संघर्ष एक कथा - भाग १७

In this part gives birth to a baby girl. because of baby girl everyone is happy .

                                              संघर्ष एक कथा - भाग १७

क्रमश:भाग १६

गावातल्या सुईणी जरी म्हतार्या असल्या तरी त्यांना अनुभव दांडगा असतो . आणि हि वेळ त्यांच्यासाठी काही नवीन नव्हती . तिने पटापट बाकीच्या  बायांना  मदतीला घेऊन शालिनीची डिलिव्हरी आरामात केली  आणि घर बाळाच्या रडण्याच्या आवाजाने भरून गेले . आतून बायकांचा आवाज येऊ  लागला " मुलगी झाली ... मुलगी झाली"

शालिनी आता ओरडायची थांबली .. आणि शांत झोपून राहिली .. सुईणीला नाळ कापायला कात्री पाहिजे होती .. अख्या गावात तिला कात्री सापडेना .. शेजारून  मंगेश च्या आईने कुठून तरी गंजकी ब्लेड घेऊन आली . त्या ब्लेड ला गरम पाण्यात टाकून नाळ कापली .. शालिनी सगळे ऐकत होती .. ती पुरती घाबरली  होती पण काहीच  करू शकत नव्हती .. जे चाललंय ते पाहत होती .. मंगेश च्या आईने तिची  एक मऊ साडी फाडली आणि बाळाला आंघोळ घालून त्यात गुंडाळले .. पाणी अंगावर पडेल तस तसे बाळाचा रडण्याचा आवाज वाढायचा ..

बाळाचा आवाज ऐकला कि माधव  आणि राघव  उड्या  मारायचे .. आदिती चे उलट बाळ रडले कि ती पण रडायची .

घरात नुसता सावळा  गोंधळ ..

थोड्या वेळाने बाळ रडण्याचा आवाज थांबला कारण बाळ झोपले .. शालिनीचा आवाज पण थांबला ..आणि मदतीला आलेल्या बायका एक एक करून जाऊ लागल्या .

तेवढ्यात शेजारची बाई " माधव ला म्हणाली , काय रे माधव तुला अजून एक लहान बहीण आली . मज्जा आहे मग " माधव ला आदिती उचलत पण नव्हती   तरी पण उरापोटी घेऊन उचलायचा  . तिला उचलून तिघे  आत मध्ये बाळाला बघायला गेले.

शालिनीच्या  सासू बाईची नुसती धांदल उडाली . या पोरांकडे  बघू कि सुनेला बघू कि या या नवीन  बाळीला  बघू .

बोलता बोलता घराचं नंदनवन झालं .

इकडे मंगेश चा पगार झाला शुक्रवार भरला आणि त्याने शनिवार ची रजा टाकली आणि तो s t . मध्ये बसला शालिनीला आणायला म्हणून .

दोन अडीच महिन्यांनी बायको , मुले  आणि आई भेटणार म्हणून खूप आनंदी होता . संध्याकाळी घरी पोहचला.

तेवढ्यात आतून माधव राघव बाहेर आले  " बाबा आले ... बाबा आले.. "

मंगेश ने  दोघांना एकदम उचलून घेतली .. त्यांच्या मागून आदिती पण रांगत रांगत बाहेर आली आणि मंगेश कडे बघून हसू लागली ..आणि खुणावू लागली " मला  पण घ्या .. मला पण घ्या "

 तेवढ्यात आतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि मंगेश अश्यर्यचकित झाला .. " झाली पण डिलिव्हरी "

मंगेश आतमध्ये गेला बघतो तर बाळ दुपट्यावर खेळत होत . आणि शेजारी शालिनी झोपली होती .

शालिनी ला व्यवस्थित पाहून तो हि खुश झाला .

शालिनी लटक्या रागातच त्याच्याकडे बघत होती .. ती डोळ्यातून त्याला जणू विचारत होती " जरा आधी नाही का यायचं ?

पण त्याचे तर काय चुकले.. डॉक्टरांनी जी तारीख सांगितली होती त्या तारखेच्या आधी १० दिवस डिलिव्हरी झाली .. त्या हिशोबाने तो बरोबर आला होता . असो अशा पद्धतीने मंगेश च्या घरी अजून एक मुलगी आली आणि ती आता शेंडेफळ झाली म्हणजे झालं ( शेंडेफळ म्हणजे सर्व भावंडात लहान किंवा धाकटे मुल)

आज बऱ्याच वर्षांनी मंगेश च्या गावच्या घरी मंगेश च्या लग्नानंतर काहीतरी खळबळ झाली होती .. घर कसं मस्त गजबजलेले . गावातल्या बाया येता जाता बाळ बघायला यायच्या .. बरेच जण शालिनी ला पण बघायला यायच्या . .. मंगेश च्या आई ची नुसती गडबड .. आलेल्या गेलेल्यांना बघणे .. खाण्या पिण्याचे बघणे , पोराचे बघणे, आदिती तर लहान होतीच , आता  नवीन बाळी तिची पण अंघोळ पाणी शिवाय शालिनी ओली बाळंतीण ..किती कामे असतील मंगेश च्या आईला तुम्ही विचारूच नका

दोन दिवसानीं शालिनीची आई आणि बाबा शहरातून आले .. ते पण आश्यर्यचकित झाले ..  दोन दिवस आम्ही बाहेर गेलो काय आणि डिलिव्हरी झाली पण .

