Oct 27, 2020
स्पर्धा

संघर्ष अस्तित्वाचा ७

Read Later
संघर्ष अस्तित्वाचा ७

संघर्ष अस्तित्वाचा ७ @ प्रेरणादायी कथा

( मागच्या भागात आपण पाहिलं की कावेरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कावेरी आणि माधुरी दोघीही 'जिव्हाळा' मध्ये जातात. आपला आनंद तिथे त्यांच्या सोबत साजरा करतात. त्याचं रात्री माधुरीला call येतो आणि त्या दोघी तेवढ्या रात्री जातात. एक दोन दिवसांची मुलगी कोणी तरी कचरापेटीत टाकली होती. त्या दोघी त्या बाळाला घेऊन हॉस्पिटल मध्ये जातात. सकाळी अनाथ आश्रमातील काही लोक येतात आणि डॉक्टर बाहेर येऊन बाळ सुखरूप असल्याचं सांगतात. घरी आल्यावर कावेरी बाळाबद्दल विचारते. तेव्हा कोणीतरी तिला कचरापेटीत टाकलं आणि कुत्रांनी तिला ओरबाडले. मेंदूला जखम झाल्या होत्या. यावर कावेरी कसं जमत असं करायला या लोकांना, कोणी विरोध का करत नाही असं म्हणते. यावर तू ही तेच केलंयस आधी स्वतःवर होणाऱ्या अन्याया वर आवाज उचला नाहीस. कारण तुझ्यावर अन्याय होतोय हेच कळत नव्हतं. आता तरी स्वतःची दिशा ठरव असं म्हणते. आता पुढे....... )

कावेरीला माधुरीच्या बोलायचा अर्थ कळला होता. खरंच आपल्यावर अन्याय होतोय मुळात हेच कळत नव्हतं मला. बाहेरच जग वेगळं असतं ते आपल्याला मोकळा श्वास घ्यायला शिकवतं. नवीन मिळालेल्या आयुष्याचं योग्य उपयोग करायचा असं ती ठरवते. माधुरी एक भक्कम आधार होती कावेरीचा. आता पुढे काय करायचं, याची योजना कशी करायची याचा विचार ती करत होती. 

कावेरी आता हळू हळू समाजसेवेशी जोडली जात होती. माधुरी सोबत अनेक काम जे लहान अनाथ मुलांसाठी, वृद्ध लोकांसाठी करत होती. जीवनाला आता एक आकार मिळतोय, एक अर्थ मिळतोय असं कावेरीला वाटू लागलं होतं. कावेरीची आता या क्षेत्रात एक ओळख निर्माण होऊ लागली होती. एक छान बंध निर्माण होऊ लागलं होतं. या सगळ्यातही कावेरी वेळात वेळ काढून त्या बाळाला भेटायला जात होती. कावेरीने त्या बाळाचं नाव " शौर्या " असं ठेवलं. "शौर्या " कारण जन्मताच ती एक जन्म - मरणाचं युद्ध लढली होती. शिवाय अनाथ आश्रमात आई - वडिलांच्या प्रेमाशिवाय  जगणं हा एक संघर्षच होता. आणि त्यासाठी अंगी शौर्य असावं लागतं. म्हणून "शौर्या. "

