Jan 23, 2022
स्पर्धा

संघर्ष सुमने 2

Read Later
संघर्ष सुमने 2

आपण मागील भागात पाहिले की सुमन आणि कुमारची ओळख झाली.. ओळखीतून मैत्री आणि नंतर प्रेम.. दररोजची भेट, बोलणं सगळं सवयीचं झालं होतं.. एक दिवस कुमारने सुमनला प्रपोज केल.. सुमनने पण लगेच होकार दिला.. आणि दोघांनी पळून जाऊन लग्न केले.. आता पुढे..

कुमार लग्न झाल्यावर थोडे दिवस सुमनशी प्रेमाने वागला.. ते नव्याचे नऊ दिवस म्हणतात ना अगदी तसेच.. त्या दिवसात रोज फिरायला जायचे, बाहेर खायचे, सगळं एन्जाॅय चालू होते.. पण हे किती दिवस चालणार?

कुमार काही काम करत नव्हता.. हे सुमनला माहित नव्हतं.. ती त्याला नेहमी विचारायची की, "तुम्ही ऑफिसला जाणार नाही का? कधीपासून जाणार आहात? वगैरे .." पण तो काहीतरी कारण सांगून टाळायचा.. एक दिवस सुमनला कुमारच्या वहिनी कडून समजले की कुमार काही काम करत नाही.. हे ऐकून सुमनला मोठा धक्का बसला.. ती त्याला विचारू लागली तर तो तिच्याशी भांडू लागला.. तिच्यावर संशय घेऊ लागला..

सुमनचे आणि त्याचे रोज भांडण होई.. सुमन पण त्या गोष्टीला कंटाळली होती.. पण ती आता माहेरी जाऊ शकत नव्हती आणि नोकरी पण करत नव्हती. अशातच तिला दिवस गेले होते. मग कुमारने तिला त्याच्या आईवडीलांकडे जे एका छोट्या शहरात राहत होते तिथे सोडून तो परत काम बघायला मुंबईला गेला. इकडे सुमन जी गरोदर होती ती आणि तिचे सासुसासरे असे तिघेजण राहू लागले. त्यात पण त्यांना दोन वेळचे जेवण मिळत नसे. सुमनला या सगळ्याची सवय नव्हती. ती खूप रडली. नवरा पैसे देत नव्हता.

बरेच दिवस झाले तरी कुमार नोकरी करत नव्हताच.. नुसता काम बघालोय असे खोटे नाटे सांगून मित्रांबरोबर फिरायचा.. इकडे सुमनला खूप पश्चात्ताप होत होता.. आईचं ऐकले असते तर ही वेळ आली नसती असे तिला वाटू लागले.. पण आता काय उपयोग? ती काहीच करू शकत नव्हती.. या छोट्याशा शहरात नोकरी तरी काय करणार? त्यात शिक्षण फक्त बारावी पास.. पोट भरायच मुश्किल त्यात ती गरोदर आणि घरात सासू सासरे दोघेही आजारी.. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती..

अशीच एकदा ती बाहेर बसली असता तिची मावस सासू सुमनला म्हणाली, "सुमन, तू तरी कामाचं काहीतरी बघ बाई.. कुमार काय करेल माहिती नाही.. त्यापेक्षा तू काम कर.. आधीचं गरोदर आहेस.. त्यात उपाशी राहिलीस तर बाळाला त्रास होईल.. आता कुठे तुला तिसरा महिना चालू आहे.. बघ बाई तुला कसं वाटतंय तसं कर.." मावशी

"होय मावशी, माझ्या मनात पण तोच विचार चालू असतो.. पण मी काय काम करू? हेच समजेना.. नोकरी करावी तर शिक्षण नाही.. बारावी शिकलेलीला या छोट्याशा शहरात नोकरी तरी कशी मिळणार? मुंबईत शिक्षण कितीही असले तरी नोकरी मिळाली होती.. पण इथे मात्र मिळणं कठीण आहे.." सुमन

"एक काम आहे माझ्याकडे पण तुला चालतंय का? ते बघ.." मावशी

"कोणतं काम आहे??" सुमन

"बघ बाई, धुणीभांडीच काम आहे.. तात्पुरतं करतीस का?? निदान पोटभर जेवशील तरी.. नंतर कुमार आल्यावर पुढे करायचं की नाही ते ठरव.." मावशी

"मी नंतर काय ते तुम्हाला सांगेन.." असे सुमन म्हणाली..

