संघर्ष एक कथा भाग १६

suddenly shalini starts labor pain ..

संघर्ष एक कथा -भाग १६

क्रमश: भाग १५

मंगेश ने सर्वच खुश राहतील असा एक निर्णय घेतला .. आणि तो म्हणजे मंगेश च्या आई ला गावी जायचे होते .. शालिनी ला तिच्या माहेरी जायचे होते आणि मंगेश ला इथेच ऑफिस होते .. मुले लहान होती त्यामुळे सध्या शाळेचे काही टेन्शन नव्हते .. शालिनी ७ महिन्याची गरोदर इकडे तीन मुलांना सध्या सांभाळू शकत नाही जरी बरी झाली असलॆ तरी गरोदर होती ..शिवाय गावाला तिचे आई वडील होते .. त्यांच्या बरोबर भाचा पण होता .. म्हणजे काही अगदीच अर्जेंसी आली तर तो होताच ..

तर निर्णय हा घेतला कि त्याने सर्वांना गावी सोडून यायचे ठरवले . त्याने शालिनी ला सांगितले

मंगेश " उद्या रविवार आहे तर मी तुम्हा सगळ्यांना गावी सोडून येतो .. म्हणजे आई ला पण जरा चेंज मिळेल ... तुला पण माहेरी तर माहेरी किंवा आपले घर आहेच.. मुले पण गावी आनांदात राहतात .. तिकडे तुला कामाचा ताण  पण पडणार नाही आणि मला पण कोणाचेच टेन्शन राहणार.. कारण आता आईला एकटीला गावाला ठेवयाचे त्यापेक्षा तुमची त्यांना सोबत होईल आणि तिची तुम्हाला होईल "

शालिनी " पण तुमच्या जेवणाचे काय ?"

मंगेश " त्याची काळजी तू नको करुस .. मला  तर पोटापुरते येतेच कि.. नाहीच झाले तर मी डबा लावीन  थोडे दिवस . "

मंगेश ने एकदा ठरवून टाकले कि टाकले आणि तो  कामाला लागला ..

शालिनी " मी काय म्हणत होते .. जायच्या आधी एकदा दवाखान्यात जाऊन  येते .. तसाही आता सातवा महिना लागलाय .. मी डिलिव्हरी साठी इकडेच येईल म्हणते .. तर तुम्ही मला तेव्हा घ्यायला या .. "

मंगेश " ठीक आहे मग एकदा सगळे चेक अप करून घे आज .. आणि इंजेक्शन वगैरे काही घ्य्याचे असले तर घेऊन ये .. आणि नाव नोंदवून ये .. "

शालिनी म्हणाली " ठीक आहे "

शालिनी ने सामानाची बांधबाध  करायाला सुरुवात केली . माधव ला कळले तसे तो आणि राघव दोघे उड्या  मारू लागले

" ए ... ए.. आम्ही गावाला चाललोय .. "

मंगेश ने आई ला पण सांगितले .. मंगेश ची आई पण गावाला जायचे म्हटल्यावर खूप खुश झाली . ती पण पटापट सामान बांधू  लागली . सगळेच मेंबर खुश .

शालिनी पण दवाखान्यात जाऊन आली .. तिला अंदाजे कधी तारीख असेल ते डॉक्टरांनी सांगितले ..

मग मुले शालिनी , मंगेश ची आई आणि मंगेश सर्वच गावी गेले .. तिकडे पण मंगेश ने बाई कडून घर साफ करून घेतले .. दोन  महिने पुरेल इतके सामान भरून ठेवले .. मंगेश च्या आई ने लाकडे आणली ..

घर शेणानं सारवून घेतेले . शालिनी ने मस्त रांगोळी काढली .. बऱ्याच दिवसांनी गावातील घराला घरपण आले .. मंगेश ची आई गावी आल्यावर तर खरॊखर मनापासून खुश राहायची .. तीच अक्खा जन्म तिकडे गेले होता त्यामुळे एक वेगळंच आनंद आणि अंगात पण ताकद यायचो .. जंगलातून लाकडे आणणे , नदीवरून पाणी आणणे हे असल्या कामांचे पण तिला काही वाटत नसायचे .. तरी पण हल्ली मंगेश तिला नदीवर जाऊन नाही द्यायचा .. पाणी आणायला सरळ बाई ला पैसे देऊन लावायचा पण माणसे जास्त असली कि किती वेळा पाणी आणणार .. मग तिला फक्त नदीवर कपडे धुवायला आणि भांडी घासायला ठेवली .. आणि पाण्याचे चार पाच हांडे आणून द्यायची .. त्या पेक्षा अधिक पाणी लागले तर शालिनी ला किंवा मंगेश च्या आईला च जावे लागणार होते . त्याकाळी हे काम अगदी नॉर्मल होते मंगेश च्य आईच्या एवढ्या अनेक बायका सर्रास नदीवर जायच्या आणि सातव्या महिन्यात गरोदर बायका पण जायच्या..

