संघर्ष अस्तित्वाचा १२

------

संघर्ष अस्तित्वाचा १२ @ प्रेरणादायी कथा 

( मागच्या भागात आपण पाहिलं की कावेरीच्या मनात केशवविषयी एक हुरहूर असते पण ती चूक की बरोबर हे कावेरीला कळत नसतं. कावेरी आपल्या कामात व्यस्त असताना तिला एक phone येतो आणि ती तडक हॉस्पिटलला पोहचते. एका ३-४ दिवसांच्या मुलीला जिवंत पुरण्याचा प्रयन्त केला गेला होता. एकाने तो प्रकार पहिला आणि आरडा ओरडा सुरु केला तसा तो माणूस पळून गेला आणि आरडा ओरडा करण्याऱ्या माणसाला तो नीट दिसला नाही. कावेरीचा हे सर्व ऐकून फार संताप होतो. ती पोलिसांना सांगते हवे ते सर्व अधिकार वापरा, परवानगी मी देते. पण त्याला शोधून काढा. झालेल्या प्रसंगामुळे घरी सुन्न बसलेल्या कावेरीला केशव काय झालं विचारतो. त्यावर कावेरी सर्व घटना त्याला सांगते. त्यावर केशव या घटना ग्रामीण भागात सर्रास घडतात. तूला माहिती असायला हवं. त्यावर माझ्या समोर मुलींचा तिरस्कार झाला, छळ झाला पण असा प्रकार नाही घडला असं ती केशवाला सांगते. त्यावर केशव मी वर्षातून एकदा ग्रामीण भागात सेवा द्यायला जातो. त्यामुळे असे प्रकार पाहिले आहेत आणि विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे २ दा माझ्यावर हल्ला सुद्धा झाला आहे. हे ऐकून कावेरीला आपल्याला काहीतरी ठोस पाऊल उचलायला हवं असं ठरवते आणि केशवच्या मदतीने समाजसेवेत रस असलेल्या त्याच्या डॉक्टर मित्रांना ती मीटिंगला बोलवते.... आता पुढे...... )

कावेरीच्या डोक्यात रात्रभर हाच विचार होता की काय उपाययोजना करावी म्हणजे कुठेतरी आळ बसेल या गोष्टींना.  दुसऱ्या दिवशी कावेरी ऑफिसला जाण्याआधी हॉस्पिटलला जाते. त्या बाळाची तबियत आता ठीक असल्याचं तिला डॉक्टरांकडून कळत. कावेरीचा जीव भांड्यात पडतो. इकडे केशव हॉस्पिटलमध्ये आपल्या डॉक्टर मित्रांना सर्व सांगतो आणि कावेरीला आपल्याला भेटायचं आहे. त्यामुळे भेटायच्या आधी तिला कळवायला हवं. घटनेची गंभीरता जाणून सर्वजण संध्याकाळी ड्युटी संपल्यावर भेटू असं सांगतात. केशव कावेरीला कॉल करून सांगतो आणि संध्याकाळची मीटिंग fix करतो. 

कावेरी पोलिसांना बोलावून तपास कुठंवर आला विचारते. पोलीस तपास चालू आहे एवढंच सांगतात. कावेरी काहीही करून मला लवकरात लवकर तो माणूस हवा आहे असं म्हणते. इकडे कावेरी काही calls करून संध्याकाळच्या मीटिंगची तयारी करायला सांगते. आणि आपल्या कामात गर्क होते.

