Nov 26, 2020
स्पर्धा

संघर्ष अस्तित्वाचा ११

Read Later
संघर्ष अस्तित्वाचा ११

संघर्ष अस्तित्वाचा ११ @ प्रेरणादायी कथा 

( मागच्या भागात आपण पाहिलं की कावेरी Interview द्यायला दिल्लीला जाते. ती आत्मविश्वासाने Interview देते, आणि UPSC पास होते. तिची पहिली पोस्टिंग तिच्याच जिल्हात होते. सरकार तर्फे मिळणारं घर कावेरी नाकारते. आणि माधुरी सोबतच राहते. एके दिवशी कावेरी घरी येते तर दरवाजा एक तरुण उघडतो. कावेरी ची ओळख होते. तो माधुरीचा भाऊ असतो. जो डॉक्टर असतो. हळूहळू दोघात एक मैत्रीचं सुंदर नातं तयार होतं. कावेरीच्या मनात केशव बद्दल नाजूक कोपरा असतो पण तिला ते चुकीचं वाटत असतं. एक दिवस माधुरी चित्रांच्या प्रदर्शनासाठी बाहेर गेली असताना कावेरी उशिरा घरी येते. पाऊस सुरु असतो. केशव तिच्यासाठी कॉफी बनवतो. दोघे गप्पा मनमोकळ्या गप्पा मारतात. मधेच लाईट जाते. कावेरी घाबरून केशवकडे सरकते. केशव मेणबत्ती घेऊन येतो. धुंद वातावरणात केशव कावेरीला लग्नाबद्दल विचारतो. कावेरी गोंधळते. ती म्हणते मी माझ्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहित नाहीत. त्यावर केशव मला तुझ्याबद्दल सर्व माहित आहे. मी मला तुझ्याबद्दल जे वाटत ते घरच्यांना सांगितलं आहे. त्यांना काहीही problem नाहीये. आता प्रश्न तुझा आहे. तुला हवा तेवढा वेळ घे आणि मग उत्तर दे. दोघे आपापल्या रूम मध्ये जातात आणि विचारात गर्क होतात. आता पुढे..... )


सकाळ फार सुंदर भासत होती. केशवची दुपारची शिफ्ट होती, तर कावेरीला निघायची घाई. केशवने कावेरीला छान चहा बनवून दिला. कावेरी असं काळजी घेणारं प्रेम पहिल्यांदा अनुभवत होती. तिला छान वाटत होतं. तरी सुद्धा हे बरोबर आहे की नाही?  या संभ्रमात ती होती. कावेरी तिचं आवरून घाई घाईत निघते. मागून केशव, ' सांभाळून जा, काळजी घे 'असं म्हणतो.  कावेरी मागे वळून एकदा केशव कडे पाहते आणि मान हलवून निघून जाते. केशव कावेरीकडून होकार यावा यासाठी वाट पहात होता. 

कावेरीचं ऑफिसमध्ये काम सुरु असताना तिथे एक call येतो. आणि कावेरीला लगेच एका हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. हॉस्पिटलमध्ये एका ३-४ दिवसांच्या मुलीवर उपचार चालू असतात. पोलीस आणि समाजसेवक यांनी कावेरीला तिथे बोलावलं होतं. पोलिसांनी कावेरीला घटना सांगायला सुरुवात केली., " मॅडम, आम्हाला हायवे वरून एक call आला म्हणून आम्ही लगेच तिथे पोहचलो. तर तिथे एक लहान मुलगी होती. कोणीतरी तिला जिवंत पुरण्याचा प्रयन्त केला होता. पण बाळाचं नशीब बलवत्तर होतं. तिथून जाणाऱ्या एकाला ते पुरताना दिसलं आणि त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे तो माणूस पळून गेला त्याचं तोंड नाही पाहू शकला तो. पण बाळ अर्धवट पुरलेल्या स्थितीत होतं. आणि बाळाला कोणत्या तरी औषधांचा ओव्हर डोस ही दिला गेला आहे. कदाचित बाळ झोपेत राहावं आणि पुरताना रडू नये म्हणून. "


हे सर्व ऐकून कावेरी फार संतापते. कावेरी डॉक्टर बरोबर चर्चा करून बाळाला वाचवा म्हणून सांगते. तर पोलिसांना सांगते, " जो कोणी होता, जो बाळाला पुरत होता. त्याला काहीही करून माझ्यासमोर हजर करा. त्यासाठी जो अधिकार वापरायचा आहे वापरा. मी परवानगी देते. पण मला तो काहीही करून हवा आहे. "

कावेरी संध्याकाळी घरी येते. केशव हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे ती घरात एकटीच असते. ती खिडकीतून बाहेर एकटक बघत त्या बाळाचा विचार करत असते. त्यात बराच वेळ जातो, ते कावेरीच्या लक्षातही येतं नाही.  थोड्या वेळाने केशव येतो. केशव आल्याचंही तिच्या लक्षात येतं नाही. केशव कावेरीला आवाज देतो. तशी ती भानावर येते. कावेरी केशवला फ्रेश व्हयला सांगते आणि दोघांसाठी कॉफी बनवून आणते. 

