संघर्ष एक कथा - भाग- ९

In this part Magesh and shalili got baby girl in their family

संघर्ष एक कथा - भाग ९

क्रमश: भाग ८

शालिनी शिक्षकांची मुलगी असल्यामुळे ती तिच्या  मुलांवर चांगले संस्कार करायचा प्रयत्न करत होती . त्यांचे घरमालक , आणि इतर शेजारी असलेल्या बायकांशी  तिची खूप छान मैत्री झाली होती . मैत्री पेक्षा चांगला घरोबा झाला होता . माधव आणि राघव चा पण सगळ्यांना लळा लागला होता . ज्याला वेळ मिळेल तो या दोघांना घेऊन जायचे . त्यामुळे शालिनी  ला तरी त्यांची एक प्रकारे मदतच होयची .

तेव्हा ची परिस्तिथी आपल्याला वाटते तेवढी सोप्पी नाहीये . घरात रॉकेल चा स्टोव्ह असायचा . त्या स्टोव्ह वर जेवण बनवायचे . मेस चे डबे , रात्रीचे जेवायला येणारे लोक . शिवाय हे सगळं खाणं एका स्टोव्ह वर करायचे . नुसता दूध तापायला वेळ लागायचा आणि  मोठा केला कि उतू जातंय बारीक केल कि वेळ जातोय आणि हे कुणाला  सांगू पण शकत नाही. रॉकेल  च्या धुराने तोंड काळे होण्याचे ते वेगळेच. कधी कधी तर भडका उडायचा . शिवाय मुले पण लहान होती त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून बघावे लागत असे .

माधव  जाम मस्तीखोर होता . त्या छोट्याशा घरात तो नुसता पळत सुटायचा . त्याला बघून राघव त्यांच्या मागे पळत सुटायचा . शालिनी ची जरा इकडची नजर  तिकडे  गेली कि माधवाने काहीतरी उदयोग केलेला असायचा . एकदा तर माधव ने गरम तव्यावर हात ठेवलंन . नाजूक हातांना चटका बसल्यावर असा किंचाळला होता . आठवलं तरी शालिनी चा जीव तुटतो . दिवस भर तिची आपली तारेवरची कसरत चालू असायची .

विहिरी वर जाऊन पाणी आधी रहाटाने बादली बादली ने ओढायचे ते आणून घरात साठवायचे . पिण्याच्या पाण्याचा नळ खूप लांब होता तिकडून ते पाणी भरून ठेवायचे .. त्यात ती ५ महिन्यांची गरोदर आणि दोन मुले लहान पण आहेतच . इकून काय  मंगेश बरोबर शालिनी पण तिचे आयुष्य संघर्षात काढत होती . तरीही एक बरं होतं गावातल्या लाइफ पेक्षा इकडे थोडे चांगले होते . त्यातच ते दोघेही खूष होते . सांगायचा मुद्दा हा आहे कि त्या काळातली लोक त्यांच्याकडे काहीही नसताना का खुश असायची माहितेय . त्यांचा एक स्वाभाव जो कि जे आहे त्यात ते खुश असायचे .जे नाही त्या चे दुःख करत बसण्या पेक्षा आपल्या कडे जे आहे त्याचा ते आनंद घ्यायचे . हल्ली माणसाला काही ना काही हवेच असते . समाधान हि मनाची स्टेज त्यांची होतच नाही .

सायकल घेतली कि गाडी पाहिजे होती मग मज्जा आली असती असे म्हणण्यापेक्षा माझ्याकडे मी चालत जाण्यापेक्षा सायकलने जातोय याचा आनंद जास्त असायचा .

हल्ली एका मुलाला जन्म घालताना आई वडिलांना प्रश्न पडतो . त्यांचे शिक्षणाचा खर्च आपल्याला पेलेल का असा विचार सर्रास लोक करतात .असा विचार आपल्या आधीच्या पिढी   ने विचार केला असता तर आपण आज जगात आलोच नसतो .

मंगेश हल्ली थोडा थोडा वैतागतो . कधी कधी बायकोवर चिढतो पण . सारखे सारखे पैसे उसने घ्यायचे . बाकी सगळी सोंग घेता येतील हो पण पैशाचं सोंग घेता येत नाही  . पैसे वाचवणे , साठवणे ह्या लेवल पर्यंत तो पोहचतच नव्हता .ह्या सगळ्या प्रकाराने त्याला कधी कधी वैताग यायचा   आणि मग त्याची चीड चीड होयची

कधी कधी खूप चिडायचा ... शेजाऱ्यांना सुद्धा कळायचे कि आज मंगेश चिडलाय ते . शालिनी बिचारी गप्प बसायची . आणि एकटी असली कि रडून घ्यायची . आणि पुन्हा कामाला लागायची . नंतर मंगेश ला पण वाईट वाटायचे त्याच्या वागण्याचे मग ते गिल्ट काढ ण्यास तो येताना शालिनी साठी मोगऱ्याचा गजरा  घेऊन यायचा . आणि मग शालिनी ची कळी खुलायची .आणि दोघे सकाळी काही झालेच नाही असे समजून पुन्हा संसार करायला तयार होयचे .

आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस हा या पेक्षा   चांगला असणार आहे याची खात्री आणि आशा हि माणसाला स्वप्न बघण्या पासून थांबवत नाही . आणि हि छोटी छोटी स्वप्न उद्या ची वाट बघायला  लावतात . दोन गोंडस मुले आणि शालिनी आता अजून एक बाळाला जन्म देणार होती . फार लांबचा आणि  भविष्याचा विचार न करता प्रेसेंट मध्ये जगायला शिकल  पाहिजे म्हणजे आयुष्याचा संघर्ष जगताना त्याची जाणीव होते पण त्याचे चटके लागत नाहीत .

" झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे . " हे जरी असले तरी त्यातून काहीतरी शिकावे आणि मग पुढे चालावे कारण प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही  तरी देवाचा हेतू  असतो . म्हणतात ना " एव्हरी थिंग इज प्लॉन्ड "

दिवस पटापट जात होते . शालिनी ची डिलिव्हरी जवळ येत होती . मंगेश ने गावी पत्र लिहिले होते त्याच्या आईला आणि शालिनीची आई ला बोलावून घेतले होते . म्हणजे डिलिव्हरी च्या वेळी गडबड होणार नाही . यावेळी मंगेश ने पगार झाल्यावर पाहिले आधी घरात जिन्नस भरून ठेवले ठेवले . बाळाच्या स्वागताची जय्यत तयारी चालू होती  आणि या  महिन्यात त्याला थोडा पगार वाढवून मिळालेला होता त्यामुळे तो हि मुक्त हस्ताने खर्च करत होता . आई आणि सासू दोघींना बोलावलं होतं.

प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते  आपल्या हातात काहीच नसते . पूर्वी म्हणायचे पौर्णिमा अमावास्येला जवळ आली कि डिलिव्हरी होते तसेच झाले त्या महिन्याच्या अमावास्येला रात्री १० वाजता शालिनीच्या पोटात दुखायला लागले आणि घरातल्यांची चांगलीच धांदल उडाली .

मंगेश रिक्षा बोलवायला गेला तर रिक्षा मिळेना . शेवटी अश्या अवस्थेत मंगेश ने शालिनीला सायकल वर पुढच्या दांडीवर बसवले आणि दवाखान्यात नेले . नर्स ला आता चेक करायची गरजच पडली नाही हीच ती वेळ आलीय हे तिला हि कळले . नर्स ने लगेच तिला आत घेतले आणि मंगेश ला पैसे भरायला सांगितले . मंगेश चा हात खिशाकडे गेला आणि त्याला कळले  कि आपल्या खिशात हॉस्पिटल ची फी भरण्या इतके पण पैसे नाहीत . हॉस्पिटल मधला अधिकारी जरा वैतागलाच पण मंगेश ने वेळ मारून नेली .मी आता गडबडीत आलो तर पैसे घरीच राहिले . उद्या सकाळी  देतो .दिसताना हा प्रसंग खूप छोटा वाटतो पण ती वेळ किती क्रिटिकल होती हे मंगेश ला आणि शालिनी ला च माहित . कारण रात्री अचानक पोटात दुखणे आणि रिक्षा न मिळाल्या मुळे सायकल वर नऊ महिने भरलेल्या बाई ला जिच्या पोटात प्रसूती च्या कळा मारत आहेत तिला सायकल ने हॉस्पिटल ला नेणे हा प्रकार कोणत्या तरी सिनेमा मधला एखादा रोमांचक किस्सा असल्या सारखाच आहे . अशा प्रसंगाच्या वेळी घाबरून ना जाता प्रसंगावधान बाळगून वागावे लागते .