संध्याकाळी केशव आणि त्यांचे काही डॉक्टर मित्र मीटिंगसाठी येतात. आता काही समाजसेवेशी संबंधित आणि पोलीस कर्मचारी व्यक्तीही असतात. सर्व बसल्यावर कावेरी बोलायला सूरूवात करते.
कावेरी, " काल झालेली घटना तुम्हां सर्वांना माहितचं असेल. या सर्व गोष्टी खुळचट रूढी, परंपरा, आणि शतकानुशकते चालत आलेली मानसिकता यामुळे अजूनही तग धरून आहे. एका रात्रीत हे सर्व बदलणार नाही पण आतापासून प्रयत्न सुरु केला तर एक दिवस नक्की बदल घडेल. शिवाय मी एकटीने करायचं ठरवलं तरी ते जमणार नाही त्यासाठी तुम्हां सर्वांची मदत हवीच. त्यासाठीच आजची मीटिंग ठेवण्यात आली आहे. "
समाजसेवकांपैकी एक जण म्हणतो, " मॅडम, तुम्ही सांगा आम्ही आमच्याकडून शक्य ती सर्व मदत नक्की करू." 
कावेरी, " मदत तर हवी आहेच त्याआधी थोडं गणित मांडूयात. सर्वांनी त्यांच्या त्याच्या अनुभवावरून या मागे काय कारणे असतील ते सांगा. " 
केशव कावेरीला मॅडम म्हणून आवाज देतो. कावेरी त्याच्याकडे पाहते केशव आपलं बोलणं सुरु करतो. कावेरीला केशवचं कामाच्या जागी professional  वागणं आवडतं.
केशव, " मॅडम,  सर्वांत मोठं कारण आहे शिक्षण नसणे आणि रोजगार नसणे. शिक्षण नीट नसल्यामुळे स्त्रियांना रोजगार नसतो त्यामुळे त्यांना विरोध करता येत नाही. आपल्याला घराबाहेर काढलं तर आपण कुठे जाणार?  माहेरी तर पाठवणीच्यावेळीच सांगितलं जात की आता हे घर तूला परकं आहे आणि सासर हेच तूझं घर. त्यामुळे दुर्बलता वाढते. आणि अन्याय सहन करण्याशिवाय काही पर्याय नसतो. त्यात मुलामुळे वंश चालतो, नाव चालत वगैरे गोष्टी येतातच. 
कावेरीला तिच्यासोबत घडलेल्या घटना आठवतात.
केशवचा डॉक्टर मित्र, " मॅडम, याशिवाय अंधश्रद्धेमुळे या सर्व प्रकरणांना चालना मिळते. याशिवाय अजून एक म्हणजे काही ठिकाणी अजूनही गर्भ निदान केलं जातं. कायद्याने गुन्हा असला तरी काही ठिकाणी जास्तीचे पैसे घेवून हे काम होतं हे नाकारता येत नाही. "
कावेरी, " आता तुम्ही problems सांगितले आता यावर आपण काय काय उपाययोजना करू शकतो ते सांगा. सर्वांची मते महत्वाची आहेत. " 
समाजसेवेतील एक व्यक्ती, " मॅडम, सुरुवात आपण अशीही करू शकतो की आपण गावागावात पोस्टर लावू शकतो की कोणत्याही स्त्री किंवा मुलीच्या छळाची किंवा अपघाती किंवा घातपाती निधनाची बातमी पोलिसांना कळवणाऱ्याला बक्षीस आणि त्या व्यक्तीचं नाव गुप्त राहील याची हमी. यामुळे हुंड्यासाठी स्त्रियांचा छळ कमी होईल किंवा झाला तरी कोणी ना कोणी पैस्यासाठी बातमी देईलच. आणि या भीतीने का होईना हे प्रमाण कमी होऊ शकतो. "
दुसरा, " हो मॅडम, याशिवाय आपण अजून एक करू शकतो ते म्हणजे पूर्वी जसे प्रौढ शिक्षण साठी वर्ग भरायचे तसे गावागावात पुन्हा सुरु करू शकतो. याशिवाय गावखेड्यातील स्त्रियांना शिवणकाम, विणकाम वगैरे शिकवून आपल्या अधिकारात एखाद workshop सुरु करून त्यांना रोजगार देऊ शकतो. राजस्थान मध्ये एक महिला आहे जिने अनेक महिलांना रोजगार दिला आहे. त्याप्रकारे नक्कीच करू शकतो. यामुळे चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचं बळ आपण त्यांच्यात भरू शकतो. आणि एकदा त्यांना शिक्षण आणि रोजगार मिळाला की चुकीच्या गोष्टींना, अन्यायाला विरोध करायला त्यांना सांगावं लागणार नाही. "
तिसरा, " मॅडम, प्रौढ शिक्षण वर्ग आणि महिलांना रोजगार असं म्हणून आपण खेड्यापाड्यात प्रवेश करू शकतो. आपण स्त्रियांना मजबूत करून चुकीच्या रूढींविषयी जागृत करण्याचा प्रयत्न करतोय असं सांगितलं तर गावातही घुसू देणार नाहीत."
केशवचा मित्र, " मॅडम, अजून एक गोष्ट होऊ शकते. ती म्हणजे पोलिसांच्या मदतीने नर्सिंग होम आणि अन्य ठिकाणी जिथे गर्भ निदान होण्याची शक्यता आहे अश्या ठिकाणी पोलिसांच्या साखळीतील माणसे कामाला लावून तिथे नक्की काय चालत यावर पाळत ठेवता येईल. आणि इथे उपस्थित समाजसेवकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये यांना भरती करण्यात अडचण येणार नाही. फार फार तर ६ महिने किंवा १ वर्षात तिथे नक्की काय चालत हे कळेल. अश्याने अनेक ठिकाणी छापा मारता येईल आणि असे डॉक्टर्स पकडले गेल्यामुळे अन्य डॉक्टर्स जे असे काम करतात त्याच्यावर वचक बसेल. 
कावेरी, " यातल्या काही गोष्टी सध्या माझ्या अधिकारात आहेत. जसं की प्रौढ शिक्षण वर्ग, नर्सिंग होम मध्ये भरती वगैरे पण माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्यासाठी किंवा महिलांसाठी रोजगार साठी मला राज्य सरकारशी बोलावं लागेल. "
समाजसेवकांपैकी एक, " मॅडम, चांगल्याकामासाठी उशीर नको, सध्या अनेक गोष्टींसाठी डोनेशन मिळतात. त्यात एक अजून जोडू आपण, सध्या त्यातून मिळणाऱ्या पैश्यातून आपण या योजना सुरु करू. तुम्ही परवानगी घ्या राज्य सरकारकडून आणि सांगा. त्यानंतर राज्य सरकार काढून जेव्हा यासाठी पैसा मिळेल तेव्हा याचा व्याप वाढवू. " 

