संघर्ष एक कथा - भाग १९

In this part mangesh ani shalini does that satsang course and mangesh decide to follow aal the guidlines by them. he stops drinking , smoking and tuns into vegetarian.

                                                    संघर्ष एक कथा - भाग १९

क्रमश: भाग १८

संध्याकाळ झाली मंगेश पुन्हा ऑफिस मधून निघाला . त्याच्या नेहमीच्या स्टाईल प्रमाणे सिगारेट तोंडात ठेवून तो घराकडे निघाला . त्याला माहित होते वाटेत ते मंदिर लागणार आहे आणि तीच व्यक्ती पुन्हा आपल्याला अडवणार आहे आणि मग मला  आता मंदिरात जावे लागेल . जाऊ का ? कि शालिनी सांगतेय तसे नको त्या भानगडीत पडायला ? असा विचार  करत येत होता ..

लगेचच मंदिरा जवळ आला . ती व्यक्ती उभी तिथेच होती नवीन लोकांना सांगत होती कि " या मंदिरात या .. तिकडे सत्संग चालू आहे त्याची माहिती घ्या "

त्या नवीन व्यक्तीशी बोलताना त्याने मंगेश ला पहिले पण नाही आणि मंगेश डायरेक्ट घरी निघून गेला .. घरी आरामात बसून चहा प्यायला पण त्याचे चित्त काही थाऱ्यावर नव्हते . शालिनीला  बरे वाटले कि मंगेश ने हा निर्णय घेतला .. आणि तीनें  चहा घेता घेता  त्याला सांगितले कि टीचर ट्रेनिन्ग कोर्स  केला तर इथल्या बालवाडीमध्ये मला पण नोकरी लागू शकते .. " मला तो कोर्स करायचा आहे .. मी करू का हो ?

मंगेश  म्हणाला "उदया  सगळी  माहिती काढून ये .. फी किती आहे किती वाजता आहे वगैरे मग बघू "

शालिनी पण खूप खुश झाली .

मंगेश च्या मात्र डोक्यात आज मंदिरात जायला पाहिजे होते असेच वाटत होते

संध्याकाळ झाली कि चौघे मुले शालिनीने दिवा लावला कि शुभंकरोती म्हणायचे .. मग माधव राघव पाढे म्हणायचे . प्रत्येक जण  अभ्यास करायला बसायचे  पॅड म्हणून जेवायला बसायचा  पाट घेऊन बसायचे .. मंगेश ला वेळ मिळाला कि  तो पण मुलांचा अभ्यास घ्यायचा .. रात्री खोबरेल तेलाची बाटली घेऊन बसायचा .. एक मागून एक चौघे तेल मालिश करून घ्यायचे .. चौघांना तेल लावले कि एक साथ चौघे जण तेल्या मारुती दिसायचे  ..

पुढल्या दिवशी शालिनी आदिती ला शाळेत सोडायला गेली तेव्हा कोर्स ची माहिती काढून आली . आणि संध्याकाळी मंगेश ची वाट बघत थांबली होती ..आज पुन्हा मंगेश घरी नेहमीच्या वेळेत आला नाही . येताना  मंगेश आज मंदिरात स्वतःहून गेला आणि त्यांना सांगितलें कि मला हा कोर्स आज पासून करायचाय . मंगेश चा मनाचा निर्णय झाला होता आणि त्यावर त्याने लगेच ऍक्शन घेतली पण होती .

मंगेश   मनापासून ते ज्ञान ऐकत होता . आज त्याला कळले कि आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन म्हणजे योग.. आणि हा योग करण्यासाठी आपण एक आत्मा आहोत हा अभ्यास आधी कराव लागतो . हळू हळू हा रोज केल्याने हे सहज शक्य आहे . सुरुवात करण्यासाठी खान पान शुद्धी असली पाहिजे . मंगेश ने सगळे ऐकून घेतले . त्याच्या लक्षात आले कि खाण्याच्या सवयी बदलायच्या साल्या तर हा कोर्स मी एकट्याने करून उपयोग नाही . शालिनी ला पण हा कोर्स करायला लावला पाहिजे . मंगेश त्या दिवसाचा कोर्स करून घरी  आला . शालिनी च्या लक्षात आले कि  साहेब तिकडे जाऊन आलेत ते ..

