Login

संघर्ष अस्तित्वाचा ४

--------

संघर्ष अस्तित्वाचा ४ @ प्रेरणादायी कथा 


( सासूबाई आणि मोहनचं बोलणं ऐकल्यानंतर कावेरी विहिरीवर कोणी ना कोणी सोबत असतानाच जाऊ लागली. आणि बक्कळ हुंडा मिळणारं स्थळ हातातून जाऊ नये म्हणून  मोहन आणि त्याच्या घरचे कावेरीला मारण्याचा कट रचतात. पण येन वेळ आवाजामुळे कावेरीला जाग येते. कावेरीच्या हातावर कोयत्याचा वार होतो पण ती धक्का मारून पळून जाते. पोलीस तक्रार होऊ नये म्हणून ते रात्रीच सरपंचांच्या घरी जातात आणि कावेरी रात्री दागिने आणि पैसे घेवून पळून गेली असं सांगतात. इकडे कावेरी आपलं आता काहीच उरलं नाही म्हणून नदीच्या पुलावर उड्डी घेण्यासाठी उभी राहते........ आता पुढे.... )


दुःखाच्या सागरात बुडालेली कावेरी पुलावरून उड्डी मारणार तोच तिथून जाणाऱ्या माधुरी ला कावेरी दिसली. माधुरी च्या हा सर्व प्रकार लक्षात आला. आणि ती गाडीतून उतरून कावेरीकडे जाऊ लागली. आपल्याच तंद्रीत आणि दुःखात असलेल्या कावेरीच्या ते लक्षात आले नाही. माधुरीने कावेरीचा हात धरून जोरात मागे ओढलं.  कावेरी तिच्या हाताला झटके देवून उड्डी मारायला धावू लागली. माधुरीने ती सावरलं, आणि बाजूला घेऊन गेली. तिला पाणी दिलं. तिला विचारलं तूला कुठे जायचं आहे सांग मी सोडते. यावर आता पर्यंत डोळ्यात पाणी अडवून बसलेल्या कावेरीचा बांध फुटला. माझं या जगात कोणीच नाही, आणि मला असं जीवन जगायचं ही नाही असं म्हणू लागली. माधुरीच्या लक्षात आलं की हिच्या सोबत काहीतरी विपरित घडलं आहे. हिला असं सोडून जायला नको म्हणून माधुरीने कावेरीला  तिच्या सोबत चालण्यास सांगितले. माझ्या घरी चल मग पुढचं बघू. असं म्हणून माधुरी कावेरीला घरी घेवून आली.  


घरी आल्यावर माधुरीने कावेरीला फ्रेश व्हायला सांगितलं. कावेरी फ्रेश होईल पर्यंत माधुरीने कावेरी साठी चहा आणि नाश्ता बनवला. कावेरीला थोडं खाल्ल्यावर तरतरी आली.  कावेरीच्या हातावरची जखम पाहून तिला काय झालंय ?  हाताला जखम कसली ?  जीव द्यायला का जात होतीस ?  असे प्रश्न सुरु केले. पण कावेरीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. माधुरीच्या ही गोष्ट लक्षात आली. माधुरीच्या लक्षात आलं की कदाचित माझ्याजवळ बोलण्या इतकं धाडस आणि विश्वास तिच्यात आता नसेल त्यामुळे तिचा आपल्यावर थोडा विश्वास बसला की विचारू. 

माधुरी तिच्या एका नर्स असलेल्या friend ला फोन करून घरी बोलावते. तिला फोन वरच परिस्थिती सांगते. तिला हॉस्पिटल मध्ये नेल्यावर चौकशी होईल आणि कदाचित कावेरी अजून या सर्वाला तयार नाहीये. तिची friend आल्यावर कावेरीच्या जखमेची मलम पट्टी होते. माधुरी कावेरीशी मोकळ बोलण्याचा प्रयन्त करत असते. पण कावेरी अजून कुठेतरी धक्क्यातून पूर्णपणे सावरलेली नसते. 

माधुरी तिला सांगते. माझे आई - वडील दोघे IT professional आहेत. भाऊ डॉक्टर आहे. फक्त मी वेगळी आहे घरात मी painting करते. चित्र काढते. माझ्या चित्रा ची प्रदर्शन भरतात. शिवाय मी थोडी फार समाजसेवा ही करते. ते आहे ना काहीतरी एक बदकाचं पिल्लू वेगळं असतं. ते मीच आहे बर का...  आई - वडील पुण्याला तर भाऊ सध्या अमेरिकेत आहे. माझ्या या चित्रांचं प्रदर्शन नेहमी असतं म्हणून मी इथेच राहते. माधुरी सर्व एकदम सांगून टाकते. पण कावेरीचा चेहरा मलीन दिसत असतो. 

माधुरी कावेरीला आराम करायला सांगते. पण आता अजून किती वेळ तुमच्या घरी राहू ? जाते मी. तुम्ही मला एवढा आधार दिलात मी तुमची आभारी आहे असं कावेरी म्हणू लागली. माधुरी तिला विचारते, " तू इथे कोणाला ओळखते का ?  " त्यावर कावेरी नकारार्थी मान हलवते. त्यावर, " मग तू कुठे जाणार, ज्या अवस्थेत तू मला भेटलीस त्यावर नक्की काहीतरी भयंकर घडलं असावं तुझ्यासोबत. मग अजून बाहेरच जग किती भयंकर असेल कल्पना कर. अगं थांब जरा, स्वतःला सावर, पुढे नक्की काय करायचं ते ठरव, आणि योग्य वेळी जा तू. पण तो पर्यंत मी तूला जाऊ देऊ शकत नाही. आणि तसं ही मी एकटीच राहते एवढ्या मोठ्या घरात. तू बरोबर असलीस तर सोबतच होईल मला. " कावेरी कडे दुसरा मार्ग ही नसतो. खरं आहे माधुरीच कुठे जाणार मी  ?  

काही दिवस लागले कावेरीला यातून बाहेर पडायला पण माधुरीच्या मदतीने कावेरी सावरू लागली. एक दिवस माधुरीला कावेरीने तिच्या जीवनाची कर्म कहाणी सांगितली. कावेरीबद्दल सर्व ऐकून माधुरीला प्रचंड राग आला. ती म्हणाली आताच्या आता पोलीस स्टेशनला चल आणि पोलिसात तक्रार कर. मी येते बरोबर. कावेरी म्हणाली नको माधुरी, आता ते सर्व स्वप्नातही मला परत माझ्या आयुष्यात नको. तू फक्त मला मार्गदर्शन कर की मी काय करू जेणेकरून मला माझ्या पायावर उभं रहाता येईल. 

कावेरीचं बोलणं ऐकून माधुरी अजून चिडते. अगं तुझ्यावर खूप अन्याय झाला आहे. त्याला लढा द्यायचा सोडून असं काय बोलतेस. तू तुझ्या पायावर नक्की उभी रहा पण त्यांना का सोडतेस. यावर कावेरी म्हणते, " तुझं बरोबर आहे माधुरी पण सध्या खरंच माझ्यात एवढी ताकद नाहीये की कोणताही लढा देऊ शकेन. सध्या मला माझ्या आयुष्यात शांती हवीये. " माधुरी यावर गप्प बसते पण मनात ठरवते., "कावेरी तुझं व्यक्तिमत्व मी असं बदलून टाकेन की अन्याय शब्द ही तुझ्या कानावर पडला तरी तू पेटून उठशील. "

क्रमश..... 

संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347


संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-2_3384


संघर्ष अस्तित्वाचा ३ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-3_3407

🎭 Series Post

View all