शालिनी तिच्या आई वर पण जरा नाराज झाली .. आई तुला मी बोलत होते जरा थांब .. पण तू पण ऐकले नाहीस .. बघ इकडे केवढी गडबड झाली .. सासूबाईंची केवढी धांदल  उडाली ..

"काय करणार काही गीष्टी चा निव्वळ योगायोग असतो . तू आणि बाळ व्यवस्थित आहेत ना मग झालं .. बाकी काय पाहिजे आपल्याला . " असे म्हणत शालिनी च्या आई ने बाळी ला हातात घेतले .. ( गावात मुलगा असला तर बाळ अन मुलगी झाली कि तिचे नाव ठेवे पर्यंत बाळी म्हयायचे )

बाळी नुसती वळवळ वळवळ करत होती .. उघडी ठेवली तर सारखी तिची वळवळ चालू असायची.. खूपच ऍक्टिव्ह बेबी होते .

शालिनी ची आई म्हणाली चला आता आपण मस्त बाळाची पाचवी करू

बाळाच्या पाचवीचा बाळाला पाट्यावर उघडे ठेवतात आणि जवळच एक कोरा कागद ठेवतात .. सटवाई त्या बाळाचे विधिलिखित त्या कोऱ्या कागदावर लिहून जाते त्या रात्री .. बाळाला दीर्घ आयुष्य लोभो अशी  प्रार्थना या दिवशी केले जाते .. खरंतर हा विधी एकदम साधा आणि घरगुती असतो पाच बायकांना बाळाच्या आईची ओटी भरायला बोलावतत् आणि हि पूजा करून घेतात आणि मग आलेल्या बायकांना घुगऱ्या वाटतात ..

घुगऱ्या म्हणजे भिजवलेले हरभरे वाटतात .. हि पूर्वी पासूनची पद्धत .. त्याच वरून जर कोणी जास्त शहाणपणा करत असेल तर पूर्वी मोठी माणसे म्हणायचे अरे तू काय मला शिकवतोस तुझ्या घुगऱ्या खायला मी होती /होतो .. म्हणजे एवढी मी वयाने मोठी /मोठा आहे तुझ्यापेक्षा .. असो सांगायचं मुद्दा असा कि मंगेश च्या मुलीची पाचवी गावात इतकी दणक्यात झाली कि अख्खा गाव जमलेला . आणि सर्व जण बाळाचे कौतुक करत होते कारण पाचव्या दिवशी बाळ पालथं पडायला बघत होते .. शिवाय जेव्हा पोटात होते तेव्हा शालिनीचा केवढा मोठा एक्सीडेंट झाला होता .. त्यात सुद्धा ते जगलं आणि आई ला जगवले .. शिवाय जन्म घरात झाला .. या आधीची सर्व बाळंतपण शहरात हॉस्पिटल मध्ये झालेली ..

 बोल बोलता मंगेश चार मुलाचा बाबा झालं होता . आता जवाबदारी अजून वाढली होती .

शालिनी,मंगेश आणि मंगेश ची आई पण या वेळी खूप आनंदात होती .. शालिनीचा एक्सीडेंट झाल्या पासून सगळ्यांनीच खूप वाईट दिवस भोगले होते . त्या नंतर आनंद असा नाहीच .. बाळाच्या आगमनाने मागचे सर्व दुःख सध्यातरी सगळेच विसरले. पुन्हा जीवन जगण्याचा नवीन आशा पल्लवीत झाल्या . इसिको लाईफ बोलते है भाई

" एक धागा सुखाचा अन शंभर धागे दुःखाचे ."या सगळ्याची वीण विणत आयुष्य जगायचे असते .

आता पुढे काय  मंगेश ला तर ऑफिस ला जायला पाहिजे .. बाळ अजून लहान आहे मग शालिनीला घेऊन जाता येई ना .. मंगेश ची आई म्हणाली' मी आता लगेच नाही येणार ,, मला आता थोडे दिवस राहू दे .. शेवटी मंगेश म्हणाला तुम्ही आता अजून थोडे दिवस इकडेच राहा .. तोपर्यंत शालिनी पण जरा बरी होईल आणि मग मी पुढच्या महिन्यात तुम्हला सर्वांना  घ्यायला येतो . शेजारच्या एका  मुलाचे  चे लग्न आहे पुढच्या महिन्यात आणि त्याने तुम्हाला सगळ्यांना बोलावलेय .. त्याची आई खूप मागे लागली होती .. पुढे मंगेश लगेच ऑफिसला ला गेला .

