सांग ना रे मी कुठे चुकले
प्रत्येक स्त्री ला हा प्रश्न आयुष्यात एकदा तरी पडतोच .....
कारण स्त्री म्हणजे त्यागमूर्ती असे मानले जाते पण प्रत्येकवेळी तिचा त्याग योग्य च ठरतो का ???
की कधी कधी तिच्या त्यागाचे धिंडवले काढले जातात या पुरुषप्रधान समाजात
लेखकाला लिंग भेदाचे समर्थन करायचे नाही किंवा पुरुषप्रधान संस्कृती चा अनादर देखील नाही
पण एका स्त्री च्या त्यागाची अनोळखी बाजू
परिचयाची करायची आहे
बघुयात जमते का ??????
आशाकाकू परसातील झाडांना पाणी घालत होत्या,
त्यांची झाडे म्हणजे त्यांचा जीव की प्राण त्या स्वतः च्या लेकरा प्रमाणे त्या झाडांना जपत होत्या त्यांना कधीच आवडायचे नाही त्या झाडाची फुले तोडलेली,
इकडे अस्मिता ची ऑफिस ला जाण्याची घाई चालू होती
अस्मिता त्यांची एकुलती एक मुलगी
MBA केलंय तिने तेही टॉप क्लास मध्ये,
दिसायला सुंदर सावळी पण नाकीडोळी
नक्षत्रावाणी असल्यामुळे दिसताक्षणी कुणीही प्रेमात पडेल अशी,
एका हातात घड्याळ व दुसऱ्या हातात बांगडी , गळ्यात एक सोन्याची चैन ,
बोलणे मोजकेच पण मुद्देसूद
शांत, समजदार, हुशार एखाद्या राजकन्येला ही लाजवेल अशी
शिक्षणपूर्ण करून ती नोकरीला लागली,
एकुलती एक असल्यामुळे सगळे हट्ट न रडता पूर्णझाले वाट बघणे काय असते याची जाणीव देखील तिला नव्हती ,
अशातच एक सुंदर स्थळ चालून आले
मुलगा ही दिसायला देखणा, सुशिक्षित, व श्रीमंत होता नाकारण्यासारखे काहीच नव्हते,
बघाताक्षणी त्यांचा विवाह निश्चित झाला,
अजून लग्नाला एक वर्ष होत नाही तर ते वेगळे देखील झाले, दोन महिने झाले होते अस्मिता ला माहेरी येऊन पण विवेक चा साधा एक कॉल देखील आला नाही,
अस्मिता तिचे आवरून ऑफिस ला निघणार तोच पोस्टमन काका काहितरी घेऊन आले,
आशाकाकू ला तर वाटले पोरी च्या परीक्षेचे काही असेल कारण मुळात हुशार असलेल्या अस्मिता ने लग्न झाले तरी शिक्षण चालू च ठेवले होते,
तिची तारेवरची कसरत व्हायची पण ती तरीही सहन करायची,
कारण ती मुळातच ध्येयवेडी होती,
काकू झाडांना पाणी देण्यात व्यस्त होत्या म्हणून अस्मिता ने पर्स खाली ठेवली व पोस्टमन काका नि दिलेले पाकीट हातात घेतले,
"काय आणलेत आज काका "
अस्मिता हसून म्हणाली
"मला कसे माहीत असेल ताई
तुम्ही च फोडा की व मला पण सागा"
पोस्टमन काका हसत म्हणाले
तिने पाकीट फोडले व त्यातून काहितरी बाहेर काढले व वाचू लागली
तिचा तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता ती पुन्हा पुन्हा पाने पालटुन बघत होती,
शेवटी जेंव्हा खात्री पटली तेव्हा ती पटकन खुर्चीवर बसली खुर्ची ला पकडून
काका ना काही कळेना अस्मिता ला नेमके काय झाले
त्यांनी आशाकाकू ला आवाज दिला
"अहो वहिनी पोरीला भोवळ आली या लवकर"
"तरी नेहमी सांगते खातपित जा पण नाही फक्त ऑफिस व काम
आई वेडी म्हणून सांगते ना तिला त्याचे काय ???"
