Oct 27, 2020
स्पर्धा

संघर्ष अस्तित्वाचा २

Read Later
संघर्ष अस्तित्वाचा २

संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा 

( विहिरीवरून पाणी आणताना पाय घसरून कावेरी पडली आणि त्यातच तिचं बाळ गेलं. चूक सासूची असतानाही बाळ हे कावेरीमुळे गेलं आणि ती आपल्या आईवर आरोप लावते म्हणून मोहन सुमनला घराबाहेर काढतो. आता पुढे....... )

 कावेरीला घराबाहेर काढलं. कावेरी जिचं नुकतच बाळ गेलंय. जिचं शरीर त्या वेदनांनी खचलंय. जिच्या अंगी नीट उभं राहण्याचीही ताकद नाही. कावेरीवर जणू दुःखाचा डोंगर  कोसळला होता. बाळ गमावलं, नवऱ्याने घराबाहेर काढलं, ते ही कोणतीही चूक नसताना. आई - वडिलांकडे कशी जाणार...??  कारण लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी बापाने सांगितलं होतं, " काहीही झालं तरी परत मागे यायचं नाही. माझं कर्तव्य संपलं. आता सासर तुझं आणि तू तुझ्या सासरची. नाही जमलं तर विहीर जवळ कर पण परत येऊ नकोस. " वडिलांचे शब्द आठवून सगळंच संपलं असं आता कावेरीला वाटू लागलं. 

कावेरी ग्रामपंचायत मध्ये गेली आणि पंचाना विनंती करू लागली, " तुम्ही पंच म्हणजे परमेश्वर आहात. माझ्या बाबतीत ही न्याय करा. मला माझ्या सासरच्या घरून काढलं तर मी कुठे जाणार ?  माझी मदत करा. " 
पंचानी कावेरीचं बोलणं ऐकून घेतलं आणि मोहन आणि त्याच्या घरच्यांना खटल्यासाठी सभेत बोलावलं. 

खटला सुरु झाला पण कावेरीच्या घरचे आपली चूक मान्य करायला तयार नव्हते. कावेरीच कशी चुकीची आहे. तीच कशी घर तोडायला बघतेय ते सांगू लागले. पंचानी मध्यस्थी केली. पंच म्हणाले, " भलेही तुमचं मानलं, कावेरीचं चुकलं असेल पण तीच ही बाळ गेलंय आणि शिवाय प्रत्येक घरात छोट्या - मोठ्या गोष्टी होतात. प्रत्येक सुनेला घराबाहेर काढणार का..?  शिवाय अश्या छोट्या -मोठ्या वादाने जर मुलींना घराबाहेर काढायला सुरुवात केली तर कसं चालेल...? त्यामुळे आता सर्व विसरून नवी सुरुवात करा. " कावेरीला घरी परत घ्या म्हणून सांगू लागले. पंचांसमोर जास्त वाद घालून मोहन आणि त्याच्या घरच्यांना गावकीचे संबंध खराब करायचे नव्हते. त्यामुळे कावेरीला त्यांनी परत घरात घेतलं. 

 कावेरीचा घरातला जाच दुपट्टीने वाढला होता. सासूला आता नवीन सून हवी होती जी मुलगा पण देईल आणि हुंडाही. त्यामुळे छळाची तीव्रता आता दुप्पटीने वाढली होती. मोहनच्या आईने मोहनच्या मनात कावेरी विषयी वाईट भरायला सुरुवात केली. दुसरं लग्न केलं की त्याला हुंडाही ज्यामुळे त्याला दुसरा व्यवसाय ही सुरु करता येईल असं मनावर बिंबवायला सुरुवात केली. मोहनला आता दुसऱ्या लग्नाचे स्वप्न पडू लागले. 

कावेरी घरातले सर्व काम करत होती, राबत होती. घरातील कोणीही तिच्याही नीट वागत नव्हतं. शिळं जेवण मिळत होतं तरीही कावेरी तग धरून होती. पुढे पुढे कावेरीला शुक्कल कारणांवरून मारहाण होऊ लागली. उपाशी ठेवू लागले. कावेरी सर्व सहन करत होती. कारण तिच्यासाठी माहेरचे दार बंद होते. 

कावेरीला एवढा त्रास देऊनही कावेरी घर सोडत नाही हे पाहून सासरचे अजून चिढत होते. एकदा कावेरी पाणी घेवून मागच्या दाराने आली. आणि हांडे उतरवून आतल्या घरात येणार तोच तिच्या कानावर आवाज सासूबाई चा आवाज आला, " मोहन कावेरीला एवढा त्रास देतोय आपण, पण ती घर सोडत नाहीये. मी तुझ्यासाठी एक स्थळ बघितलं आहे. त्या मुलीचा बाप भरपूर हुंडा द्यायला तयार आहे. पण त्यांना लग्नाची घाई आहे. ही बाया घर सोडत नाहीये काय करायचं..? "  
मोहन - काय करायचं म्हणजे? ती जात नसेल तर तिला या जगातून घालवू. रोज कोणी ना कोणी आडात पडून मरत. हिची बहीण ही मेलीच ना. 

कावेरीला हे ऐकून धक्का बसतो. माणसांपेक्षा पैश्याची किंमत जास्त होती. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. 

कावेरी पुढे काय काय करणार ?  पाहूया पुढील भागात.... 

क्रमश..... 

संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347