आहेत, त्यामुळे मी लग्न झाल्यापासून अठरा  वर्षात माहेरी गेली नाही आहे. पप्पा नीं सांगितलं आहे घरी यायचं नाही असं...

         पारस चे आई - बाबा  आणि मी मिळून बाजारात जात असू, एकत्र खरेदीला  जात असू, आई तर माझी मैत्रीण चं आहेत, त्या अजूनही मला बाळा करत असतात. आणि बाबा पण शांत स्वभावाचे आहेत, खूप सरळ, साधी माणसं - ही दोघं पण.

         पारस ला पण खूप छान  वाटत असे, आम्हाला तिघांना असं हसता  - खेळताना बघून, आम्ही तिघे - मी आणि सासू सासरे रात्री जेवून झाले कि कधीतरी कॅरम पण खेळायचो तेव्हा, पारस कधी कधी मस्करी मध्ये म्हणतं पण असे आई - बाबा तुम्ही सानिका चे खूप लाड करता हा... ती लाडकी झालीय  तुमच्या दोघांची...

       सर्व खूप छान  चाललं होत मी आणि पारस एकत्र ऑफिस ला जायचो, मग लग्नाला दोन वर्ष झाल्यावर मी गरोदर राहीले पण प्रेग्नेंसि मध्ये थोडा ब्लड प्रेशर चा मला त्रास होऊ लागल्यावर मला पाचव्या महिन्यापासून बेड रेस्ट सांगण्यात आली आणि मग तेव्हा मी जॉब सोडला... आई - बाबा तर खूप खुश  होते ही बातमी ऐकून, आई माझे डोहाळे पुरवण्यात कुठे ही कमी पडत नव्हत्या. त्यांना मला काय खायला घालू आणि काय नको असं व्हायचं अगदी..

         मी माहेरी जाऊ शकत नसल्याने माझी डिलिव्हरी सासरी चं होणार होती...त्यामुळे आई तर अगदी आधीपासून चं सगळ्या तयारीला लागल्या होत्या... माझे डोहाळे जेवण पण खूप थाटात केले सर्वांनी... आणि डोहाळे जेवणानंतर तीनच दिवसांनी मला ब्लड प्रेशर चा जास्त त्रास होऊ लागल्याने सातव्या महिन्यात सीझर करायचं ठरलं. आणि मग राघव  चा जन्म झाला, तो सातव्या महिन्यात झाल्यामुळे वजन कमी होत बाळाचं त्यामुळे त्याला सहा दिवस काचेत  ठेवले होते आणि मग सातव्या दिवशी त्याला आणि मला हॉस्पिटल मधून  घरी सोडण्यात आल...

          आई - बाबा खूप खुश  असायचे, राघव झोपेत हसला  तरी त्यांना खूप छान  वाटत असे, त्याला घेऊन बसत असत दोघं ही, आई  मला बाळंतीनिला देतात ते लाडू, पौष्टिक आहार सर्व स्वतः करून देत होत्या....मी जरा कमी खाल्लं तरी बोलायच्या कि खा - बाळा तू खाशील  तर बाळाला दुध मिळेल ना... दिवस खूप छान  मजेत चालले  होते, राघव  पण आता वर्षाचा  झाला होता...मी वर्ष भर घरी चं होते, त्यामुळे माझी तबेत चांगलीच झाली होती, मी बऱ्यापैकी  जाड झाले होते.

        मी आता पुन्हा जॉब करावा असं आई - बाबा बोलू लागले, आई बोलू लागल्या कि एकदा मुलात  अडकून पडलीस तर पुन्हा अजून उशिरा  तुला जॉब करायला नकोसं वाटेल, आम्ही दोघे आहोत ना राघव साठी घरी तू आरामात ऑफिस ला जात जा...अग बाईने स्वावलंबी असावं... तूझ्या हातात तुझे पैसे असावेत  मग तुला आवडते ती वस्तू तु पटकन तुझ्याकडे पैसे असले कि घेवू शकतेस, आणि राघव आता थोडा थोडा  भात - डाळ खातो आहे त्यामुळे त्याचं खाण्याचं तसं टेन्शन नाही.. तु बिनधास्त कर नोकरी... मग् मी ही इंटरव्हिव्ह देऊ लागले... आणि एका ठिकाणी माझं सिलेकशन झाल.. आई - बाबा वा छान  चं म्हणाले.... पण पारस काहीच बोलला नाही त्यावर.. ठिक आहे एवढं चं बोलला...

. हल्ली पारस का कोण जाणे पण मला थोडासा बदललेला वाटू लागला होता...( काय चालले  होते पारस च्या मनात ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत...)

लेखिका - सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )

कथा  आवडल्यास जरूर लाईक करा...

    

🎭 Series Post

View all