साधारण एक महिन्यांनी सर्वांना घ्यायला आ ला.. मंगेश च्या आई चा पुन्हा घरातून पाय निघेना .. पण मंगेश ने शेजारच्या घरचे  लग्नाचे निमित्त घेऊन आई ला बरोबर घेतलेच .. शालिनी पण आता बरेच दिवस गावी राहिली होती . आई वडिलांच्या बरोबर ह्यावेळी  तिला बराच वेळ रहायला मिळाले होते त्यामुळे ती पण खुश होती.. तिला हि मनापासून शहरात जायचे होते .. आई बाबांना भेटून सर्व जण एस टी ने  एक महिन्याचं बाळ आणि  माधव , राघव  आणि  एक वर्षांची आदिती शहरात निघाले . आदिती ला जणू आजीनेच  सांभाळले होते . तिचे खाणे पिणे , सर्वच मंगेश च्या आईने केले होते . आदिती पाच सहा  महिन्याची असेल तर शालिनीचा एक्सीडेंट झाला होता त्यामुळे तेव्हा पासून तिची आई सुटलीच .. आता प्रवासात सुद्धा आदिती आजीच्याच कडेवर होती . एक महिना झाला तरी बाळी चे बारसे झाले नव्हते .. तिला आपले सगळे " बाळी" असेच हाक  मारत . मंगेश ने एस टी घाटात आल्यावर एका महिन्याच्या बाळीला त्याच्या हातात घेतले .. कारण गाडी वळणातून जोरात उडायची .. त्यावेळचा ड्राइवर पण एस टी  खूपच जोरात चालवत होता .. वळण आले कि कचकन ब्रेक दाबायचा.. आणि मग गाडी एक तर उडायची आणि प्रवासी पण उडायचे . माधव आणि राघव दोघांची चांगलीच  मज्जा झाली . गाडी उडाली कि त्यांना फार मज्जा  वाटायची .. आदिती आजीच्या कडेवर झोपून गेली होती आणि शालीनि ला पण डोळा लागला होता . तेवढ्यात गाडी इतक्या जोरात उडाली कि मंगेश च्या हातातून बाळी खाली पडली .. मंगेश ने पटकन उचलली पण खाली ३ फूट खाली पडल्याने जी बाळी रडायला लागली .. हो मग तिला लागलेच असणार . रक्त वगैरे नव्हते आले पण  बाळाला मुका मार लागला  . शालिनी तर घाबरूनच गेली.. खरंतर मंगेश पण जरा घाबरला .. त्याला काही पण कळायच्या आत कसेकाय पण बाळ हातातून सटकले .

 पण सर्व जण म्हणायला लागले.. रडतेय ना बाळ मग ठीक आहे म्हणजे नॉर्मल आहे .. रडले नसते तर प्रॉब्लेम होता .. हे असे जुने लोक न्यूरॉलॉजिस्ट असायचे .

इकडे शहरात येईन मंगेश चे रुटीन सुरु झाले .. पण बाळाचे नाव काही अजून ठेवले नव्हते .. जो कोणी बघायला येईल तो पाहिलं विचारायचा बाळाचे नाव काय आहे ? " नाही अजून ठेवले नाही .. आता ठेवू असे बोलून बोलून शालिनी कंटाळली . मंगेश काही बारसे करायचे मनावर घेई ना ..

आता नको काही प्रोग्रॅम .. जरा रुटीन व्यवस्थित सुरु आहे तर राहू दे .. असे म्हणून टाळायचा. शेवटी शालिनी ने घरातल्या घरात तिचे नाव ठरवून त्याच नावाने  हाक मारायचे असे ठरवले . शेजारीच एक भार्गव भटजी रहायचे. ते बघायला आले म्हणाले "हे बाळ भाग्यवान आहे आई ला पण वाचवलें आणि स्वतःचा जीव पण वाचवला .. कोणीतरी तृप्त  आत्मा असावा "  शालिनीला हे त्यांचे वाक्य लक्षात राहिले आणि  यावरूनच शालिनी ने ." तृप्ती " हे नाव ठेवले .. आणि घरातील सर्वांना सांगितले कि आज पासून बाळाला बाळी म्हणायचे नाही .. बाळाचे नाव तृप्ती आहे तर त्याच नावाने तिला हाक मारायचे . अशा पद्धतीने तृप्ती चे नाव बारसे  न होताच ठेवले.

🎭 Series Post

View all