संघर्ष एक कथा - भाग १२

In this part mangesh take shalini to tha hospital and he get to know that shalini is pregnent

संघर्ष एक कथा - भाग १२

क्रमश : भाग ११

मंगेश ने शालिनी ला सरकारी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले . हॊस्पिटल मध्ये ऍडमिट तर करून घेतले . पण सरकारी हॉस्पिटल मधले डॉक्टर पेशंट ला बघून जरा घाबरले . शालिनी जवळ जवळ ६० % भाजली होती . शालिनी ची साडी आणि घोंगडी  तिच्या भाजलेल्या अंगावर  रुतून बसली होती . ती सोडवणे म्हणजे डॉक्टरांसाठी तर महाकठीण काम होतेच पण शालीनि ला प्रचंड वेदना होणार होत्या .

डॉक्टरांनी सांगून टाकले कि पेशंट ६0 % भाजल्या आहेत. आम्ही वाचण्याचा प्रयत्न करू पण गॅरेंटी नाही देऊ शकत.

शिवाय इथल्या डोक्टरांकडून हे होणे जरा कठीण आहे तर प्रायव्हेट दवाखान्यात तुम्ही जाऊ शकता .

 मंगेश ने अधिकाऱ्यांना सांगितले अहो मला प्रायव्हेट डॉक्टरांचा खर्च परवडणार नाही . तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढा .

शेवटी बरीच वेळ डिसकस झाल्यावर तिथले अधिकारी म्हटले आम्ही ऍडमिट करून घेतो पण वेळ आली तर स्पेशल डॉक्टरांना बोलवावे लागेल . त्याचा खर्च तुम्हाला उचलावा लागेल . आणि बर्न केस म्हणजे कमीत कमी एक महिना तरी हॉस्पिटल मधेच पेशंट राहावे लागेल तर याची तयारी करा . शिवाय इतके सगळे केल्यावरही पेशंटने औषधांना रेस्पॉन्ड नाही केले तर त्यांच्या जीवाची हमी आम्ही देऊ शकत नाही . प्रयत्न करणे आपल्या हातात बाकी काही नाही .

डॉक्टर म्हणतील ते सगळ्याला हो म्हणण्या शिवाय पेशंट बरोबर असलेल्या माणसाला दुसरा काही पर्याय असतो का ?

शालिनी ला  डॉक्टरांनी आत घेतल्यावर त्याला बाहेर बसायला सांगितले . जसा मंगेश बाहेर बसला तस त्याला रडू आवरेना . ओक्शाबोक्शी रडूच फुटले . शालिनीला ला हे काय झाले ? असे का झाले ? शालिनी वाचेल ना ? शालिनी च काही बरं वाईट झाले तर माझ्या तीन मुलांचे काय ? कसे होईल ? तो कसा जगणार होता शालिनी शिवाय ..या विचारांनी त्याच्या मनात थैमान घातले होते . पैसा कुठून आणायचा ? पैसे कमी नाही पडला पाहिजे पण तो उभा कसा करू ? ऑफिस मधून आता मिळूच शकणार नव्हते . मित्रांकडून किती घेणार ? असे अनेक असंख्य प्रश्न पडले होते .. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले .

मंगेश ला म्हणले " एवढी मोठी गोष्ट तुम्ही का लपवून ठेवली ? उद्या काही कमी जास्त झाले असते तर कोण जवाबदार होते ?

मंगेश ला कळे  ना डॉक्टर कशा बद्दल बोलत आहेत ते .

मंगेश " कशा बद्दल बोलत आहात मला कळत  नाहीये . जे माहित होते ते सर्व तुम्हाला सांगितले

डॉक्टर जरा वैतागलाच होता " अहो तुमची बायको २ महिन्यांची गरोदर आहे "

मंगेश " काय ? मला खरंच माहित नाही हो ? मग आता  ?

डॉक्टर " मग काय आता ट्रीटमेंट बदलावी लागणार . आतल्या बाळाला काही इजा होणार नाही अशी ट्रीटमेंट द्यावी लागणार . मला पण माझ्या सरांबरोबर डिस्कस करावे लागेल .

एका मागून एक मंगेश ला धक्के बसत होते . एवढी मोठी गोष्ट शालिनी ने माझ्या पासून लपवून का बरं ठेवली असेल . काय तिच्या मनात चालले होते ? काय माहित ? म्हणून तिला चकरा येत होत्या तर .

इथे शालिनीचं वाचते कि नाही याची खात्री डॉक्टर देत नाहीयेत तर बाळा च काय ?

मंगेश डॉक्टरांना " डॉक्टर मला हे खरचं  माहित नव्हते . पण मी सांगतो .. आधीच माझी तीन लेकरं घरी आहेत . माझ्या बायकोला  काहि क रून वाचवा .. "

डॉक्टर " मोट्या डॉक्टरांना बोलावलंय .. इमर्जन्सी केस म्हणून आत  तेच काय ते डिसिजन घेतील .

तेवढ्यात बर्न चे स्पेशल डॉक्टर आले .. उंच गोरे गोरे पान , तोंडात पेटती सिगरेट असलेले डॉक्टर आले . त्यांना बघून मगाशी जे साहेब होऊन बसले होते ते सॅल्यूट मारत होते . मंगेश ला लक्षात आले कि हेच ते डॉक्टर जे आपल्या बायकोला वाचवू शकतात . त्यांच्या मागे मागे इथले डॉक्टर पेशंट चे हिस्टरी आणि आत्ताची हालत यावर त्यांच्यात डॉक्टरी भाषेत बोलत होते . त्यांनी आतापर्यंत कोणती ट्रीटमेंट दिलीय हे हि सांगत होते . मग स्पेशल डॉक्टर आणि बाकीचे डॉक्टर त्यांच्या मागे मागे आत मध्ये गेले . मंगेश पण त्यांच्या मागे मागे दारापर्यंत गेला . तेव्हा नर्स ने सांगितले तुम्ही इथेच थांबा .

