संघर्ष म्हणजे जीवन ....

ईरा : शब्दांंचे नंदनवन
संघर्ष म्हणजे जीवन ...

संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे.संघर्षाशिवाय जीवनाला अर्थच उरत नाही.जन्मताच संघर्षाची नांदी सुरु होते.लहान जीवालासुद्धा संघर्ष करुन जगावे लागते.जे संघर्ष करायला घाबरतात ते जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत.जीवनात सुख , शांती , समाधान , प्रगती हवी असेल तर संघर्षाचे रणशिंग फुकले पाहिजेत.आजपर्यंत अनेक महान व्यक्तींचा यशाचा आलेख पाहिला त्यांच्या यशाची गुरुकिल्ली होती केवळ संघर्ष ...!

संघर्षाला सामोरे जायचे असेल तर आपले मनोबल कणखर बनवा.आपल्या समस्यांवर वेळीच उपाय शोधा.आपल्या नशिबाला दोष देण्यापेक्षा स्वतः प्रयत्नवादी रहा.संघर्षाची मैर्त्री करा.अनेक थोर पुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास करा.त्यांच्या सवयी अंगीकारा आणि संघर्ष कसा करायचा याचे अनुकरण करा.

कोणतेही यश मिळवायचे आसेल तर सयंम फार गरजेचा आहे .धीराने परिस्थितिला सामोरे जा.मध्येच प्रयत्न सोडणे , कंटाळून जाणे , आत्महत्येसारखे वाईट विचार करणे , योग्य अभ्यास व निरिक्षण न करणे अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा.मनाला ठणाकावून सांगा संघर्षाशिवाय तरणोपाय नाही.

संघर्षाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करा.जसे की समुद्रातील जहाजला योग्य दिली तर किनारा गाठू शकते तसे.कोणती समस्या आहे तिचे योग्र निराकरण करुन समस्येला सामोरे जा.न थकता संघर्ष करायला शिका.समस्यांना घाबरु नका.आलेल्या समस्या तुमची परिक्षा घेण्यासाठी येतात तेंव्हा संघर्षाला तयार रहा.

तुमचं जगणं सोप आहे अवघढ याची कारणमिमांसा करा.उदरनिर्वासाठी जगणं आपलं कर्तव्य बनत आणि मग जीवनातील प्रत्येक प्रसंगाला आपण तोंड देत जीवन जगता असतो.जगण्याचा उद्देश शुद्ध असेल तर संघर्ष करायला मन तयार होते आणि कोणत्याही अडचणीवर सहज मात होते.

जगभरातील अनेक उदाहरणे पाहिली असता संघर्षाशिवाय त्यांना यश मिळाले नाही.शेतात राबणारा शेतकरी जीवनभर संघर्ष करत आसतो.उन , वारा, पाऊस व नैसर्गिक आपत्तीतही शेतकरी आपले संंघर्षमय जीवन चालूच ठेवले आहे.शिक्षक , शास्त्रज्ञ , वकिल , खेळाडू , विद्यार्थी , महिला यांनी संघर्षमय वेळेला सामोरे जावून वेगळा आदर्ष निर्माण केला आहे.आपण पाहतोय ईरावर प्रचंड लेखन मुद्रीत होताना दिसत आहे.अत्यंत कठिण परिस्थितिला सामोरे जात व कौटुंबिक जबाबदारीचे भान राखून लेखक आपले लेखन लिहित आहेत यात महिला लेखिकांंचे योगदान फार मोलाचे आहे कारण संघर्ष म्हणजे काय याची जाणीव पदोपदी जाणवते त्यामुळे त्यांच्या लेखनात याचे पडसाद पहायला मिळतात.परवाच पाकिस्तान विरुद्धच्या क्रिकेट मॕचमध्ये विराट कोहलीने संघर्ष करुन मिळवलेला विजय अविस्मरणीय होता.कठिण प्रसंगाला ध्येर्याने तोंड दिल्यास यश हमखास मिळते त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी मनापासून करा जीवन सुंदर जगता येईल.

©नामदेवपाटील