Sep 25, 2021
स्पर्धा

संघर्ष अस्तित्वाचा १०

Read Later
संघर्ष अस्तित्वाचा १०
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

संघर्ष अस्तित्वाचा १० @ प्रेरणादायी कथा 

( मागच्या भागात आपण पाहिलं की कावेरी महिलाश्रमात जाते. माधुरीसाठी जे जॅकेट बनव्यासाठी दिलं होतं ते घेण्यासाठी. पण कावेरीला तिथे कमल भेटत नाही. कमलला काम मिळालं म्हणून ती गेली असं तिला सांगण्यात आलं. कावेरीने पत्ता मागितला तर उडवा उडवीची उत्तरे मिळाली. कावेरीला शंका येते. आश्रमाच्या बागेत बसलेल्या, पायाने अपंग असलेल्या राधाकडून कावेरीला बरीच माहिती मिळते. कावेरी घरी जावून माधुरीला सर्व सांगते. माधुरी आणि कावेरी पोलीस स्टेशनला जावून सर्व सांगतात. पण पुरावा नसल्यामुळे ते काही करू शकत नव्हते. कावेरी एक युक्ती देते आणि एक महिला पोलीस त्या आश्रमात पाठवली जाते. सुरुवातीला सर्व नॉर्मल होतं. पण एक दिवस असंच एका मुलीला रात्रीच्या वेळी बाहेर नेताना महिला पोलीस कर्मचारी पाहतात. त्या त्यांच्या न कळत त्यांचा पाठलाग करतात आणि पोलीस स्टेशनला Inform करतात. त्यामुळे सर्वांना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश येत. कमल आणि कमलसारख्या अनेक मुलींना सोडवण्यात यश येतं. नंतर कमल व इतर बायका माधुरी आणि कावेरीचे आभार मानतात. कावेरी पुन्हा जिद्दीने Interview च्या तयारीला लागते. आता पुढे....... )


Interview साठी दिल्लीला जायचा दिवस जवळ आला. माधुरी कावेरीला खूप साऱ्या शुभेच्छा देवून पाठवते. कावेरी दिल्लीत ३-४ दिवस आधीच पोहचली. तिथे ती लाल किल्ला,  इंडिया गेट आणि आणि इतर ठिकाणी फिरून आली. Interview च फार टेन्शन नव्हतं तिला. तयारी मजबूत होती. तिला आधी कधी वाटलं नव्हतं की ते खेडगाव सोडून ती कधी बाहेर पडेल पण आता छान अनुभव होता, जगण्याची नवी उमेद होती, आत्मविश्वास होता. पुढे आयुष्य असं असेल याची तिने कल्पना केली नव्हती कधी. 

Interview ला कावेरी आत गेली. आत गेल्यावर तिने एक छान smile दिली. Interview घेणार्यांना हा अनुभव थोडा वेगळा होता. कारण एवढ्या मोठ्या interview ला येताना Candidate च्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन असतंच. Interview सुरु झाला. कावेरीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदी शिताफीने दिली. तिच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास interview घेणार्यांना ही जाणवत होता. कावेरीचा interview छान पार पडला. कावेरीला एक विश्वास होता की तिचं Selection होणार. 

UPSC कावेरी पास करते. आणि कलेक्टर म्हणून त्याचं जिल्ह्यात तिचं पाहिलं पोस्टिंग होतं. माधुरीला आभाळ ठेंगणं झालं होतं कावेरीला असं पाहून. कावेरीने आपल्या पदाची धुरा व्यवस्थित सांभाळली. कावेरीने माधुरीच्या मदतीने अनेक उपक्रम राबवले. आपल्या कामांची छाप कावेरी मागे सोडत पुढे जात होती. सरकारकडून मिळत असलेलं घर कावेरीने नाकारलं आणि माधुरीसोबतच रहात होती. 

एकदा रात्री उशिरा कावेरी घरी आली. बेल वाजवली. दार उघडला तर समोर एक देखणा तरुण उभा होता. कावेरी दोन मिनिट स्तब्ध उभी राहते. ते त्या तरुणाच्या लक्षात येतं. तो म्हणतो, "मी केशव, माधुरीचा भाऊ. आत या. माझ्या अचानक येण्याने तुमच्या लक्षात आलं नसेल. "
कावेरी आत येते. माधुरी जेवण बनवत होती, त्याचा सुंगध घरभर पसरला होता. कावेरी माधुरीला आवाज देवून कपडे बदलायला जाते. येवून ती माधुरीला मदत करू लागते. माधुरीला कावेरी म्हणते, " माधुरी, तुझा भाऊ येणार आहे, हे सांगितलं नाहीस मला. "
माधुरी, " अगं माझ्यासाठी पण Surprise च होतं. तो येणार आहे हे त्याने सांगितलंच नव्हतं. अचानक येवून धक्का दिला. म्हणून बघ आता घाई होतेय माझी जेवणाची. "
कावेरी, " ह्म्म्म.... "

जेवायला तिघे एकत्र बसले. कावेरीला थोडं ऑड वाटतं होतं.  कावेरीने बनवलेली भाजी केशवला खूप आवडते. तसं तो बोलूनही दाखवतो. केशवचा स्वभाव छान होता. जास्त बोलायचा नाही पण आवडलेल्या गोष्टीला मनापासून दाद द्यायचा. केशवला माधुरी विचारते दादा इकडे कसं येणं झालं ?  त्यावर केशव सांगतो, " डॉक्टर रिचर्ड आलेत ६ महिने भारतात आहेत. ते खूप मोठे ह्र्दयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचा assistant म्हणून माझी नियुक्ती झाली आहे. भारतातून त्यांच्या assistant म्हणून माझंच नाव पुढे गेलं. त्यामुळे इथे किमान ६ महिने तरी. मी इथे राहिलेलं चालेल ना ?  ( केशव कावेरीकडे पहात विचारतो. ) 
कावेरी म्हणते, " तुमचंच घर आहे. मी नाही म्हणायचं कारण नाही. " 