काही वेळेतच एक गोरी गोरी पान ,गोंडस मुलगी बाहेर आणून मंगेश च्या हातात दिली . मुलगी ला पहिल्या वर मंगेश चे सगळे दुःख भुर्रकन उडाले . मंगेश  शालिनी ला भेटायला गेला . ती पण खूप खुश दिसत होती . तिला यावेळी मुलगीच पाहिजे होती आणि मुलगीच झाली . दोन मुलींवर मुलगा झाल्यावर एखाद्याला जेवढा आनंद झाला असता ना तेवढाच आनंद या दोघांना झाला होता . . तोपर्यंत शालिनीची आई रात्री चालत चालत हॉस्पिटलला आली . बराच वेळ वाट बघितल्यावर तिला आता घरी बसवेना . ती दोनदा तीनदा हॉस्पिटल ला गेली  होती त्यामुळे तिला रस्ता माहित झाला होता . मंगेश च्या हातात लहान मुलगी  बघितले आणि शालिनी ची आई पण खुश झाली . ती मंगेश ला म्हणाली " जावई बापू आता तुम्ही घरी जाऊन आराम करा . मी थांबते हिच्याजवळ . " बाळ आणि बाळंतिणीला तिथेच ठेवून मंगेश घरी आला

शालिनीची आई शालिनी ला पण भेटली . तिची चौकशी केली आणि बाळाला झोपवले आणि तिला म्हणाली " शालिनी आता उद्या लगेच ऑपरेशन करून टाका . आता झाली तीन मूल . चांगली दोन मूल एक मुलगी खूप छान झालं . आता लगेच ऑप्रेशन चे बघा .

शालिनीला पण हे पटले होते . ती पण म्हणाली हो मी बोलते उद्या त्यांच्याशी

शालिनी मनोमन खूप खुश होती . तिने मुलीचे नाव पण ठरवले होते . तिने त्या वाचलेल्या कादंबरी मधले नाव तिला खूप आवडले होते तेच नाव ती आता आपल्या मुलीला ठेवणार होती  आणि ते नाव होते अदिती  .घरात अदिती  येण्याने सर्वच खुश होते . माधव आणि राघव पण बाळाला बघून खूप खुश होते . अदिती पण गोंडस, गोरी गोरी पान होती . माधव आणि राघव पेक्षा रंगाने गोरी होती .

शालिनीच्या मनात ती का गाणं गुणगुणत होती " मेरे घर आई एक नन्हीं परी "

इकडे मंगेश ची वेगळीच गडबड चालू होती . मंगेश आई म्हणाली " मंगेश घरातले जिन्नस संपलेय . उद्या हॉस्पिटल ला डबा द्यायला लागेल ना . मंगेश ला कळेना आता पगार होइ पर्यंत पैसे कुठून आणू . कोणाकडून मागू . या विचारातच तो पडला .

दुसऱ्या दिवशी सकाळी मंगेश ऑफिस ला गेला . आणि ऑफिस मधून त्याने ऍडव्हान्स सॅलरी घेतली . येता येता हॉस्पिटल मधले फी भरली . बाळाला दोन नवीन ड्रेस घेतले . घरी येताना थोडे वाण्याकडून उधार जिन्नस आणले .

मग मंगेश च्या आई ने मस्त गावठी तुपातला शिरा केला आणि मग डबा घेऊन गेला बायकोला.

मंगेश ला कळून चुकले होते कि आयुष्यात सुख येवो व दुःख पैशा शिवाय काही होत नाही .

शिरा खाऊन झाल्यावर शालिनी मंगेश ला म्हणाली

" आपण आता माझे लागोलग ऑपेरेशन करून टाकू . तीन मूल बास झाली नाही का ?

मंगेश काय बोलणार होता . आता हीच फी भरण्यासाठी मंगेश ने काय काय केले होते हे त्याच त्याला माहित होत . आता लगेच ऑपेरेशन म्हणजे पुन्हा थोडा वेगळा खर्च होईल . मुद्दा जरी बरोबर असला तरी तो पूर्ण करण्यासाठी पैसे लागणार होते आणि तेच आता त्याच्या कडे नव्हते .

मंगेश " आता नको .. आपण पुढल्या महिन्यात सेप्रेट तुला ऍडमिट करू आणि मग करू . आता  आधी घरी जाऊ ."

शालिनी पण ठीक आहे असेच म्हणाली . पण हि गोष्ट शालिनीच्या आई ला काही पटली नाही . ती जरा नाराजच झाली . तिने मंगेश ला बोलून पण दाखवलन

" अहो जावईबापू असल्या कामांना पुढे ढकलायच नसतं . राहून गेलं कि गेलं . सध्या मी पण आलेच होते तर होऊन गेले असते . "

मंगेश " नको आता .. मी पाहतोय ना ... "

शालिनीची आई " बघा बाबा ,  निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजे "

शेवटी शालिनी बिना ऑपरेशन घरी आली .

🎭 Series Post

View all