संगीत आहेस!❤️

Motivational Poem

एकाकी तू तसा...
एकाकीच का असा?
मनाशी आहे असा का
कोंडमारा भावनांचा?


वाट तू चुकला कुठे,
की डाव तू हरला कुठे,
का तो गुंता तुझा तुझ्याने
सुटता सुटेना?


हरवलेला तू असा
तुझा तुझ्याशीच का अबोला
का हसू रोखून आहे
अडवलेला बांध सारा?


सोड तो सारा पसारा
सोड गाठी कुणाजवळी
तारून नेईल जी तुला
साथ एक खंबीर आहे


हरू नकोस,खचू नकोस
वाटा बनव थांबू नकोस,
विसरू नको, कुणाच्या गीताचे
तू गोड संगीत आहेस!