Jan 26, 2022
स्पर्धा

संघर्ष सुमने 4

Read Later
संघर्ष सुमने 4

आपण मागील भागात पाहिले की सुमनने तिच्या नवर्याला सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तो काही सुधारलाच नाही.. तिचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले.. मग तिने त्याला सुधारण्याचा प्रयत्न सोडून दिला.. आणि मुलांच्या भवितव्याचा विचार करू लागली.. आता पुढे..

सुमनला आता तिच्या मुलींच्या लग्नाची काळजी वाटत होती.. सुमनच्या नणंदेचा मुलगा एक लग्नाचा होता.. तो निर्व्यसनी होता.. शिवाय सुमन त्याच्या लहानपणी पासून त्याला बघत आली होती.. मुलगा चांगला होता.. म्हणून सुमनने मोठ्या मुलीचे लग्न त्याच्या सोबत करण्याचे ठरवते..

लग्नाची तारीख ठरली.. आणि सुमन तयारीला लागली.. तिला जे मिळाले नाही ते सगळं ती तिच्या मुलींसाठी करणार होती.. कसलीही कसर सोडणार नव्हती.. ती एक एक जमवलेला पैसा उपयोगात आणत होती.. पण तिला ते सगळे पैसे पुरणार नव्हते.. ते म्हणतात ना लग्न करावे बघून तशी परिस्थिती झाली होती..

सुमन कामावर जात होती त्या बायकांच्याकडून उसने पैसे जमा केले.. थोडे थोडे करून बरीच रक्कम जमा झाली.. मग सुमन मुलीचे लग्न अगदी थाटामाटात म्हणजे खूप पैसे खर्च करून नाही.. तर मुलीचा सगळा संसार थाटून करते.. म्हणजेच मुलीला जिथे लग्न करून देते त्यांची देखील इतकी परिस्थिती नव्हती.. पण मुलगा निर्व्यसनी आणि बघण्यातला होता म्हणून तिने मुलीला तिथे दिले.. पैसा काय आज आहे उद्या नाही.. आणि स्वबळावर दोघेही मिळवतीलच.. या विचाराची ती असल्यामुळे मुलीचे लग्न तिथे करण्याची निर्णय तिने घेतला..

मुलीचे लग्न व्यवस्थित पार पडले.. आता ती परत जोमाने कामाला लागली.. कारण ज्यांचे पैसे घेतले होते त्यांना ते परत करावे लागणार.. म्हणून ती जास्तीची कामे करू लागली.. त्यातून ती एक एक करत सगळ्यांचे पैसे परत केले.. आता दुसर्या मुलीची लग्नाची जबाबदारी तिला पार पाडायची होती.. तिच्या लग्नासाठी ती पैसे जमा करू लागली..

एक दिवस अचानक एक स्थळ चालून आले.. तिची दुसरी मुलगी त्या स्थळाने अर्थात मुलाने पाहिले.. ही सगळी मंडळी मुलाकडे सुध्दा सगळी पहाणी केली.. अर्थातच बघण्याचा कार्यक्रम सुरळीत पार पडला.. मुलाकडच्या मंडळींना सगळे पसंत होते.. मुलीकडे देखील काहीच अडचण नव्हती.. त्यामुळे काहीच खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने लग्न पार पडले..

आता या मुलीच्या लग्नात काही खर्च केले नाही म्हणून सुमन तिच्या लग्नासाठी जमा केलेले पैसे त्या मुलीच्या मुलीच्या नावावर ठेवते.. जे मी भोगल ते माझ्या मुलींनी भोगू नये असे तिला नेहमी वाटायचे.. त्यासाठी ती खूप प्रयत्न करत होती..

