संघर्ष अस्तित्वाचा ६

-------

संघर्ष अस्तित्वाचा ६ @ प्रेरणादायी कथा

( मागच्या भागात आपण पाहिलं की माधुरी कावेरीला Computer चे Classes लावते. आणि नंतर एका क्लिनिक मध्ये जॉब ही. शिवाय आता कावेरी Distance ने पुढचं शिक्षणही घेत होती. एक प्रकारचा आत्मविश्वास आता कावेरीमध्ये दिसू लागला होता. त्यात एक दिवस माधुरी कावेरीला एका अनाथ आश्रम + वृद्धाश्रमात घेऊन जाते. तिथली मुले पाहून कावेरीला आपलं दुःख छोटं वाटू लागतं. आणि आता कावेरी मनोमन यांच्यासाठी काहीतरी करायचं असं ठरवते. इकडे माधुरी कावेरीत अजून बदल कसा घडेल यावर विचार करत असते. आता पुढे..... )

काही दिवसानंतर....... 

सकाळी माधुरी उठून पाहते तर आज कावेरी नेहमी पेक्षा जास्त आनंदी दिसत होती. यावर माधुरी तिला विचारते, " क्या बात हैं, आज पहिल्यांदा तूला एवढं आनंदी पाहतेय. काय स्पेशल आहे आज..?  " 
कावेरी, " माधुरी आज माझा वाढदिवस आहे आणि आजच माझा 1st year चा निकाल आला मला ८६% मार्क्स आहेत. " 
माधुरी, " अरे वाह.. ! ही तर खरंच आनंदाची गोष्ट आहे. आजचा दिवस सेलेब्रेट करायचाच. " 
कावेरी, " खरं तर या आधी कधीच माझा वाढदिवस साजरा केला नाही कुणी. ना माहेरी, ना सासरी. आणि ना मला कधी आनंद वाटला. उलट जन्म झाला म्हणून दुःखच वाटायचं. पण आताची गोष्ट वेगळी आहे. आता मला जीवन नक्की काय ते कळतंय. आणि हे सर्व फक्त तुझ्यामुळे माधुरी. खरंच खूप खूप धन्यवाद.... "
माधुरी, " ये सकाळी सकाळी प्रशंसेचे डोस नको देऊस. चल तुझा बर्थडे एन्जॉय करू. तू सांग काय काय करायचं. आजचा दिवस तुझ्यासाठी समज. "
कावेरी, " सर्वांत आधी तू तयार हो. आधी आपण मंदिरात जाणार अहोत आणि त्यानंतर " जिव्हाळा " मध्ये. तिथे आयुष्याच्या खूप गोष्टी शिकता येतात गं. "
माधुरी, " प्लॅन खूप छान आहे. मी लगेच तयार होते. " 

माधुरी आणि कावेरी दोघी आधी मंदिरात जातात आणि मग काही फराळ आणि cake घेऊन " जिव्हाळा " मध्ये जातात. त्या दोघीना बघून सर्व खूप खुश होतात. कावेरीचा वाढदिवस आज पहिल्यांदा आनंदात साजरा होतो. लहान मुलांसोबत कावेरी लहान होते आणि सगळे दुःखे विसरून खळखळून हसत असते. आणि तो क्षण माधुरी कावेरीच्या नकळत कॅमेरा मध्ये कैद करते. माधुरीला एक कावेरीला पाहून एक समाधान मिळत होतं. आधीची जीव द्यायला पुलावर उभी असलेली कावेरी आणि आता अनाथ मुलांसाठी काहीतरी करावंसं वाटणारी, त्यांच्या बरोबर खळखळून हसणारी कावेरी खूप मोठा फरक पहात होती माधुरी. समाधान वाटत असलं तरी कावेरी एवढ्यावर थांबायला नको असं माधुरीला मनोमन फार वाटत होतं. संध्याकाळी दोघी आनंदाने परत जातात. 

रात्री माधुरीचा फोन खणखणत होता. त्यामुळे माधुरी बरोबर कावेरीलाही जाग येते. फोन एका अनाथ आश्रमातून असतो. त्यासोबत माधुरी Connected असते. समोरून आवाज ऐकून माधुरी टेन्शन मध्ये येते. कावेरी माधुरीला विचारते नक्की काय झालंय. त्यावर माधुरी फक्त मला आता लगेच निघावं लागेल असं म्हणते. कावेरी म्हणते, " मी पण येते. " माधुरी नको म्हणतं असताना ही कावेरी यायचं म्हणतं असते. शेवटी नाईलाजाने माधुरी कावेरीला घेऊन जाते. 

दीड - दोन तासाने दोघी तिथे पोहचतात. एवढ्या रात्री सुद्धा तिथे ४-५ जण असतात. त्यांच्या हातात एक लहान मुलगी असते. तिला पाहून कळत होतं ती फार फार तर दोन दिवसांची होती. तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असतात. मुख्य म्हणजे डोक्यावर जास्त, ते पाहून कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं तर माधुरीच्या डोळ्यात अंगार फुलत होतं. त्या बाळावर तिथल्या  डॉक्टर ने प्राथमिक उपचार केले होते. त्या लोकांना आपली ओळख माधुरीने दिली आणि त्याला माधुरीने कावेरीकडे देवून गाडीत जाऊन बसली. माधुरी गप्प गाडी चालवत होती तर कावेरी बाळाकडेच एकटक पहात होती. बाळाची तबियत बिघडत चालली होती तर माधुरी आणि कावेरी अजून टेन्शन मध्ये आल्या. 