कावेरी यासाठी तयार होते. याशिवाय तिच्या एक गोष्ट लक्षात येते आपण चांगल्या कामासाठी उभे राहिलो की देवही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. कावेरी तिच्या अधिकारातले सर्व आदेश पोलिसांना देते. आणि कामाला लागायला सांगते. आता उद्या सर्वांत आधी राज्य सरकारकडून परवानगीची घाई करायची असं कावेरी ठरवते.
जाताना कावेरी आणि केशव सोबत निघतात. मीटिंग उशिरापर्यंत सुरु असल्यामुळे निघायला रात्र झाली होती. दिवसभराचं टेन्शन एकमेकांना पाहून कमी झालं होतं. कावेरीला केशव बद्दल अनामिक ओढ असते पण ती आतातरी दाखवायची नाही असं तिच्या मनात ठाम होतं. केशव आणि कावेरी त्या शांत, सुंदर आणि मनमोहक रात्री शांत रस्त्याने जातं होते आणि रेडिओ वर सुंदर गाणं सुरु होतं..... ये राते, ये मौसम, नदीका किनारा, ये चंचल हवा....
कहा दो दिलोने के मिल के कभी हम ना होंगे जुदा.... 


क्रमश....... 


संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347


संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-2_3384


संघर्ष अस्तित्वाचा ३ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-3_3407


संघर्ष अस्तित्वाचा ४ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-4_3437

संघर्ष अस्तित्वाचा ५ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-5_3470


संघर्ष अस्तित्वाचा ६ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-6_3500


संघर्ष अस्तित्वाचा ७ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-7_3533


संघर्ष अस्तित्वाचा ८ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sanghrsh-astitvacha-8_3575


संघर्ष अस्तित्वाचा ९ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-9_3585


संघर्ष अस्तित्वाचा १० @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sanghrsh-astitvacha-10_3608


संघर्ष अस्तित्वाचा ११ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-11_3646

🎭 Series Post

View all