केशव फ्रेश होवून येतो आणि तिच्या हातातून कॉफी कप घेत विचारतो, " आज काय झालं ? " 
कावेरी, " नेहमीचचं काम, दुसरं काय ? "
केशव, " नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं नक्की झालं आहे. तुझा चेहरा सांगतोय. "
कावेरी केशवकडे एकटक बघते आणि म्हणते, " हो, आज जगाचा अजून एक चेहरा पहिला, जो मला अजिबात आवडला नाही. " 
केशव, " कावेरी या जगाचे अनेक चेहरे आहेत. काही चांगले तर काही वाईट. आपल्या आवडण्या न आवडण्यावर नाही कोणी चालत. आपल्याला परिस्थितीला तोंड द्यायचं असतं. आणि तू जे क्षेत्र निवडलं आहेस त्यात तूला न आवडणाऱ्या गोष्टीशीचं तूला डील करायचं असतं. "
कावेरी, " मान्य आहे, पण काही गोष्टी सहन होतं नाहीत. "
केशव कावेरीला विचारतो, " काय झालंय आज नक्की?  मला सांग, तूला बरं वाटेल, माधुरी असती तर तीला तू सांगितलंच असतं ना. तू होकार देणं किंवा नकार देणं नंतरची गोष्ट आहे. तोपर्यंत आपण मित्र अहोत. मला निसंकोच सर्व सांगू  शकतेस तू. "


केशवचं बोलणं ऐकून कावेरीला खूप बरं वाटत. ती केशवाला घडलेला सर्व प्रकार सांगते. 
केशव म्हणतो, " कावेरी खरं तर हा प्रकार तुझ्यासाठी नवीन नसायला हवा होता. कारण ग्रामीण भागात असं बऱ्याच प्रमाणात घडतं." 
कावेरी, " मी मुलींचा होणारा दुःस्वास पाहिलाय, तो मी सहनही केलाय. ती नकोशी असलेली भावना अनुभवलीये मी. पण असं किमान माझ्यासमोर तरी नाही घडलं. "
केशव, " कावेरी, मी डॉक्टर म्हणून काम करताना वर्षातून काही काळ खेडेगावांमध्ये सेवा देतो. त्यावेळी असे अनुभव बऱ्याच वेळा आलेत. "
कावेरी, " मग तुम्ही काही action का नाही घेतली. ? " 
केशव, " प्रयन्त केला होता, पण गावातील लोक एकमेकांना सामिल असतात. पुरावा हाती लागू देत नाहीत. या कारणासाठी माझ्यावर दोनदा हल्लाही झाला होता. " 
कावेरी, " काय ?  हल्ला  ? " ( आश्चर्याने )
केशव, " हो, हल्ला. त्यांच्या खोट्या परंपरेमध्ये आलेलं नाही चालत त्यांना. "
कावेरी, " आपण काहीतरी करायला हवं. " 
केशव (कावेरीकडे बघून गोड हसत म्हणतो ), " तुम्ही करू शकता, कलेक्टर साहेबा. आम्ही फक्त तुमची साथ देणार, तीही ठामपणे आणि शेवटपर्यन्त. 
शेवटपर्यंत या शब्दाचा अर्थ कावेरीला कळला. ती मनातून सुखावली, तरी सुद्धा मनाची तयारी अजून होतं नव्हती. 

ती म्हणते, " केशव, एक विचारू? "
केशव, " ह्म्म्म.. "
कावेरी, " तुमचे काही मित्र असे असतील ना ज्यांना समाजसेवेची आवड आहे. "
केशव, " हो आहेत ना. पण का  ? "
कावेरी, " जे सुरु आहे, ते एक फटक्यात बंद नाही करता येणार पण काही ठोस पाऊलं उचलायला हवीतच ना."
केशव, " म्हणजे,?  मला नाही कळलं. "
कावेरी, " केशव फक्त एक करा, मला मदत करायला जो कोणी तयार असेल त्यांच्यासोबत एक मीटिंग ठरवा अगदी उद्या, परवा मध्येच. आणि कामाच्या वेळेत नाही. कामानंतरची वेळ ठरवा आणि मला कळवा आपण भेटूत. 

कावेरी आपल्या कामाला ( जेवण बनवायला जाते.) आणि तीला पाठमोऱ्या पाहणारा केशव तिच्यातला ठामपणा, समाजाला बदलण्याची जिद्द आणि चिकाटी पाहून हरखून गेला होता. शिवाय आपण योग्य व्यक्तीवर प्रेम केलं,  यावर त्याला गर्व वाटत होता. 

क्रमश..... 


संघर्ष अस्तित्वाचा १ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-1_3347


संघर्ष अस्तित्वाचा २ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-2_3384


संघर्ष अस्तित्वाचा ३ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-3_3407


संघर्ष अस्तित्वाचा ४ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-4_3437

 

संघर्ष अस्तित्वाचा ५ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-5_3470


संघर्ष अस्तित्वाचा ६ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-6_3500


संघर्ष अस्तित्वाचा ७ @ प्रेरणादायी कथा

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-7_3533


संघर्ष अस्तित्वाचा ८ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sanghrsh-astitvacha-8_3575


संघर्ष अस्तित्वाचा ९ @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sangharsh-astitvacha-9_3585


संघर्ष अस्तित्वाचा १० @ प्रेरणादायी कथा 

https://www.irablogging.com/blog/sanghrsh-astitvacha-10_3608