Jan 26, 2022
नारीवादी

संघर्ष स्वतःशी...

Read Later
संघर्ष स्वतःशी...


लघुकथा स्पर्धा....प्रेरणादायक कथा
**********************************
वैदेही एक साधारण कुटुंबातली मुलगी बारावीत शिकत असते.दिसायला एकदम गोरी गोमटी, मध्यम बांधा,मोठे मोठे डोळे आणि लांबसडक काळेभोर केस. आईवडिलांना एकुलती एक मुलगी.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात आणि तेव्हाच  मावशीच्या मुलाचे लग्न असते.म्हणून वैदेहीने आधी यावे म्हणजे मावशीला मदत होईल असा मावशीचा आग्रह असतो. मावशी तसा फोन सुद्धा करते.

रात्रीचे साधारण नऊ वाजले असतात. तेवढ्यात फोनची रिंग वाजते, ट्रिंग ट्रिंग...वेदेही फोन उचलते "हॅलो,काय गं मावशी एवढ्या रात्री फोन केलास ? काय झालं?"

"अगं काही नाही,तुझे आई बाबा दिवसभर कामात असतात म्हणून म्हटलं रात्री बोलू.तू येणार आहेस की नाही दादाच्या लग्नाला".

"अगं मावशी हे काय विचारणं झालं? काय तू पण".

"बरं...दे आईजवळ".

"हो.. देते".

आई मावशीसोबत बोलते आणि लग्नासाठी रात्रीच पॅकिंग करायला सुरुवात करते.
आई बाबा आणि वैदेही तिघे लग्नाला जातात. लग्न मस्त धूमधडाक्यात लागतं.सगळे अगदी खुश असतात.

त्या लग्नात वैदेहीला नवरी मुलीकडचं एक कुटुंब पसंद करत. आणि मग ते तिच्या मावशीजवळ लग्नाचा विषय काढतात .लग्नाला दोन तीन दिवस होतात आणि मावशी लग्नाचा विषय आई बाबांजवळ काढते.मात्र बाबा सरळ नकार देवून मोकळे होतात.

पुढे दोन दिवसात वैदेही आणि आई बाबा घरी परत येतात.परत त्या मुलाकडचा फोन येतो "आम्हाला वैदेहीला बघायला यायचं आहे आता आलं तर चालेल का?".

तेव्हाही बाबा सरळ नकार देतात.तेव्हा मात्र आई बाबांना म्हणते "बघून तर घेऊ मुलगा कसा आहे?काय करतो?"

"अगं! पण वैशाली आपल्याला लग्न करायचे नाही तर विचारून उपयोग काय?"

"बाबा तुम्ही अगदी योग्य बोलत आहात ,अहो एवढ्या लवकर करत का कुणी लग्न? आता बारावीची पेपर दिलेत.अजून खूप शिकायचं मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं".

वैदेही बारावी पास होते.आणि मेडिकलला एड्मिशन घेते.साधारण एक वर्ष जात.तिच्या मावशीच्या मुलाला मुलगा होतो म्हणून आई आणि वैदेही बाळाला बघायला जातात.
तिथे तो मुलगा विकास आणि त्याची आई कमल आलेली असतात.तिथे लग्नाचा विषय निघत नाही पण विकासला वैदेही आवडते.

बाळाला बघुन सगळे आपल्या आपल्या घरी निघून येतात.आणि दोन दिवसांनी विकासचे आई वडील वैदेहीकडे येतात. ती कॉलेजला गेलेली असते.

वैदेहीचे आई वडील त्यांचे बाकी पाहुण्यांसारखे स्वागत करतात. नाष्टा-पाणी होतं आणि विकासचे वडील विषयाला हात घालतात.

"आमचं येण्याचं खरं कारण सांगतो भाऊ आमच्या विकासला तुमची मुलगी फारच आवडली आहे आणि आम्हाला तर ती एक वर्षापूर्वी आवडली होती.जर तुमची परवानगी असेल तर उडवून देवू बार"

"भाऊ,खरच चागलं वाटलं. कुणाला आवडणार नाही आपल्या मुलीचं भलं झालेलं.पण अहो माझी मुलगी लहान आहे अजून,शिकत आहे ती,तीच शिक्षण पूर्ण झाल्यावर विचार करू.हो तुम्हाला हरकत नसेल तर थांबा तुम्ही".

विकासची आई बोलते "त्यात काय एवढं लग्न झाल्यावर शिकेल ती.आता कित्येक मुली शिकतात.आम्ही पण शिकवू तिला".

"अहो ताई पण सासरी बरीच जबाबदारी वाढते.तिला पेलवणार नाही ती".चहाचा कप हातात देत वैदेहीची आई बोलते.

"अहो अंगावर पडलं की सगळ येतं.आम्हाला काहीच नकोय फक्त मुलगी हवी आहे.विचार करा आणि कळवा".

"हो हो कळवतो".

आणि ते निघून जातात. सतत आठ दिवस प्रत्येक नातेवाईकांचे फोन सुरू होतात.असा सबंध तुम्हाला कुठे सापडणार नाही,तुम्ही हो म्हणा.
घरात बरीच चर्चा होते.बाबांना मान्य नसतं पण आईच्या जिद्दिपुढे काहीच चालत नाही. सहा महिने जातात आणि विकास आणि वेदेहीच लग्न जुळतं.

विकास एका कंपनीत कामाला असतो.त्यांच दोघांचं लग्नाच्या आधी एक दोन वेळा भेटणं होत.

बाबा वैदेहीला विचारतात" काय गं कसा वाटतो तुला मुलगा? बरा आहे ना?नाहीतर"...

आई मध्येच बोलते "नाहीतर तोडणार आहात का लग्न?म्हणजे आपलीच बदनामी..काय करावं काही कळत नाही बाई या माणसाला". आणि बेडरूममध्ये चालली जाते.

