संघर्षमय जीवन

लेख
संघर्ष

क्षणभंगूर मानवी जीवन हे अथांग महासागराप्रमाणे असून त्यात भरती ओहोटी प्रमाणे सुखदुःख जात येत असतात. प्रत्येक मनुष्य हा सुखप्राप्तीसाठी धडपडत असतो.ध्येयाकडे वाटचाल करतांना अनेक समस्या, अडथळे यांना सामर्थ्यपणे तोंड द्यावे लागते व जीवनात अनेकदा संघर्ष करावा लागतो.
ध्येय प्राप्तीसाठी केलेला प्रयत्न म्हणजेच ध्येय गाठण्यासाठी त्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक समस्या, अडचणीं, आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण त्रास सहन करून केलेल्या कृती, केलेला प्रयत्न म्हणजेच संघर्ष होय.
संघर्ष मानवी जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. संघर्ष दिशाहीन असला की, माणसांची होते माती. विकासाची थांबते गती. अनमोल असणारे जीवन होते मातीमोल. संघर्षाशिवाय माणूस मोठा होत नाही. पण, त्याच्या संघर्षाला दिशा हवी. दिशाच नसेल तर
जगण्यासाठी प्रयत्नवादी असणं आणि निराश अनुभव टाकून देणं जसं गरजेचं आहे, तसं प्राप्त परिस्थितीचा योग्य अर्थ लावणंही गरजेचं आहे. यासाठी माणसालाही संघर्ष करावाला लागतो स्वत:ला स्वत:शीच, पण इथे तो असतो आतला, अंतर्मनातला..
आपण आपल्या आजुबाजूला अशी बरीच लोकं बघतो, ज्यांच्यामध्ये थोडादेखील संयम नसतो.
ज्यांना कोणत्याही समस्येतून ताबडतोबत बाहेर पडायचे असते, कोणत्याही प्रयत्नानंतर लगेच यशाची अपेक्षा असते, ज्यांना संघर्ष न करता विजय प्राप्त करायचा असतो. आणि हे सगळे संघर्ष न करता मिळावे अशी त्यांची भाबडी अपेक्षा असते.
या जगातील लहानातील लहान जीवाला सुध्दा पुढचा क्षण पाहण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो.
जे संघर्षाला नाही म्हणतात ते, त्यांच्या आयुष्यात कित्येक सुखांना मुकतात. तुम्हाला जर तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान हवं असेल तर, तुमच्याकडे एकच गोष्ट कायम उरते ती म्हणजे स्वतःवरती संयम पाळून संघर्ष करत राहणे.

माझ्या अंतरीच्या वेदना
सागू मी आज कुणाला
आवरू कसा या क्षणी
माझ्या सैरभैर मनाला

वाट कशी करु मोकळी
अंतरंगातील भावनांना
पाझर फुटेल का कधी
दगडासम कठोर ह्रदयांना

करतोय अतोनात संघर्ष
जीवन जगतांना एकाकी
फायदा घेतला प्रत्येकाने
उरले नाही कुणीही बाकी

नियतीच्या फेरा माझ्याच
नशीबात का दिला देवा
संकटसमयी भी कुणाचा
करू सांगा मला धावा

अंतरीच्या वेदना जाणावयास
घेईल का कुणी अवतार
होईल का कलियुगात
अचानकपणे चमत्कार

©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर औरंगाबाद