Jan 26, 2022
स्पर्धा

संघर्ष सुमने 1

Read Later
संघर्ष सुमने 1

सुमन मुंबईत राहणारी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. घरची परिस्थिती अगदीच श्रीमंत नाही पण खाऊन पिऊन सुखी होते. ती एका कंपनीत टेलिफोन ऑपरेटरच काम करत होती.

कथा सत्य घटनेवर आधारित असून 1991_92 मधील आहे. त्याकाळी फोन डायरेक्ट लागत नसत तर कंपनीत फोन लावून मग कनेक्ट करायला सांगत आणि फोन कनेक्ट झाला की मग नातेवाईकांशी बोलता येई.

तर मग सुमन या टेलिफोन ऑपरेटरच अर्थात कनेक्टरच काम करत होती. एक दिवस तिला फोन आला, ”हॅलो मॅडम, मी कुमार मला एक नंबर जोडून देता का?”

“हा बोला नंबर काय आहे?”
नंबर सांगितल्यावर मग सुमनने नंबर जोडून दिला.

दुसर्या दिवशी परत त्या व्यक्तीचा फोन आला. परत सुमनने फोन कनेक्ट करून दिला. असे पाच सहा दिवस झाल्यावर ती व्यक्ती सुमनशी बोलू लागली, ”हा मॅडम जेवण झालं का? कसे आहात?” असे तो बोलू लागला आणि मगच नंबर कनेक्ट करायला देऊ लागला. एक दिवस तिचे नावही विचारले. त्यानंतर, “हाय सुमन कशी आहेस? जेवलीस का?” असे म्हणून तो फक्त तिलाच फोन करू लागला.

रोजचेच फोनवर बोलणे सुरू झाले. एक दिवस जरी बोलले नाही तरी दोघांनाही करमत नसे. त्यांची ती रोजचीच सवय झाली होती. सुरुवातीला दोघेही थोडच बोलायचे.. नंतर त्यांच्यात छान मैत्री झाली. मग काय? बोलणे आणखी थोडे वाढले.

हळूहळू त्यांची मैत्री वाढू लागली, बहरू लागली. एक दिवस त्याने तिला भेटायला बोलावलं. ती पण आढेवेढे न घेता गेली. कारण तिच्याही मनात कुठेतरी त्याला भेटावे अशी ओढ होतीच. कुमार दिसायला देखणा, उंच होता. बघता क्षणी तो सुमनला आवडला. तिने मनात जसे त्याच्याबद्दल चित्र रेखाटले होते. अगदी तसाच होता तो. ती पण त्याला आवडली. सुमन अगदी चाफेकळी होती. लांबसडक केस, सरळ नाक, देखणी होती.

मग काय त्या दिवसापासून दोघे एकमेकांना रोज भेटू लागले. रोज संध्याकाळी सुमनच्या ऑफिस सुटायच्या वेळी तो बाहेर येऊन तिची वाट बघत उभा रहात असे. मग दोघे मिळून तिच्या घरापर्यंत जात. सुमनच्या घरापर्यंत तिला सोडून मग कुमार त्याच्या घरी जाई. हे त्यांचे नेहमीचेच ठरले होते. दोघांनाही एकमेकांच्या शिवाय करमेना.

बरेच दिवस झाले त्या दोघांचे भेटणे चालूच होते. कुमारला तर तिच्या शिवाय करमतच नव्हते. कधी एकदा तिला मनातलं सगळं सांगेन असे वाटत होते. पण तिला मनातलं सांगावे की नको हा प्रश्न त्याच्या मनात सारखा पडत होता? कारण तिने नकार दिला तर.... मैत्री सुध्दा तुटेल. असे त्याला वाटत होते.

एक दिवस कुमारने सुमनला प्रपोज केलं. असेच ऑफिसमधून घरी जाताना तो एका ठिकाणी थांबला. सुमन बडबडत तशीच थोडी पुढे गेली. शेजारी बघते तर कुमार नव्हता. तिने मागे वळून पाहिले तर तो तिथेच उभा होता.

"काय झालं? थांबलात का?" सुमन

"मला काहीतरी बोलायचं आहे." कुमार

"बोला की." सुमन

"इथे नको. त्या बागेत जाऊन बोलू." असे कुमार म्हणाला आणि ते दोघेही बागेत गेले. बागेत गेल्यावर दोघेही एका बाकड्यावर बसले. थोडा वेळ दोघेही शांत बसले.