वैदेही आणि बाबा दोघं पण हसतात.

लग्नाची शॉपिंग होते.त्या मध्ये वैदेहीला कळत की त्याच्या दोघांच्या आवडीनिवडी बऱ्याच वेगळ्या आहेत.

लग्नाचा दिवस उजाळतो.मुलीकडच्यांची बरीच घाई होते मात्र अगदी आनंदात लग्न पार पडतं.लग्नात कुठलाही तंटा होत नाही आणि वैदेही सासरी निघून जाते.

सासरचे वातावरण एकदम मस्त असते. सासू सासरे पण चागलं वागतात.लग्नाला पंधरा दिवस होतात.आणि वैदेही कॉलेजचा विषय काढते

"विकास अरे मला कॉलेजला जायला हवं".

\"अगं काय घाई आहे मैत्रिणी असतील ना तुझ्या त्या सांगतील ना तुला".

"अरे नाही ना, पण..".

"का! मित्र आहेत का तुझे मग?...बोलावं त्यांना घरी समजून सांगतील तुला ते.आणि स्पष्ट सांगायच झालं तर तुझे आईवडील पुढची फी भरत असतील तरच जा कॉलेजला नाही तर बंद कर ते तुझं थोटांग".

"विकास! काय बोलतोय तू,भानावर आहेस का तू?"

आणि विकास चक्क तिच्या थोबाडीत मारतो.ती रडायला लागते आणि हा घराच्या बाहेर निघून जातो.

दुसऱ्या दिवशी वैदेही सासू सासऱ्याना सगळं सांगते.पण कुणी काहीच बोलत नाही.
असा एक महिना निघून जातो वैदेहीची आई तिला फोन करते आणि म्हणते..

"अगं तू कॉलेजला येशील तर घरी ये,तुझी आवडती भाजी घेऊन जाशील".

"आई नकोय मला भाजी,घरी आणता आणता गार होईल ती".

"अगं अर्ध्या तासात तर येतं तुझं सासर,आणि म्हणते गार होते."

"नाही गं राहू दे नकोय काही"आणि फोन ठेवते.

जेवतांना वैदेही परत कॉलेजचा विषय काढते. तेव्हा विकास तिच्या अंगावर ताट फेकून मारतो.
"तुला सागितलं ना एकदा नाही करायचं कॉलेज म्हणून"

वेदेही रडत उठते तेव्हा तिची सासू म्हणते,

"काय गं तुला एवढंही शिकवलं नाही का आईने की जेवताना जे विषय आवडत नाही ते काढायचे नाहीत.कशाला त्याला राग आणून देते".

लगेच बाबा बोलतात "हो ना काय बघून केली हिला काय माहित.डोक ठिकाणावर नाही या पोरीच"

वैदेहीला खूप राग येतो.ती रागातच बोलते "काय बोलताय तुम्ही सगळे?आम्ही नव्हतो आलो. तुम्हीच आला होतात.कुठे गेली तुमची आश्वासन. हे जर का मी माहेरी सागितलं तर एक क्षण ठेवणार नाही मला ते इथे".

विकास उठतो तिचा हात धरतो आणि म्हणतो "धमक्या देतेस आम्हाला.कोण गं तू ,गुपचूप घरची कामं करायची आणि दोन टाइम गीळायच बस".

ती त्याच्या हाताला झटका देते.त्याचा राग अनावर होतो आणि तो तिला ओढत किचनमध्ये नेतो आणि तिला जाळण्याचा प्रयत्न करतो.
त्यात त्याची आईसुद्धा त्याला मदत करते.ती बिचारी "वाचवा... वाचवा... मला खूप त्रास होत आहे" म्हणून ओरडते पण ह्या लोकांना तिची कीव येत नाही आणि काही प्रमाणात ती जळते मग बेशुद्ध पडते.

विकास घाबरुन मग तिला दवाखाण्यात नेतो आणि तिच्या आईवडिलांना फोन करतो की स्वयंपाक करता असताना तिच्या साडीने पेट घेतला तुम्ही या दवाखान्यात.हे एकून तिच्या वडिलांना हार्ट अटॅक येतो.आईला काय करावं काही सुचत नाही. वडिलांचा अंत्यसंस्कार करून आई हॉस्पिटल मध्ये जाते.

हॉस्पिटल मध्ये वैदेहीची तब्बेत गंभिर असते. मृत्यूशी तिची लढाई सुरू असते.त्यात तिचे वडील गेले हे एकून ती खूप खचते मात्र आई तिला खूप हिंम्मत देते आणि म्हणते " वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरी तूला जगायचं आहे.तुझ्या आईसाठी तुला जगायचं आहे .आता तुझा संघर्ष हा दुसऱ्याशी नाही तर स्वतःशी आहे.तुला भरपूर काही मिळवायचे आहे आयुष्यात,तुला प्रत्येक लढाई जिंकायची आहे".

साधारण पाच महिने जातात आणि आणि ती बरी होते.त्यांनतर ती सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करते.आणि त्यांना अटक होते.

ती आईकडे राहून पुढंच शिक्षण घेते आणि एक मोठी डॉक्टर होते. आणि एक संस्था काढते ज्यामधे तिच्या सारख्या स्त्रियांना ती आधार देते.आणि स्त्रियांसाठी झटते.

"खरच संघर्ष स्वतःशी असो की दुसऱ्याशी  जिंकण्याची जिद्द,चिकाटी आणी आत्मविश्वास हा पाहिजेच".

लेख कसा वाटला ते नक्की कळवा.धन्यवाद!

©®कल्पना सावळे.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Kalpana Sawale

Business

Like to write Blog, story,poem,charoli and like to make Rangoli designs