कावेरी आणि केशवची हळूहळू मैत्री होते. ते दोघे वेगवेगळ्या विषयावर बोलू लागले. एकमेकांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव share करू लागतात. आता कावेरीला केशव सोबत ऑड वाटतं नव्हतं. केशव एखाद्या लहान मुलीसारखी काळजी घ्यायचा. कोणालाही वाटावं की हाच आपल्या स्वप्नातला राजकुमार आहे. कावेरीला ही केशवबद्दल ओढ वाटत होती. पण तिला आपल्यासोबत झालेल्या गोष्टी चांगल्याच लक्षात होत्या. शिवाय आपण असा विचार करणं चुकीचं आहे असं तिला वाटत होतं.

 एकदा मोठा पाऊस सुरु होता. माधुरी तिच्या चित्रांच्या प्रदर्शनासाठी बाहेर गावी गेली होती. Dr. केशव आपली ड्युटी संपवून घरी आले. कावेरी अजून घरी आली नव्हती. केशव तिची वाट पहात दोघांसाठी डाळ - भाताचा कुकर लावतात. कावेरीला यायला बराच उशीर होतो. ती आल्यावर केशव पटकन टॉवेल आणून देतात आणि कपडे बदलायला सांगतात. कावेरी येई पर्यंत केशव छान कॉफी बनवून तयार करतात. कावेरी बाहेर आल्यावर वाफाळलेली कॉफी तिच्या समोर धरतात. कावेरी आणि केशव सोबत गॅलरीत बसून पडणारा पाऊस पहात कॉफी घेत गप्पा मारतात. बराच वेळ गेल्यानंतर ते दोघे जेवतात आणि पुन्हा गप्पा मारत बसतात. कावेरीला केशव सोबत छान वाटत होतं. तेवढ्यात लाईट जाते आणि कावेरी भीतीने केशवकडे सरकते आणि पटकन त्याचा हात पकडते. केशव तिला शांत बसवतो आणि मेणबत्ती पेटवून आणतो. मेणबत्तीच्या प्रकाशात कावेरी अजून सुंदर दिसत होती. 
केशव तिचा हात हातात घेतो आणि कावेरीला विचारतो, " कावेरी माझ्याशी लग्न करशील ? " 
कावेरीला काय बोलावं कळत नव्हतं. अस्वस्थ होऊन फक्त इकडे - तिकडे पहात होती. केशव पुन्हा तिच्याकडे पहात तेच विचारतात. त्यावर कावेरी डोळ्यात पाणी घेऊन म्हणते, " केशव तुम्हाला माहिती नाही पण माझं लग्न आधीच झालंय. तुम्हाला सर्व गोष्टी माहित नाहीत. "
त्यावर केशव, " कावेरी मला तुझ्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आहे. अगदी तू माधुरीला भेटल्या दिवसापासून. माधुरी तुझ्याबद्दल phone वर खूप बोलायची. तुझी धडपड, तुझी जिद्द, तुझा हार न मानणारा स्वभाव एक -एक गोष्ट माहित आहे मला. 
कावेरी त्याच्याकडे अविश्वासाने पहात होती. केशव बोलत होता., " तुझी एक -एक गोष्ट ऐकून मी तुझ्या प्रेमात हळूहळू पडत होतो. तुझा संघर्ष त्यातून तूझं उजळून निघालेलं अस्तित्व, व्यक्तीमत्व अद्वितीय आहे. मी याबद्दल माधुरी आणि आई - बाबांशीही बोललो आहे. त्यांना काहीच problem नाही. आता राहात राहिला प्रश्न तो तूझ्या संमतीचा. तू वेळ घे आणि मला तुझा निर्णय सांग. "

कावेरी आणि केशव आपआपल्या रूम मध्ये जातात आणि खिडकीतून तो कोसळणारा पाऊस पहात असतात. त्यावेळी केशवच्या मनात धून चालू असते, ' ये साजिश हैं बुंदोकी, कोई ख्वाईश हैं चूप चूप सी, देखो ना, देखो ना.... ' 
तर दुसरीकडे कावेरीच्या मनात काहूर माजलं असतं. असं हळुवार आणि काळजी घेणार प्रेम तिच्या आयुष्यात तिने पहिल्यांदा अनुभवलं होतं. त्या आधी तर फक्त...... 

कावेरीची आणि केशवची अवस्था वेगवेगळ्या जरी असल्या तरी भावना एकमेकांना जोडत होत्या.... 

येणारी सकाळ नक्की काय घेवून येणार आहे हे फक्त त्या येणाऱ्या पहाटेला माहित होतं.... 


क्रमश....... 

 

 

संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347


संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-2_3384


संघर्ष अस्तित्वाचा ३ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-3_3407


संघर्ष अस्तित्वाचा ४ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-4_3437

 

संघर्ष अस्तित्वाचा ५ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-5_3470


संघर्ष अस्तित्वाचा ६ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-6_3500


संघर्ष अस्तित्वाचा ७ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-7_3533


संघर्ष अस्तित्वाचा ८ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sanghrsh-astitvacha-8_3575


संघर्ष अस्तित्वाचा ९ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-9_3585

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now