आदरणीय संगीता थोरात : साहित्यक्षेत्रातील वैभवशाली लेखिका

ईरा : शब्दाचे स्पंदन
आदरणीय संगिता थोरात : साहित्यक्षेत्रातील सोनेरी वैभव

कोंबड्यांने बांग दिली आणि रात्रीच्या गर्भातून उषःकाल झाला. धरतीवर प्रकाशकिरण अवतरली.पहाटेचा मंद वारा , रिमझीम बरसणारा पाऊस , हिरवागार झालेल्या निसर्गातील पाना - फुलांचे सुंदर रुप अशा विलोभनिय वातावरणात लेखकाची लेखणीने बहारदार रुप धारण करावे आणि मन प्रसन्न व्हावे असे मनोमन वाटते.लेखकांच्या लिखाणाला निश्चित दिशा मिळाल्यास त्यांचे लेखन गतीमान होते व मनातील भावनिक कंगोरे सर्वांना आकर्षित करतात.असेच सृजनशिल लेखनात माहिर असलेल्या आदरणीय संगीताजी थोरात यांनी साहित्यक्षेत्रात प्रभावी छाप पाडली आहे.

कोरोनाचे संकट आले यामुळे सर्वांना घरामध्येच बदीस्त रहावे लागले.अशावेळी काय करायचे हा यक्षप्रश्न होता पण या संकटकाळात लेखनासारख्या छंंदाने अनेकांना तारले आहे.यामध्ये महिला लेखिका नव्याने उदयास आल्या आहेत.याच काळात संगीताजी यांनी लेखनाला सुरवात केली.त्यांनी आपले अनुभव लेखणीतून मांडून वाचकांंना समृध्द केले.याच वेळी त्यानी कविता , गझल व चारोळी या प्रकारात पुस्तकनिर्मिती करुन आपल्यातील प्रतिभा स्पष्ट केली.अंकुर हा चारोळीसंग्ह , पालवी कवितासंग्रह , गझल ए - ख्वाब हा हिंदी रचना संग्रह अशा तीन पुस्तकांचा प्रकाशन झाले.स्रीवाद , अनुभवसमृद्ध जीवन आणि सामाजिक भान याचे पडसाद त्यांच्या लिखाणात उमटले आहेत.

संगीताजी यांची आणखी एक अप्रतिम निर्मिती म्हणजे ' नकळत ' ही कादंबरी ..! वास्तव आणि स्वप्न यांचा सुंदर मिलाफ असलेली ही कादंबरी ओघवत्या मांडणीमुळे वाचकांना आवडते.याच कांदबरीला ' साहित्यगंध 'व ' आशादीप ' अशा दोन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. लेखनाची आवड असलेमुळे त्यांचे इतर व्यासपिठावर लेखन चालूच होते.ईरा व्यासपिठावर फॕन्टमची ताई , वेटींग रुम , मागे वळून बघता , सुरवंट , कंगोरे भावनांचे , चिंगी , खंत मनातील विविध कथा , स्वप्नांजली अशा अनेक कथा व कथा मालिकेतून त्यांनी ईरावर आपले लेखनकौशल्य दाखवले आहे.ईरावरील चॕम्पियन ट्राॕफी , राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आहे. ईराच्या दिवाळी अंकातही त्यांनी लेखन केले आहे.सखोल ज्ञान , उत्तम निरिक्षणशक्ती , दर्जेदार भाषाशैली , यामुळे त्यांचे लेखन कसदार झाले आहे.

अनेक साहित्यसंमेलनात सहभाग व उत्कृष्ट कवयित्री म्हणून सन्मान , परखड स्वभाव माणसे जोडण्याची आवड , साहित्यप्रेम , कौटुंबिक जबाबदारीचे भान अशा हरहुन्नरी व प्रतिभावंत लेखिका संगीताजी यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ..!! तुमचे लेखन असेच बहरत जावे ही सदिच्छा ...!!

©®नामदेवपाटील