शालिनी ने त्याला टीचर ट्रेनिन्ग कोर्स ची माहिती सांगितली ..

मंगेश " ठीक आहे घेऊ ऍडमिशन .पण उपयोग करशील ना ?

शालिनी लहान मुलासारखी " हो.. " असे पटकन म्हणाली .

 शालिनी खुश झाल्यावर त्याला चहा करून आणला . चहा पिल्यावर मंगेश ने तिला सांगितले कि  "हे ज्ञान पण चांगले आहे . तू उद्या पासून माझ्या बरोबर चल . आपण दोघेंहि ते ऐकून घेऊ .. ऐकायला काय जातंय "

शालिनी " नको बाबा .. मला नको ते ज्ञान , मला नाहि जमायचे आणि कळायचे पण नाही "

मंगेश " अग तू कलावती आईंच्या  भजना साठी जातेस ना तिकडेच आहे "

शालिनी " हो माहितेय मला "

मंगेश " अग ते लोक विचारत होते घरी कोण कोण आहे ..जमेल तर त्यांना पण घेऊन या .. तुझी ओळख करून देतो .. तिकडे खूप लेडीज येतात . खूप तेजस्वी लेडीज आहेत . भक्ती मार्ग पूर्ण झाल्यावरच हे ज्ञान मिळते .. तू जेवढे उपास , तपास , संकष्टया करतेस त्याचेच फळ आहे हे . "

शालिनीला मंगेश तिकडे येण्या साठी पटवू लागला . शेवटी शालिनी तयार झालीच . एकदाच येईन  असे सांगून .

शालिनीला मंगेश तिकडे येण्या साठी पटवू लागला . शेवटी शालिनी तयार झालीच . एकदाच येईन  असे सांगून .

झाले शाळेचा कोर्स राहिला बाजूला शालिनीचा आणि मंगेश चा  हा कोर्स आधी झाला .मंगेश ला हे ज्ञान इतके पटले कि कोर्स झाल्या झाल्या त्याने निर्णय घेऊन टाकला आज पासून मी दारु , सिगारेट ला कधीही हात लावणार नाही , मी कधीही नॉनव्हेज खाणार नाही . एका रात्रीत त्याला विरक्ती आली . ह्या सगळ्या गोष्टी एक दिवसात सुटणे अशक्य आहे पण मंगेश ने तडकाफडकी हा निर्णय नुसता घेतला  नाही तर तो अमलात पण आणला .

सिगरेट आणि दारू सुटल्याचा आनंद तर नक्कीच शालिनी ला पण झाला पण अचानक नॉन व्हेज बंद म्हणजे जरा कठीणच होते .. मुलं लहान आहेत त्यांच्या साठी तरी हे आवश्यकच आहेच . त्यामुळे हे तिला जरा खटकत होते .

मग एक दोनदा घरात मुलांसाठी म्हणून तो  आणून द्यायचा पण स्वतः नाही खायचा .. नंतर मग त्याला तेही पापच करतोय असे वाटू लागले .. शेवटी त्याने घरात शालिनीला सांगितले " जर तू नॉन व्हेज खाणे सोडले नाहीस तर मी तुझ्या हाताचे केलेले खाणार नाही .. माझे मी बनवून खाईन "

शालिनी च्या लक्षात आले कि आता मंगेश हट्टाला पेटला आहे आणि शेवटी ती पण तयार झालीच .

नंतर मग जसे जसे ज्ञान तिला कळू लागले तसे तिला हि हे पटले पण सुरुवातीला तिला हे जरा कठीण झाले होते . पण मंगेश मात्र  त्याला हे सगळे इतके पटले कि त्याचे सर्व आचरणच  बदलून गेल .

जनरली नवऱ्याच्या वाईट सवयी सोडवण्यासाठी बायकांना काय काय करावे लागते पण इकडे तरी गोष्ट वेगळीच होती मंगेश स्वतःहून बदलला होता .