काही वेळाने माधुरीची गाडी एका हॉस्पिटल समोर येऊन उभी राहते. गाडी आल्याबरोबर डॉक्टर आणि नर्स ची एक टीम लगेच समोर येते, जी आधीपासून त्या बाळासाठी उभे होते. ते लगेच बाळाला ताब्यात घेतात आणि बाळावर उपचार सुरु करतात. कावेरी आणि माधुरी बाहेर बसून बाळाच्या तबियतेची काय बातमी येते हे ऐकण्यासाठी दोघी दाराकडे नजर लावून बसल्या होत्या. कावेरी मनातल्या मनात देवाला नवस ही करते. कावेरीला एक अनामिक ओढ जाणवत असते त्या बाळाबद्दल कदाचित तिने आपलं बाळ आधी गमावल्यामुळे असेल पण ओढ होती हे नक्की. 

सकाळी ७-८ च्या सुमारास अनाथ आश्रमातील काही लोक तिथे येतात. आणि तेवढ्यात डॉक्टर ही तिथे येतात. आणि बाळ आता ठीक आहे. फक्त काही दिवस डॉक्टर्स च्या ऑबसेर्व्हशन मध्ये ठेवावं लागेल असं सांगतात. आश्रम मधील लोक माधुरीचे आभार मानतात. वेळेवर एवढ्या रात्रीही मदतीला धावून आल्याबद्दल त्यांचे आभार मानतात. त्यांच्या मुळे आज एका लहान बाळाचे प्राण वाचले होते. नंतर येऊन आम्ही बाळाला पाहू म्हणून दोघी घरी जातात. 

कावेरीच्या मनात अनेक प्रश्न असतात ज्याची उत्तरे फक्त माधुरीकडे असतात. घरी येऊन फ्रेश झाल्यावर कावेरी माधुरीला झालेला प्रकार नक्की काय होता ते विचारते. त्यावर माधुरी, " कावेरी तू पाहिलं अशीलच की मुलगी फार फार तर २ दिवसांची होती. कोणाला तरी नकोशी होती. कदाचित तिच्या आई - बापालाच नकोशी होती. त्यामुळे रात्री उशिरा तिला कचऱ्याच्या पेटीत टाकलं. मासाचा गोळा कुत्रांना फार आवडतो. आणि दोन दिवसांची ती मुलगी त्यांच्यासाठी फक्त एक मासाचा गोळाच होती. त्या कुत्रांनी त्याला चावायला सुरुवात केली, ओरबाडायला सुरुवात केली. तसा तो कोवळा जीव जोरजोरात टाहो फोडू लागला. आजूबाजूला राहणाऱ्यांच्या ते लक्षात आलं त्यांनी तिला तिथून उचलून डॉक्टरकडे नेलं, पण कुत्रांचे दात तिच्या डोक्यात, मेंदूला ही लागले होते. ( हे सांगताना मात्र खंबीर माधुरीच्या डोळ्यातही पाणी आलं. )त्यामुळे तिला स्पेशल ट्रीटमेंटची गरज होती. त्या भागात स्पेसिलिस्ट डॉक्टर नव्हते. आणि आपल्या भागात असणारे डॉक्टर already ऑपरेशन मध्ये होते. त्यामुळे तिथून त्या बाळाला वेळेत इथे आणायला म्हणून मला call केला होता त्यांनी. त्यावेळी तिथे त्यांच्या आश्रमातील लोकं तिथे नव्हती म्हणून मला जाण्यासाठी त्यांनी मला request केली. 

कावेरी म्हणते, " माधुरी हे सगळं खूप भयंक आहे. ते एवढंसं बाळ आणि कसं जमत गं यांना? कोणी विरोध कसं करत नाही. पेटून का उठत नाहीत ?  " 
माधुरी, " हे तू बोलतेस, तू विसरली अशील तर आठवण करून देते, तुझ्या बाळाचाही जीव घेतलाय कोणीतरी, तुलाही कोणीतरी मारायचा प्रयन्त केला होता. तेव्हा तू पेटून का नाही उठलीस ?  "
कावेरी हैराण होऊन माधुरीकडे पहात होती. तिला काय बोलाव ते कळत नव्हतं.
माधुरी म्हणते, " असं नको पाहूस कावेरी मीच सांगते तूला.  जन्मापासून मनावर आपण ओझं अहोत, आपली किंमत नाही, नवरा देव असतो असं बिंबवलं जातं. मुली पायावर उभ्या राहू नये म्हणून शिक्षण नीट होऊ देत नाही. म्हणून आपल्याला जगण्याचा अधिकार आहे हेच काही मुली विसरून जातात. तुझ्या बाबतीत ही असचं झालं आहे. त्यामुळे आता त्यातून बाहेर पडल्यावर तूला कळतंय की तुझ्यावर अन्याय झालाय. असो, आता तूला कळलंय म्हणजे तूला पुढे काय करायचं याची दिशा कळेल. 

क्रमश....... 


संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347


संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-2_3384


संघर्ष अस्तित्वाचा ३ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-3_3407


संघर्ष अस्तित्वाचा ४ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-4_3437

संघर्ष अस्तित्वाचा ५ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-5_3470

🎭 Series Post

View all