घरातला सगळं सेट अप झाल्यावर मंगेश जायच्या आधी नेहमी प्रमाणे  गुरुजींना भेटायला गेला ..

या वेळी दीक्षित गुरुजी खूपच थकलेले वाटत होते .. तसे त्यांचे वय पण खूप झाले होते .. माधव आणि राघव पण आजोबांना भेटायला आलेच होते .. नातवंडांना बघितल्यावर गुरुजी हांथरुणातून उठले तरी नाहीतर कामापुरते उठायचे आणि पुन्हा  झोपून जायचे .. तसे आजरी नव्हते पण वय खूप झाले होते त्यामुळे हे असे चालायचेच .

मंगेश बरोबर भरपूर गप्पा मारल्या त्यादिवशी.. मंगेश पण म्हणाला थोडे दिवस शालिनी  गावीच राहणार आहे .. आता  सातवा महिना आहे तर अजून डिलिव्हरी ला दोन महिने आहेत .. सर्वांनाच थोडा हवापालट होईल म्हणून इकडेच ठेऊन जातोय ... मी उद्या सकाळी जाणार आहे .

गुरुजी " मंगेश .. शालिनी ला वाचवलीस रे बाबा .. काय काय बघायला मिळतंय तुला या आयुष्यात ... तू होतास म्हणून हे सगळे करू शकलास .. "

मंगेश  आपला ऐकून घेत होता . तसे दीक्षित गुरुजी नेहमीच मंगेश चे कौतुक करत असत .. उगाच नाही त्यांनी आपला पोटचा गोळा त्याचा हाती सुपूर्त केला होता आणि त्यांच्या या निर्णयावर ते खूप खुश होते ..

माधव आणि राघव ला  या आजीचा पण लळा लागला होता ..आणि भाच्याची  पण चांगलीच ओळख झाली होती .. दोघे इकडे रमले होते .. तिकडे यायलाच मागत नव्हते .. पण मंगेश ने त्यांना सांगितले आई  आणि आदिती घरी एकटीच आहे तर आता चला मग उद्या वगैरे या .

दुसऱ्या दिवशी सकाळीच तो उठुन गाडीत बसला म्हणजे ११ वाजेपर्यंत ऑफिस ला जाता  येईल .

आणि अशा प्रकारे शालिनी आणि तिची मुले इकडे गावाला आली ... आणि इकडे आनंदात राहायला लागली .. कधी शालिनी आई कडे कधी सासरी येऊन जाऊन असायची आणि आनंदात असायची . असे करता करता तिला आता नववा महिना लागला होता .. आणि तिने मंगेश ला पत्र लिहिले होते कि " मला घ्यायला या "

(कथेची  सुरुवात मी या भागापासून सुरु झाली होती .. तिथुन  पुढे सुरु)

https://irablogging.com/blog/sabgharsh-ek-katha-_-bhag-1 रेफरन्स साठी लिंक attach करत आहे

तर अशा पद्धतीने मंगेश आणि शालिनी यांचा संसार आज  चौथ्या  बाळापर्यंत आला होता . आणि आता शालिनी मंगेश ची  आतुरतेने वाट बघता होती . कधी तो येईन आणि डिलिव्हरी साठी तिला शहरात घेउन जाईल .

तेवढ्यात शालिनीची आई आली तिला भेटायला . तिला म्हणाली

" तुझ्या डिलिव्हरी ला अजून  १० /१५ दिवस आहेत . माझं आणि तुझ्या बाबांचं एक काम आहे शहरात तर आम्ही दोघे इथे ५ दिवस नसु . तू काही काळजी करू नकोस आम्ही लवकरात लवकर येऊ . समजा तोपर्यंत मंगेशराव आले तर तर तू शहरात जाशील . मग मी नातवाचा तोंड बघायला तुझ्याकडेच येऊ , आणि आले कि मी राहील महिनाभर .”