कावेरीचा दुसऱ्या वर्षाचा निकाल लागला आणि यावेळी ही कावेरी 80 % मार्क्स ने पास झाली होती. जसं जसं कावेरी एक एक पाऊल पुढे जात होती तसं तसं तिचा आत्मविश्वास वाढत होता. माधुरी निकाल ऐकून खूप खुश होते. आणि म्हणते, " कावेरी आज माझ्याकडून तूला एक खास भेट. " हे ऐकून कावेरीला आनंद होतो पण खास भेट लगेच ?  कावेरी माधुरीला विचारते सुद्धा. त्यावर, " अगं कावेरी तुझीसाठीची खास भेट आता लगेच नाही तर गेल्या वर्षभरापासून तयार करत होते मी. " 
कावेरी, " वर्षभरापासून ?  " ( असमंजसपणे )
माधुरी आत तिच्या painting room मध्ये जाते आणि आतमधून एक painting घेऊन येते. ते painting पाहून कावेरी हरखून जाते. त्या painting मध्ये एक क्षण होता. मागच्या वर्षी 'जिव्हाळा' मध्ये वाढदिवस साजरा करतानाचा क्षण. खळखळून कावेरी हसतानाचा क्षण. कावेरीला ते पाहून खूप आनंद होतो. 
माधुरी ते चित्र कावेरीला देते आणि म्हणते, " कावेरी हे तूझं चित्र का काढलं माहित आहे? " 
कावेरी असमंजसपणे नकारार्थी मान हलवते. 
माधुरी, " कावेरी हे चित्र आता भिंतीवर लावायचं आणि नेहमी बघायचं, एखादा क्षण येतो जेव्हा त्रास होतो. सगळं संपलं असं वाटतं तेव्हा हे चित्र बघायचं आणि आठवायचं, जन्मापासून ते लग्न, बाळ, बाळाचं जाणं, तुझ्यावर तुझ्याच घरच्यांनी हल्ला करणं, त्यातूनही तूझं बाहेर येणं आणि त्यानंतर हा आनंद देणारा क्षण. म्हणजे वाईटा मागे चांगलं येतं हे नेहमी लक्षात राहावं म्हणून. उमेद बांधून राहिली की वाईट काळ पार पडण्याचं बळ येतं म्हणून हे चित्र. " 
माधुरीचं बोलणं ऐकून कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं. आपलं कोणीही नाही वाटतं होतं पण जिवाभावाची मैत्रीण, बहीण, सखी मिळाली. असं कुठेतरी कावेरीला वाटतं. 
माधुरी पुढे म्हणते, " कावेरी आता तूला पुढे नक्की काय करायचं आहे ?  काही ठरवलं आहेस का?  " 
यावर कावेरी, " माधुरी अजून चित्र स्पष्ट नाहीये पण मला माझ्यासारख्या ज्या मुली अश्या अन्यायाला बळी पडतात त्यांच्यासाठी, शौर्या सारख्या लहान मुलींसाठी त्यांच्या आणि पर्यायाने मला माझ्या अस्तित्वासाठी काहीतरी करायचं आहे. " असं म्हणते. 
माधुरी, " मी एक सुचवू का ?  तू UPSC परीक्षा दे,  जर तू ती परीक्षा पास झालीस तर तुझ्याकडे पॉवर येईल ज्यामुळे तू ही कामे योग्य पद्धतीने करू शकशील. "
कावेरी, " पण माझं शेवटचं वर्ष अजून बाकी आहे. " 
माधुरी, " हो मला माहित आहे. पण तू शक्यतो दोन्ही परीक्षांची तयारी कर म्हणजे UPSC पहिल्या प्रयत्नात पास होणं कठीण आहे, पण तूला एका परिक्षाचा अनुभव मिळेल. आणि तूला दुसऱ्यांदा परीक्षा देणं सोपं जाईल. आणि हवं तर तू  job सोड. किंवा फक्त एक time जा. तूला जमेल तसं. "

कावेरीला माधुरीचं बोलणं पटत. आणि कावेरी क्लिनिक मध्ये डॉक्टरांना request करून फक्त सकाळी एक वेळ चा job fix करते. कावेरी अभ्यासात स्वतःला झोकून देते. दिवस -रात्र अभ्यास करत होती. माधुरीला हे सर्व पाहून खूप बरं वाटतं होतं. माधुरीला अधूनमधून तिच्या चित्रांच्या प्रदर्शनासाठी बाहेर जावं लागत होतं. पण ती कुठेही गेली तरी तिथून कावेरीची वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं आणत होती. मेहनत आणि चिकाटी कावेरीकडे पुरेपूर होती. 

कावेरी तिचं शेवटचं वर्ष सुद्धा चांगल्या गुणांनी पास होते. पण UPSC  मध्ये main exam मध्ये २ मार्क्सने ती नापास  होते. यावर माधुरी तिला म्हणते, " लोक ७-७,  ८-८ वेळा सुद्धा परीक्षा देतात. शिवाय तू पहिल्या प्रयत्नात मुख्य परीक्षा पास होण्याच्या आसपास होतीच. आता दुप्पट प्रयन्त कर. काहीही झालं तरी जिद्द सोडू नकोस. " कावेरी पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागते. सोबतच तिचं समाजसेवा, आणि वेगवेगळ्या, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, महिला आश्रम सर्व गोष्टी सुरूच होत्या. 

एकदा एका नवीन महिला आश्रमाशी कावेरीचा आणि माधुरीचा संबंध आला. तिथल्या महिलांना कलाकुसर, विणकाम, भरतकाम, लघुउद्योग ते computer पर्यंत सर्व शिकवलं जात होतं. जेणेकरून त्या बाहेर पडून या जगात वावरतील तेव्हा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहाता येईल. कावेरीला हे आवडत. महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आश्रम मधील लोक धडपड करतात पाहून कावेरी आणि माधुरीला बरं वाटत. कावेरी आणि माधुरी आश्रम बघत असताना कावेरीला एक मुलगी दिसते. जी विणकाम करत होती. ती खरंच फार सुंदर विणकाम करत होती. तिचं ते काम कावेरीला फार आवडत. आणि ती ठरवते. माधुरीच्या वाढदिवसाला तिला विणकाम असलेला जॅकेट द्यायचा. आणि त्यासाठी माधुरी नसताना परत यायचं. 


क्रमश.... 

 

संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347


संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-2_3384


संघर्ष अस्तित्वाचा ३ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-3_3407


संघर्ष अस्तित्वाचा ४ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-4_3437

 

संघर्ष अस्तित्वाचा ५ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-5_3470


संघर्ष अस्तित्वाचा ६ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-6_3500