"होय ग.. विचार करून पहा.. जमत असेल तर कर.." मावशी

"हं.." म्हणून सुमन विचार करू लागली.. काय हरकत आहे हे काम करायला? कोणतेही काम हलके नसते.. जर या कामातून थोडेफार पैसे मिळत असतील तर वाईट आहे.. हे तयार होतील का? यांना आवडेल का? अरे, मी यांचा का विचार करत आहे.. यांनी माझा विचार केला का? मला एकटीला सोडून निघून गेले.. परत कधी येणार हे सुध्दा सांगितले नाही.. मी एकटी या अनोळखी शहरात काय करू? आई म्हणायची ते ऐकले असते तर ही वेळ आली नसती.. पण आता काय उपयोग? इतरांचा नाही निदान पोटच्या गोळ्याचा तरी विचार करून काहीतरी करायलाच हवं.. त्याच्या तब्बेतीचा तरी विचार करायलाच हवा.. आपल्या जीवाला आणि लेकराला जपायलाच हव.. त्यासाठी कोणतेही काम करायला मी तयार आहे.. सुमन असे मनात विचार करत असतानाच एक व्यक्ती बाहेर आली..

"कोणी आहे का?" ती व्यक्ती

"बोला काय काम आहे?" सुमन

"घराचं भाड कधी देताय?" ती व्यक्ती अर्थातच तो घरमालक होता..

"कोणत्या घराचं??" सुमन

"अहो बाई, तुम्ही राहता त्या घराचं.." घरमालक

"काय??" हे ऐकून सुमनच्या पायाखालची जमीनच सरकली.. तिला काहीच कळेना की हे नक्की काय चाललंय??

"म्हणजे तुम्हाला माहित नाही का??" घरमालक

हे ऐकून तिने फक्त मानेनेच नकार दिली.. सुमनला आता खरी परिस्थिती समजली.. कुमारचे तर काहीच नाही.. याने मला फसवले आहे.. भरपूर शेती आणि स्वतःचे घर आहे असे सांगितले होते.. पण इथे काहीच नाही.. साधं त्याचं स्वतःचं घर नाही.. तिला काहीच कळेना.. सगळं संपलं असे वाटत होते..

"ओ बाई माझे पैसे कधी देताय?" घरमालक

"हे गावाला गेलेत आल्यावर देते.." सुमन असे म्हणताच ती व्यक्ती निघून गेली..

सुमन आत येऊन बसली.. काय करून बसले मी.. आईचं ऐकले असते तर ही वेळ आली नसती.. आता पुढे काय? एका क्षणासाठी तिला जीवन संपवावे असे वाटत होते.. पण पोटातल्या बाळाकडे बघून ती शांत झाली..

आता गप्प बसायचे नाही.. काहीतरी करायला हवे.. स्वतःसाठी नाही निदान पोटच्या गोळ्यासाठी का होईना? चार पैसे मिळवायला हवे.. आता इथून पुढे तिचा संघर्ष सुरू झाला.. एकटीच्या बळावर सारं काही ठरणार होतं.. जिद्द आणि ध्येय अचूक असेल तर अशक्य काहीच नाही.. कष्ट करायची तयारी असेल तर ध्येय साध्य होतंच.. बघू आता सुमनचा संघर्ष कसा सुरू होतो ते..
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..