आशा काकू तोंडाचा पट्टा चालू करत घरात आल्या तोपर्यंत अस्मिता ने सावरले होते स्वतः ला,
काकू नि तिला पाणी दिले
"आता बरे वाटते का तुला "
काकू काळजीने म्हणाल्या
"हो "
अस्मिता स्वतः ला सावरत म्हणाली
"अग पण काय झाले होते व कसली कागद आहेत ही "
आशा काकू चौकशी करत म्हणाल्या
"आई हे घटस्फोटा चे कागद आहेत
विवेक ने पाठवलेत
त्यांना काडीमोड हवा आहे आई"
तिने शांतपणे डोळ्यातून एक अश्रू गाळून उत्तर दिले
"काडीमोड
आशाकाकू ओरडत म्हणाल्या
असे कुणी म्हणाले म्हणून काडीमोड होत नसतो
आपण जाऊ त्यांच्याकडे व बोलू तू नको काळजी करू"
आशाकाकू समजावत म्हणाल्या
"आई त्याचा काहीही उपयोग होणार नाही व मला स्वतः ला कुणावर जबरदस्ती
लाधायचे नाही आहे त्यामुळे ते जसे म्हणतील तसेच होईल ???
हे घे"
असे म्हणून तिने पर्स मधून पेन काढला व त्या कागदावर सही केली
"अग थांब ग बाळ आपण विचार करून निर्णय घेऊ असे नाते तुटल्याने तुटत नाहीत तू थांब तर ........"
काकू अस्मिता ला विनवण्या करत होत्या पण मुळात हट्टी असलेली अस्मिता ऐकेल तेव्हा ना
तिने काकूंचे काहीच न ऐकता त्या कागदावर सह्या केल्या व कागद काका च्या हातात दिले
"काका पोस्ट करून द्या पुन्हा "
असे सांगून ती ऑफिस ला न जाता रूममध्ये निघून गेली,
खुप वेळ झाला होता पण अस्मिता चा काहीच पत्ता नव्हता, ती रूमचा दरवाजा देखील उघडत नव्हती
काकू परेशान झाल्या तिला आवाज देऊन देऊन पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता,
शेवटी त्यांच्या घरापासून काही अंतरावर काकू ची लहान बहीण राहत होती सोनाली काकू नि तिला कॉल करून बोलावून घेतले,
अस्मिता व सोनाली चे थोडे वय आसपास चे होते म्हणून त्यांचे छान जमायचे
अस्मिता तर तिला मावशी कमी व मैत्रीण जास्त मानायची ,
बहिणीच कॉल आला हे जाणून सोनाली धावत आली व रूमचा दरवाजा वाजवू लागली
"अस्मि दरवाजा खोल बर
मी आलेय ना आता सर्व ठीक होईल पण तू दरवाजा उघड '
पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता
"तुला माझी शपथ आहे दरवाजा उघड"
सोनाली अस्मिता ला म्हणाली
शपथ हे नाव ऐकताच अस्मिता ने दरवाजा उघडला,
उघडलेला दरवाजा पाहून काकू ला बरे वाटले,
सोनाली दिसताच अस्मिता ने तिला मिठी मारली व इतका वेळ शांत असलेली अस्मिता जोरजोरात रडू लागली
तिच्या आवाजाची तीव्रता इतकी होती की तो आवाज ऐकुनच काकू ला रडू कोसळले,
"शांत हो बाळ आपण बसून बोलू
चालेल ना
खाली बस बघू तू " सोनाली अस्मिता ला वेगळं करत म्हणाली
अस्मिता ने डोळे पुसले व खाली बसली
"पाणी घे
व मला काय झाले ते नीट सांग "
सोनाली म्हणाली,
अस्मिता ने पाणी घेतले व बोलू लागली
"मावशी सांग ना ग मी कुठे चुकले
अग मी लग्न करून त्याच्या घरी गेले त्याच्या घरातील लोक खुप मॉर्डन होते माझ्या व त्याचा घरात, वातावरणात, परिस्थितीत व संस्कारात सगळ्यात बदल होत पण मी त्याच्यासाठी स्वतः ला पूर्णपणे बदलून टाकले,
अग लहानपणापासून केसांना कधी कात्री देखील ना लावलेली मी त्याच्या साठी वेगवेगळ्या हेअर स्टाईल करायचे का ???
कारण त्याचे मित्र मैत्रिणी खुप मॉर्डन होते व नि त्यात वेगळी पडू नये म्हणून,
मी माझे राहणीमान, बोलणे, चालणे सगळे बदलले फक्त त्याच्यासाठी,
आई बाबा कडे मी जेव्हा साधा पंजाबी ड्रेस घालायचे ना तरी आई ओढणी ला दोन्ही बाजूनी पिन लावायची माझ्या पण त्याच्या घरी पटत नसताना मी घरभर केपरी व गावभर जीन्स घालून फिरायचे,
कधीही कुणी आले की फक्त चेहऱ्याला मेकअप फसायचा व हसत सर्वाना सामोरे जायचे,
त्याच्या पार्ट्या ते मित्र/मैत्रिणी मला काहीच आवडत नव्हते पण मी त्याच्यासाठी सगळं स्वीकारलं होत
मी स्वतः ला पूर्णपणे बदलून टाकले होते त्याच्यासाठी पण तरीही त्याला याची जाणीव नसावी
एक अपेक्षा पूर्ण केली की दुसरी समोर उभा च असायची पण मी देखील माणूस आहे मला मन आहे
त्याला देखील त्रास होतो हे मी विसरले होते,
पन त्याला त्याचे काही नाही
तो फक्त सतत कमी लेखतो मला व माझ्या घरच्यांना
माझ्या शिक्षणाचा तर त्याला हेवा वाटायला हवा पण होते उलटे च
त्याला फक्त स्वतः चे कळते व मी फक्त शोभेची वस्तू
कुठे कार्यक्रम असेल तर मेकअप करा व ईच्छा नसताना चेहऱ्यावर हसू ठेवा व जा
पण मन दुखलेलं असेल तर हसू तरी कसे येणार ग .........