मंगेश ला आयुष्य जगण्यासाठी एक नवीन ध्येय मिळाले होते ते म्हणजे “देवी देवतांना पूजण्या  पेक्षा देवी देवतांसारखे बनायचे .”. आणि त्यासाठी त्या ज्ञान मार्गावर तो चालू पण लागला होता

मंगेश सकाळी उठून योग म्हणजे ध्यान करू लागला .. वाचन , शुद्ध सात्विक आहार करु  लागला . मंगेश मध्ये होणारे बदल शालिनी ला चांगलेच जाणवत होते .. तिला भीती वाटू लागली कि हा माणूस एक दिवस सन्यास वैगरे घेईल कि काय ?. शालिनी खर तर खूप काळजीत पडली होती . अजून सर्वच मुले लहान होती . उभे आयुष्य डोळ्यासमोर पडले होते .. आता आपले कसे होणार ? संसार कसा चालेल . हे जे काही चाललंय ते वरकरणी  चांगले दिसत आहे पण मनातुन ती घाबरली होती .. काय चूक काय बरोबर सध्या तरी तिला काही कळत नव्हते .

शालिनी ने टीचर टेंनिंग कोर्स चालू केला .तिचे तिचे पण एक रुटीन सुरु झाले . आजी बाई होतीच मदतीला .. ती जर इकडे असली तर तिची चांगलीच मदत तर होयचीच  . एक दिवस अचानक गावातून एक  तार  मंगेश ला ती ऑफिस मधेच  मिळाली

" दीक्षित गुरुजी गेले "

तार  वाचून मंगेश च्या डोळ्यातून एक अश्रू निघालाच . ताबडतोब घरी आला आणि येताना शालिनीला आणि मुलांना घेऊनच घरी आला . शालिनी ना काळे ना कि अचानक आज कोर्स मधून मला न्यायला का आले ? मंगेश घरी येई पर्यंत काहीच बोलला नाही . आणि घरी आल्यावर शालिनी ला सांगितले कि आपल्याला आत्ताच्या आता गावाला जावे लागणार आहे .. गावाकडून तार  आलीय .

शालिनी ने तार वाचली आणि तिथेच  रडायला लागली

मंगेश ने तिला कसे बसे शांत केले आणि म्हणाला आता आधी आपल्याला निघायला पाहिजे .. आवरा पटापट .

शालिनी च्या अंगातून  जणू त्राणच  गेले होते.  मंगेश फॅमिलीला घेऊन गावी गेला .

शालिनी आणि मंगेश ची लोक वाटच बघत होते .. शालिनी त्यांची मुलगी आणि मंगेश जावई म्हणून लोक थांबले होते ..

शालिनी आणि शालिनी ची आई , मंगेश ची आई नुसत्या रडतच होत्या ..

भाचा राजेश त्याला हि दुःख होतेच , त्याने मुला  प्रमाणे गुरुजीनींची सेवा केली होती आणि त्यांनी पण पित्या सारखी माया केली होती त्याच्यावर .  पण तो  त्याचे दुःख लपवून लोक सांगतील तसे करत होता..

मंगेश चा तर सपोर्ट सिस्टिम होते गुरुजी . त्याला सगळ्यात जास्त चांगला त्यांनी ओळखला होता. त्याचे पोटभरून कौतुक करणारे  एकमेव गुरुजीच होते .

शालीनि चे  तर जीव कि प्राण होती त्यांची .. मोठी झाली तरी वडिलांच्या जवळ झोपायची .

अचानक घरावरचे छपरं उडून जावे आणि सर्व संकटांना आता आपल्यालाच तोंड द्यावे लागणार असे काहीतरी फीलिंग येते जेव्हा घरातील वडील माणसे सोडून जातात .

गुरुजीं चे अंतिम दर्शन घ्यायला अख्खा गाव तर जमा झालाच होता पण लांब लांबून त्याचे विद्यार्थी पण आले होते .  जो येईल तो "देव माणूस होता हो "असेच बोलत होते .

🎭 Series Post

View all