आता तिच्या दोन्ही मुलींची लग्न झाली होती.. आता मुलाचे लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे आणि स्वतःचे हक्काच घर बांधायचे.. हे तिचे स्वप्न होते.. मग ती मुलासाठी मुलगी बघू लागली.. एक मुलगी पसंत पडली.. तिने मुलीकडून कोणतीच अपेक्षा केली नाही.. मुलीचे रंग रूप न बघता तिने तिचे गुण पाहिले.. मुलगी सांभाळून घेईल ना.. हे पाहिले.. तिचे अगदी बरोबर आहे ना.. इतक्या कष्टाने, हालाखीने दिवस काढून म्हातारपणी जर सुख मिळणार नसेल तर काय उपयोग?

सुमन इतक्या कष्टाने तीन मुलांची लग्ने केली.. त्याची बाळंतपण केली.. दोन्ही मुलींची तर केलीच पण सुनेचेही बाळंतपण तिनेच केले.. सुनेची सगळी जबाबदारी तिनेच घेतली.. घरात श्रीमंत नसली तरी मनात नक्कीच श्रीमंती आहे.. ते म्हणतात ना, मन मोठं असेल तर सार काही सामावून घेता येत.. तसंच काहीसं..

धुणीभांडी करत असतानाच तिला दम्याचा त्रास जाणवू लागला.. तिने औषध चालू केले.. जेव्हा त्रास जास्त होई तेव्हा ती घरीच राहत असे.. पण एखाद्या वेळेस गरज असेल तेव्हा त्या त्रासातही ती काम करत होती..

एक दिवस ती एका घरात कामाला गेली होती.. त्या घरातल्या बाईने तिला पगार दिला.. काम झाल्यावर नेऊ म्हणून ती ते पैसे तेथेच ठेवली.. आणि काम करू लागली.. कामाच्या गडबडीत तिला ते पैसे घ्यायचे लक्षात आले नाही.. ती तशीच गेली.. अर्ध्या तासाने तिच्या लक्षात आले तेव्हा ती पळत तेथे गेली.. जिथे पैसे ठेवले होते तिथे तिने पाहिले तर तेथील पैसे गायब.. त्या घरातल्या बाईला तिने विचारले.. पण त्या बाईला देखील माहिती नव्हते..

झालं.... सुमनला खूप वाईट वाटले.. ती रडू लागली.. रडतच घरी आली.. रक्कम कमी असली तरी तिच्या मेहनतीचे ते पैसे होते.. आणि गरज होती तिला त्या पैशाची.. एखाद्या गरीबालाच पैशाची किंमत कळते.. नाहीतर पैशाची विनाकारण उधळपट्टी करणारेही काही कमी नाहीत..

सुमनला असे आयते, भीक मागून किंवा पदर पसरून मिळालेले नको होते.. कष्ट करून मिळवलेलेच आपले असे ती मानायची.. इतक्या गरिबीतही तिचा स्वाभिमान टिकवून होती..

ती एक स्वाभिमानी खूप जिद्दी होती
मनगटात तिच्या खूप कणखर होती..

न कोणाला घाबरता झुंज देत होती
काटेरी त्या वाटेवर एकटीच चालत होती..

अस्तित्व तिचे टिकवून संघर्ष करत होती
का कुणास ठाऊक एकटीच लढत होती?..

कुणीच नाही सोबतीला खडतर वाट होती
नियतीने कशी तिची परिक्षा घेतली होती?..

ती बनली हिरकणी पिल्लांसाठी झुरत होती
तिच एक स्त्री जी हसत संघर्ष पेलत होती..

कविता करण्याचा एक छोटासा प्रयत्न.. तर सुमनचे पैसे हरवले म्हणून ती रडतच सगळी कामे करत होती.. तो दिवस ती रडतच घालवली.. नंतर रात्री त्या बाईचा सुमनला फोन आला.. की तिचे पैसे सापडले.. तिने ठेवलेले तिथेच होते.. पण त्यावर कागद असल्यामुळे तिला दिसले नाहीत.. पैसे मिळाले म्हटल्यावर सुमन आनंदाने उड्याच मारू लागली.. खरंच त्या पैशाचे मोल तीच जाणे..

सुमन इतकी वर्षे हालाखीत दिवस काढत आहे.. पण तिचा चेहरा कायम हसराच असतो.. तिचे दुःख ती कधीच दाखवत नसे..
क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..