शालिनी " काय ग आई " मी आहे तोपर्यंत नको ना जाऊ . “

शालिनी ची आई " अ ग हे बघ तुला छान डिंकाचे लाडू करून आणलेत. तसं महत्वाचं नसत तर गेले नसते मी पण जावंच लागणार आहे "

शालिनी ला आई बाबा पण आता इथे नसणार याने भीती वाढली . सासूबाई होत्याच पण त्या एकट्या काय काय करतील .

शालिनी चे दिवस खरं तर भरले होते .. पण डॉक्टरांनी जी तारीख दिली होती त्या नुसार अजून १० दिवस होते .. नेमके शालिनीच्या आई बाबांचे काम  पेन्शन चे काम निघाले त्यासाठी त्यांना शहरात जावे लागणारच होते .. भाचा राजेश ला घेऊनच ते दोघे जाणार होते .. आता सिचवेशन खूपच क्रिटिकल होती .. इकडे मंगेश ची  आई ती पण वयस्कर आणि तीन तीन नातवंडे घरात .. एरव्ही माधव आणि राघव तिकडच्या आजीकडे सुद्धा आनंदात राहायचे मग मंगेश ची आई आदितीला कडेवर घेऊन बसायची .

शालिनीच्या आईने कसे बसे लेकीला समजावलं तिच्या हातावर थोडे पैसे आणि खाऊ ठेवला आणि जड पावलांनी गेली

आता शालिनी ची आई बाबा पण निघून गेले ..

शालीनि मात्र खूप अस्वस्थ झालेली . नवऱ्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली .

आई गेल्यानंतर एखाद दिवस मध्ये गेला असेल आणि हिच्या जे पोटात दुखायला लागलं . घरात  तीन लहान मुले आणि म्हातारी सासू या व्यतिरिक्त कोणी नाही . हिला  वेदना सुरु झाल्या . सांगितलेल्या तारखेच्या १० दिवस आधीच तिची डिलिव्हरीची वेळ झाली .

मंगेश ची आई ने आदितीला कडे वर घेतले आणि सुईणीला  बोलवायला गेली .

माधव आणि राघव आजीच्या यामागे मागे धावत गेले ..

माधव आणि राघव तर आईला काहीतरी त्रास होतोय हे बघून रडू लागले .. ते रडतात म्हणून आदिती रडू लागली .. इकडे शालिनी प्रसव पीडे ने ओरडत होती .. मंगेश च्या आईची चांगलीच धांदल उडाली .. "थांबा रे पोरांनो , तुम्ही कशाला रडताय ?.. आदिती गप कि .. माझ्या कानाशी ओरडू नको "

माधव " आजी आई ला काय होतंय ?"

आजी " काय नाही रे .. तिच्या पोटातून आता बाळ येणार आहे "

राघव " आजी कोण येणार आहे ?"

आजी " थांब आत थोडा वेळ कळेलच तुला”

आजी "माधव तू दादा आहेस ना राघव आणि आदिती कडे लक्ष ठेव .. "

माधव " हो आजी ..चल राघव आपण आदिती शी खेळूया "

आणि माधव , राघव आणि आदिती तिघे बाहेर पडवी मध्ये खेळत होते .

आतून आईचा ओरडण्याचा आवाज येत होता . जरा जरा घाबरले पण होते .. आई ओरडते का ?

राघव म्हणत होता " हि आजी ना आई ला मारते कि काय ?"

माधव " ए जास्त बोलू नको .. आज्जी तुला पण मारेल .. “

शालिनी त्याच्या गप्पा ऐकत होती .. तिला हसावे का रडावे हेच काळात नव्हते .. एकतर ती इतकी घाबारली  होती .. सुईणी आता काय करणार ? हॉस्पिटल मध्ये कशी नर्स असतात .. पटापट करत असतात .. इथे हि सुईण पण साऊबाईंच्या वयाची होती .

घरात काही सोय नाही ..

सुईण बाई लगेच आली . म्हातारी सासू शेजारी पाजाऱ्यां बायांना हाक मारू लागली

" ए सुलया , ए विमल , ये ग ये बाई मदतीला ये माझ्या सुनेचे दिवस भरले

शालिनी पूर्णतः घाबरलेली  आता आपलं काय होणार ? आपल बाळाचं काय ?हे विचार तर होतेच पण वेदना होताना ती रडकुंडीला आली होती . आई पण जवळ नाही . नवरा पण नाही .

🎭 Series Post

View all