अर्ध्या एक तासांनी डॉक्टर बाहेर आले .. आणि केबिन मध्ये गेले . मंगेश ला पण बोलावणे धाडले .

डॉक्टर " मी आता पेशंट ला क्लीन  केलंय .भाजलेली कातडी आणि त्यांची साडी आणि घोंगडी एकमेकात खूप अडकले होते . खूप क्रिटिकल होते . त्यान्ना आता इंजेकशन दिली त्यामुळे त्या झोपल्यता पण उठल्या नंतर परिस्थिती फार बिकट असणार आहे . त्यांना खूप वेदना होणार आहेत . तरी बरे पेशंट च्या नाजूक बॉडी पार्टस पर्यंत आग पोहचली नाही त्यामुळे त्यांचा जिव तर नक्कीच वाचेल . तरीही मी गॅरेंटी देत नाही पण वाचण्याचे चान्सेस जास्त आहेत .

दुसरे तुमचे बाळ जे पेशंट च्या पोटात आहे ते आम्ही वाचवण्याचा प्रयन्त करतोय . पण तरीही अशा अवस्थेत हे जरा कठीण काम आहे .

बाकी तुमची सर्व केस मी ऐकली आहे तर मी तुच्याकडून माझी स्पेशल फी आकारणार नाही . फक्त औषध आणि गोळ्या तुम्ही बघून घ्या . आणि बोलबोलता डॉक्टरांनी भली मोठी औषधांची यादी लिहुन दिली . त्यातली आता च्या आत्ता कोणती आणायची आणि उद्या कोणताही आणायची हे पण सांगितले . आणि  डॉक्टर निघून पण गेले .

शालिनी ला काचेतून आत डोकावून पाहून ती झोप ली य हे बघितल्यावर तिथल्या नर्स ला सांगून मंगेश मुलांना शाळेतून आणायला गेला . तिकडेच त्यांच्या शाळेत कळवूं टाकले कि सध्या मुले शाळेत येणार नाहीत .

मुलांना घरी घेऊन गेला . बाहेरच्या खोलीत आदिती झोपली होती . आईने  आत मध्ये किचन साफ करून घेतले . आणि जेवणाच्या तयारी ला लागली . मुले शाळेतून आल्यावर जेवायला बघतील म्हणून . आई ला स्टोव्ह पेटवायची भीती पेक्षा इच्छाच होत नव्हती म्हणून तिने सरळ घरात एका कोपऱ्यात चूल पेटवली . चुलीवर जेवण करण्यात अख्खा आयुष्य गेले होते तिचे त्यामुळे तिला तरी ते बरोबर वाटले . मऊ भात झाला होताआणि आता वरणाचे पातेले तिने ठेवले होते .

मंगेश घरी आल्यावर आई शी काय बोलावे हेच त्याला कळेना . दोघे हि शांत .

माधव आणि राघव दोघेही त्याला विचारत होते .. " बाबा .. आई कुठाय ? "

मंगेश त्यांना काय सांगणार होता ?

अदिती तर अंगावर दूध पि त होती . ती उठल्यावर चांगलाच गोंधळ उडणार होता .

मंगेश मुलाना " आई ना जरा दवाखान्यात गेलीय .. तुम्ही दोघे खेळा  बाहेर "

मंगेश ची आई " काय रे कशी आहे शालिनी ? काय म्हंत्यात डॉक्टर ?

मंगेश " खूप वाईट परिस्थिती आहे .. शालिनी गरोदर आहे हे  माहित होते का ?

मंगेश ची आई " नाय बा .. मला काहीच नाही बोलली .. पण पर्वा त्या सविता बरोबर दवाखान्यात गेली होती . तेव्हा पासून जरा वेगळ्याच विचारात होती . रागारागाने सगळ्या गोधड्या धुवून काढल्यान ... अक्खा अख्खा पपई एकटीनेच खायची . म्हणजे तिला माहिती झाले असावे . पण मला काही बोलली नाही .

एका दिवसात होत्यायचे नव्हते झाले होते . त्यांचे जे रुटीन सेट झाले होते ते सगळे विस्कटलं होते . आणि आता शालीनि परत आली तरच ते सुरळीत होणार होते .

मंगेश ने चटणी भात खाल्ला आणि ऑफिस ला जायला निघाला .

मंगेश " आई पोरं आणि तू पण जेवून घे . मी आदित साठी दुधाची पावडर घेऊन  येतो .

मंगेश ची आई " नको आणू पावडर . मी बघते तिच्या खाण्याचे .. "

मंगेश " ठीक आहे "

मंगेश तसाच लगेच ऑफिस ला गेला. ऑफिस मध्ये एक रजेंचा अर्ज लिहून दिला .. शिवाय काही मार्गाने पैसे मिळतील का ते बघू लागला . मोठा ऍक्सीडेन्ट झालाय म्हटल्यावर बऱ्याच मित्रांनी उधार पैसे दिले तसेच त्याने पण पी एफ काढायचा अर्ज दिला आणि साहेबांना सांगून लवकर प्रोसेस करायला सांगितलं .

मित्रांकडून घेतलेल्या पैशांनी औषध घेऊन आला . .. शालिनी जवळ तर जाताच येत नव्हते . फक्त लांबून काचेतून बघायचे तिचा चेहरा दिसला तर दिसायचा . तरीही मंगेश पाच पाच मिनिटांनी काचेतून बघत असे ..

🎭 Series Post

View all