Dec 03, 2020
स्पर्धा

संघर्ष अस्तित्वाचा १३

Read Later
संघर्ष अस्तित्वाचा १३

संघर्ष अस्तित्वाचा १३ @ प्रेरणादायी कथा

( मागच्या भागात आपण पाहिलं की कावेरी केशवच्या मदतीने त्याच्या काही डॉक्टर मित्रांसोबत व पोलीस आणि समाजसेवा करणाऱ्या काही व्यक्तींसोबत महिलांवर होणारे अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या इत्यादी विषयावर चर्चेसाठी बोलावते. ज्यात अनेक कारण आणि त्यावर उपाय या विषयी बोललं जातं. मीटिंग संपल्यावर कावेरी आणि केशव एकत्र घरी निघतात. सुंदर रात्र आणि शांत रस्ता आणि FM वरची रोमॅंटिक गाणी.... आता पुढे..... )

कावेरी आणि केशव घरी पोहचतात आणि पाहतात तर माधुरी घरी आलेली असते. माधुरीला पाहून कावेरी आणि केशव खूप खुश होतात. तिघेही आनंदाने जेवण करतात. रात्री निवांत बसलेले असताना विषय निघतो कावेरी आणि केशव तिला घडलेला सर्व वृत्तांत सांगतात. माधुरीलाही वाईट वाटलं. एवढ्या लहान बाळासोबत असं झालेलं ऐकून तिला रागही येतो. ते दोघे ते भविष्यात उचलणारे पाऊल ही सांगतात. माधुरीही त्यांना साथ देण्याचे वचन देते. 
कावेरी झोपायला जाते. माधुरी केशवच्या कानात विचारते, " कावेरीला मनातली गोष्ट सांगितलीस की नाही? "
केशव हसून होकारार्थी मान हलवतो. माधुरी खुश होऊन विचारते, " मग काय म्हणाली ती? " 
केशव, " अजून ती स्वतःच confuse आहे. त्यामुळे मी तूला वेळ दिलाय. ती स्वतः प्रेमाची कबुली देत नाही तोपर्यंत वाट पाहणार आहे मी." 
माधुरी, " तूझं ही बरोबर आहे दादा, तिला थोडा वेळ द्यावा लगेच, ती आधीच खूप मोठ्या दिव्यातून गेली आहे. त्यामुळे तूला accept करणं आणि पुढे जाणं थोडं अवघड जाणार तिला. थोडा वेळ घायला हवाच. तू बरोबर केलंस. "
केशव माधुरी थोडा वेळ गप्पा मारून आपापल्या रूम मध्ये जातात. 

दुसऱ्या दिवशी कावेरी आपल्या ठरवलेल्या कामाला वेग देते. पोलीस आपली माणसं संशय असलेल्या प्रत्येक हॉस्पिटल,  क्लिनिक मध्ये भरती करतात. कावेरी वरून परवानगी मिळून  प्रत्येक गावात प्रौढ शिक्षण वर्ग आणि महिला कौशल्य रोजगार योजना सुरु करण्याचे आदेश देते. शिवाय प्रत्येक गावागावात स्त्री अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या याविषयी माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केल्याचे पोस्टर लावले जातात. 
कावेरीने हातात घेतलेलं काम झपाट्याने वेग धरतं. काही महिन्यातच काही हॉस्पिटल आणि क्लिनिक जिथे गैर काम केलं जायचं तिथे कारवाई केली गेली. त्यामुळे बाकी हॉस्पिटल आणि क्लिनिक भीतीने का होईना ही कामे बंद करतात. 

दुसरीकडे गावात स्त्रिया आपल्या कौशल्यामुळे workshop मध्ये काम मिळवून २ पैसे कमावू लागल्या होत्या तर प्रौढ शिक्षण वर्ग मुळे व्यवहारही चोख करू लागल्या होत्या. एकंदरीत सुधारणा होऊ लागली होती. इकडे कावेरीला पोलिसांचा फोन येतो की ज्या माणसाने त्या बाळाला पुरण्याचा प्रयत्न केला होता त्याचा तपास लागला आहे. कावेरी त्यांना त्याला ताबततोब पकडायला सांगते. उद्या सकाळी मी पोलीस स्टेशनला येते तोपर्यंत त्याला अटक झाली पाहिजे असं सांगते. रात्री कावेरी घरी येते तेव्हा फक्त माधुरी घरी असते. कावेरीची नजर मात्र केशवला शोधत असते. तिला ही माहिती केशवाला सांगायची असते. माधुरी कावेरीच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता ओळखते आणि म्हणते, " दादाला emergency होती हॉस्पिटलमध्ये, म्हणून जावं लागलं. रात्री उशिरा किंवा सकाळपर्यंत येईल तो."  
कावेरी केशवचा चेहरा पाहण्यासाठी आतुर झाली होती पण आता सकाळपर्यंत वाट पाहावी लागणार होती. कावेरी माधुरीला सर्व सांगते. माधुरीलाही त्या माणसाचा तपास लागल्यामुळे खुश होते. कावेरीला झोप जशी सोडूनच गेली होती. तिच्या डोक्यात उद्याची पहाट होती फक्त. 