"काय सांगायचं होतं?" सुमन

"हे बघ सुमन, तू रागावू नकोस. मी काय सांगतो ते ऐक. मग मला उत्तर दे. तुझं जे उत्तर असेल ते मला मान्य असेल." कुमार

"बरं, बोला." सुमन

"मी जेव्हापासून तुला बघितलो आहे. तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात आहे. सुमन तू मला खूप आवडतेस. तू माझ्याशी लग्न करून मला आयुष्यभर साथ देशील. तू माझी अर्धांगिनी होशील. तुझं उत्तर काहीही असो मला मान्य आहे. पण प्लीज आपली मैत्री तेवढी तोडू नकोस." कुमार

सुमन खूपच खूश झाली. कारण तिच्या मनातही तेच होते. फक्त ती कुमारने पुढाकार घ्यावा याची वाट बघत होती. कुमारने विचारल्यावर तिने लगेच होकार दिला.

कुमारने तिला विचारले, “आपण लवकरच लग्न करूया. कधी करायचं ते तू सांग?” ती लाजली आणि म्हणाली, “माझ्या घरातून काही परवानगी मिळणार नाही.”

तो “मग कसं करायचं? तुला माझ्याशी लग्न करायचे आहे ना.”

ती “हो करायचे तर आहे. पण कसे करायचे? मी काय सांगू?”

तो “तुझं प्रेम आहे ना माझ्यावर.”
ती “हो आहे.”
तो “मग झालं तर.. आपण पळून जाऊन लग्न करूया.”

ती “काय?”
तो “मग दुसरा पर्याय आहे काय?”
मग ती “बरं.. मी तयार आहे. पण त्याआधी मला तुमचं घर बघायचं आहे.”

"हो चालेल.. उद्या तुला मी घर दाखवतो.." असे म्हणून दोघेही आपापल्या घरी गेले..

सुमन त्याचं घर कसे असेल? घरातील माणसे कशी असतील याचा विचार करत होती.. त्याच विचारात सगळी रात्र गेली.. इकडे कुमार मात्र टेन्शनमध्ये होता.. आमचं घर म्हणजे तो त्याच्या भावाच्या घरात राहत होता.. आणि ते घर खूप छोटं होतं.. घर बघून ही नकार देईल ही भीती त्याच्या मनात होतीच.. म्हणून त्याने त्याच्या मित्राचे घर दाखवायचे ठरवले..

दुसरा दिवस उजाडला.. सुमन खूप खूश होती.. ती सकाळीच सगळं आवरून बाहेर पडली.. कारण ती आज कुमारच्या घरी जाणार होती.. कुमार तिची वाट बघत उभा होता.. मग दोघेही तिथे जातात.. तिथे गेल्यावर कुमार तिला सगळं घर फिरवून दाखवला.. सुमन खूप खूश झाली.. आपला निर्णय बरोबर आहे याची तिला खात्री होती..

सुमन घरी आल्यावर तिच्या आईला सगळं सांगते.. तिची आई तिला खूप ओरडते.. आणि नंतर समजावून सांगते. "प्रेमाच्या नावाखाली तू फसू नको." असेही म्हणते. पण सुमनच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधली होती. आईचं बोलण बघून ती इतर कोणाला न सांगता पळून जायचं हा ती निर्णय घेते..

त्या दोघांचे पळून जायचं ठरल.. दोघेही व्यवस्थित प्लॅनिंग करून घरातून न सांगता बाहेर पडले.. एका मंदिरात गेले आणि प्लॅनिंग जसे केले होते त्याप्रमाणे लग्नही केले. लग्न झाल्यावर सुमनला तर तिच्या घरचे घरी घेतले नाहीत कारण त्यांची जात वेगळी होती. कुमारचे आईबाबा गावी होते त्यामुळे मग ते कुमारच्या भावाकडे राहू लागले. दोन महिने मस्त खाणे पिणे फिरणे एवढच झालं. आता नव्याची नवलाई संपली आणि पैशाची चणचण भासू लागली. कुमार दारू पिऊन येऊ लागला आणि सुमनवर संशय घेऊ लागला.
क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..