Oct 22, 2020
स्पर्धा

संघर्ष सुमने अंतिम

Read Later
संघर्ष सुमने अंतिम

आपण मागील भागात पाहिले की सुमन तिच्या दोन्ही मुलींची लग्न करून देते.. मुलाचे पण लग्न करते.. दोन मुली आणि तिची सून या सगळ्यांची डिलीवरी सुध्दा तिचं करते.. इतक्या मेहनतीने ती सगळं करत असते.. आता पुढे..

सुमनने तिच्या बळावर मुलांची लग्ने करून तिची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली.. आता तिच्या समोर एकाच ध्येय होतं.. ते म्हणजे स्वतःचं घर.. सुमनला नेहमी वाटायचे की आपले स्वतःचे हक्काचे एक घर असावे.. असे किती दिवस भाड्याच्या घरात रहायचे.. त्यामुळे ती आटोकाट प्रयत्न करायची.. पैसे बचत करायची.. खर्च करताना विचार करून करत होती..

आता ती मुलांच्या जबाबदारीतून मुक्त झाली होती.. पण घराचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते.. आता ती घरासाठी बचत करत होती.. दोन वर्षात तिने बरीच रक्कम जमा केली.. आता तिच्या साथीला तिचा मुलगाही होता.. त्यामुळे तिला त्याचा आधार होता.. दोघे मिळून जमा झालेली रक्कम एकत्र केली.. ती कमी पडू लागली म्हणून थोडे कर्ज घेतले..

हळूहळू घर बांथातला सुरूवात झाली.. त्यात कुमारचाही थोडा वाटा होताच.. दगड उचलून टाकणे, माती भरून टाकणे अशी कामे ती स्वतः तिचा नवरा, मुलगा मिळून करत होते.. कामाला दोन गडी घेऊन गवंडीचे काम केले.. गडी जास्त घेतले तर पैसे जास्त जातील.. खर्च जास्त होईल.. असा ती विचार करत होती..

धुणीभांडी करून थोडे पैसे जमा केले होते.. आणि थोडे कर्ज असे करून घर बांधायच स्वप्न आता सत्यात उतरत होते.. तिचे स्वप्न पूर्ण होतं होते.. आता ती धुणी भांडी करून जे पैसे मिळतील ते.. आणि तिचा मुलगा काम करून मिळवलेले पैसे यातून ते दोघे मिळून कर्जाचे हप्ते फेडत होते..

अखेर घर बांधून पूर्ण झाले.. सुमनचे स्वप्न सत्यात उतरले.. आता ती तिच्या हक्काच्या घरात रहायला गेली.. त्यावेळी तिचे डोळे भरून आले.. कारण तिला खूप आनंद झाला होता.. तिने केलेले सगळे कष्ट त्यावेळी ती विसरून गेली.. कष्टाचे चीज झाले असे तिला वाटू लागले.. इतकी वर्षे हालाखीत दिवस गेले होते.. आता समाधानाने चार घास बसून खावे.. असे तिला अजूनही वाटत नव्हते.. कारण तिला म्हातारपणासाठी तुटपुंजी जमा करून ठेवायची होती..

अगदी बरोबर आहे तिच.. कारण ती एक स्वाभिमानी स्त्री होती.. कुणाच्या जीवावर न जगता.. स्वकष्टाची मीठभाकरी तिला खायची होती..

नविन घरात रहायला गेल्यावरही ती परत कामं करू लागली.. हळूहळू ती कर्जाचे हप्ते फेडत होती.. ते सोडून एक ठराविक रक्कम जमा करत होती.. ती रक्कम तिच्या नातींच्या नावे एफ डी करून ठेवणार होती.. कारण मुलींना कठीण काळात कोणापुढे हात पसरायला लागू नये म्हणून..

नातींच्या नावे पैसे ठेवल्यावर ती आता स्वतःसाठी कामं करू लागली.. आधी पंधरा घरची कामे करणारी सुमन आता पाच सहा घरची कामे करू लागली.. कारण तिची तब्बेत तिला साथ देत नव्हती.. तिला दम्याचा त्रास होताच.. तो पावसाळ्यात जास्त बळावू लागला..

अशी ही जिद्दी सुमन, कष्ट करण्याची तयारी असणारी, कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणारी.. खरंच खूप ग्रेट आहे.. इतक्या कठीण काळात कोणापुढे हात न पसरता.. कष्ट करून तिचा स्वाभिमान जपला.. अगदी तिचा नवरा देखील नंतर थोडेफार काम करू लागला.. आणि तिला पैसे देऊ लागला.. तोही शेवटी तिचे कौतुक करू लागला.. आणि कुमारने त्याची चूक मान्य करून सुमनची माफी मागितली..

या कथेतून हे शिकायला मिळाले की, कोणतीही परिस्थिती असो.. कधीही न डगमगता किंवा न रडत बसता धीराने आणि जिद्दीने परिस्थितीला तोंड द्यावे.. काहीही झाले तरी स्वाभिमानी रहायचे.. कोणापुढे हात न पसरता स्वबळावर सगळे निर्माण करावे..

या कथेमध्ये सुमनचा संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.. म्हणूनच या कथेला "संघर्ष सुमने" असे नाव दिले आहे..
धन्यवाद
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मी काही प्रोफ़ेशनल लेखिका नाही.. मनात जे काही येतं ते लिहिते..