सकाळी केशव येतो. माधुरी त्याला फ्रेश व्हायला सांगते आणि तिघांच्या चहा आणि नास्ताची तयारी करते. नाश्ता करताना कावेरी केशवाला सर्व सांगते. तो माणूस पकडला गेलंय याने त्यालाही आनंद होतो. केशव कावेरीसोबत पोलीस स्टेशनला निघतो. रस्त्यात त्यांना एक मंदिर लागतं. दोघेही थांबून दर्शन घेतात. केशव देवाला सांगतो की कावेरीला आयुष्यात काही कमी पडू देऊ नकोस, तर कावेरीच्या मनात चालू असलेली घालमेल ती देवाजवळ मांडते. 

पोलीस स्टेशनला पोहचल्यावर कावेरीला पाहून सर्वजण उभे राहून सॅल्यूट करतात. कावेरीचा समाजामध्ये मान - सन्मान पाहून केशवला बरं वाटत. कावेरी त्या माणसाला आपल्या समोर हजर करायला सांगते. पोलीस त्याला समोर आणून उभं करतात. त्याला पाहून कावेरी स्तब्ध होते. तिला काय बोलावं कळत नसतं. कावेरीला असं पाहून केशव कावेरीला हलवतो. कावेरी भानावर येते. तर कावेरीला आपल्यासमोर मोठ्या अधिकाऱ्याच्या रूपात पाहून मोहनची बोलती बंद होते. 

भानावर आलेली कावेरी पोलिसांना विचारते, " याने गुन्हा कबूल केला का?  " त्यावर पोलीस, " अजून नाही मॅडम पण आमच्याकडे पुरावे आहेत. "
 त्यावर कावेरी म्हणते, " याच्याकडून सत्य कसं वदवून घ्यायचं ते तुम्ही बघा. पण मला सत्य हवं आहे. अजून एक याला सामिल प्रत्येकाला अटक झाली पाहिजे. कोर्टात हजर करा याला आणि चौकशीसाठी custody मागा. "

कावेरी आणि केशव परत निघतात. कावेरी गप्प असते. केशव कावेरीला विचारतो, " काय झालं कावेरी?  सकाळपासून तिला छान वाटत होत तो गुन्हेगार पकडला गेला म्हणून पण आता अशी अस्वस्थ का आहेस?  "
कावेरी केशवाला गाडी थांबवायला सांगितले आणि केशवकडे पाहत म्हणते, " केशव तो माझा नवरा मोहन होता. "
केशव ऐकून स्तब्ध होतो. त्याला कावेरीच्या त्यावेळी स्तब्ध होण्याचं कारण कळतं.  दोन मिनिट शांततेत जातात. कावेरी पुढे बोलते, " मला माहित होत केशव माझ्या भूतकाळ माझ्या मागे -पुढे फिरत राहणार. तूला त्याचा त्रास होणार, आणि हेच मला नकोय म्हणून मी तूला होकार दिला नाही. आणि आता असं वाटतंय मी केलं ते योग्यच केलं. "
त्यावर केशव कावेरीला बोलतो, " तूला असं का वाटलं की तुझ्या भूतकाळामुळे दुःखी होईन किंवा मला त्रास होईल?  मी आता शांत झालो कारण मला माहित आहे तुझ्या मनाला त्याला असं अचानक पाहून त्रास झाला असेल. आता राहिला प्रश्न तुझ्या हा बोलण्याचा किंवा ना बोलण्याचा तर मी तुझ्यावर प्रेम केलंय. तुझी वाट पहात राहीन. पण त्याआधी एक मित्र म्हणून प्रत्येक परिस्थितीत तुझ्यासोबत तुझी ढाल बनून उभा राहीन. आता तूला देवाने संधी दिली आहे. तू तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा आणि त्या बाळावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करावा. आणि ज्या पद्धतीने तू पोलीस स्टेशनला बोललीस त्यानुसार तू भक्कम आहेस हे सिद्ध झालं आहे. शिवाय आता तू तुझ्याकडून घटस्फोट सुद्धा सहज घेऊ शकतेस. त्यामुळे तुझ्या मनात असलेली भूतकाळाची भीती कायमची जाईल आणि तू मोकळ्या मनाने आयुष्य जगू शकशील. माझ्याशी लग्न नाही केलं तरी चालेल पण मोकळ आयुष्य जगणं तुझा अधिकार आहे. "

कावेरीला केशवचं म्हणणं पटत. आता ती सज्ज होती दुहेरी लढाईसाठी.... 

क्रमश..... 

 

संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347


संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-2_3384


संघर्ष अस्तित्वाचा ३ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-3_3407


संघर्ष अस्तित्वाचा ४ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-4_3437

 

संघर्ष अस्तित्वाचा ५ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-5_3470


संघर्ष अस्तित्वाचा ६ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-6_3500


संघर्ष अस्तित्वाचा ७ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-7_3533


संघर्ष अस्तित्वाचा ८ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sanghrsh-astitvacha-8_3575


संघर्ष अस्तित्वाचा ९ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-9_3585


संघर्ष अस्तित्वाचा १० @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sanghrsh-astitvacha-10_3608


संघर्ष अस्तित्वाचा ११ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-11_3646


संघर्ष अस्तित्वाचा १२ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-12_3697