त्याच्यासाठी मी स्वतः बदलून टाकले मला आवडणाऱ्या गोष्टी, छंद सगळं सोडलं व त्याला जे आवडेल ते च केलं पण तरी मी कुठेतरी कमीच पडते मग हे ओढून ताणून बांधलेलं नात काय कामच
मान्य आहे मी रागात माहेरी आले पण मग त्याचे काम नाही का
इथे यावं मला समजावून सांगावं
किंवा कॉल/मेसेज तरी करावा पण नाही त्याने तर हे कागद पाठवून दिले मग जर त्यालाच मी लागत नाही तर मी तरी कशाला त्याच्या माघे लागू,
तसेही मी तिथे गेले की आमच्यात फक्त भांडण च होते त्यापेक्षा मी इथेच बरी आहे,
तो सांगेल ती साडी घालायची, तो म्हणेल तिथे जायचं , तो जे सांगेल ते करायचं मग मी कुठे चुकले
व आता पण मी आले ना त्याला देखील कारण आहे त्याने बाबा ला वाईट बोलले म्हणून आले मी
पण त्याला तर मी त्याच्या आयुष्यात च नको आहे मग उगाच मागे लागण्यात काय अर्थ आहे,
कधी कधी तर मला वाटते त्याची प्रत्येक गोस्ट ऐकली
मग ती अन्याय कारक का असेना त्याचे फळ मिळाले मला जर मी अगोदर च विरोध केला असता तर आता परिस्थिती वेगळी असती,
उगाच नाही म्हणत अन्याय करणाऱ्यार्पेक्षा
अन्याय सहन करणार गुन्हेगार असतो,"
अस्मिता बोलून मोकळी झाली
"अग हो मला सगळं मान्य आहे पण तुझा इथे निभाव कसा लागेल व हे जग एकट्या स्त्री ला जगू देणारे जग नाही हे लक्षात ठेव ,"
"हो माहीत आहे पण माझं ना मन च उडाले आहे आता
मी आता च तरी विचार नाही करणार की पुन्हा काय .......
पण केलं दुसरं लग्न तर करेन नाहीतर मी तशीच राहील पण लग्न नको आता "
अस्मिता डोळे पुसत म्हणाली
"असे नसते ग बाळ
आयुष्य जगत असताना असे अनुभव येतच राहतील मग काय आपण जगणे सोडायचे का
तर नाही उलट आपण लढायचे व जिंकायचे "
सोनाली तिला समजावत म्हणाली,
"ते सगळं ठीक आहे ग मावशी आणि आतापर्यंत मी हेच करत होते ना???
त्यांच्या सोबत जुळवून तर घेत होते पण त्यांनी काय केलं माझ्या स्त्री असल्याचा गैरफायदा घेतला व हे कागद पाठवून दिले त्याला एकदाही मला बोलून क्लीअर करावं वाटलं नाही का???
माझी एवढी देखील पात्रता नाही का ग त्याच्या नजरेत
स्त्री ला नेहमी शोषिक चा ठरवले जाते, सगळे नियम, मर्यादा, रीती, संस्कार सगळं तिला एकटी ला व बाकीच्यांना काय ???
नेहमी त्याग तिनेच करावा असे का ???
"तिला मन नाही का ???
ती माणूस नाही का???
आणि जर तू माझ्या बाबतीत विचारशील तर मी आता माघार घेणार नाही
काय व्हायचे असेल ते होऊ दे
आणि मी नोकरी करते मी भोज नाही कुणावर
आणि हा माझा निर्णय आहे जो की मी बदलणार नाही"
अस्मिता ने सगळं बोलून
टाकले,
काकू व सोनाली विचारात पडल्या त्यांना आता फक्त एकच आधार वाटत होता विवेक काय म्हणतो .....
पण विवेक ने अस्मिता ला भेटण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न केला नाही
उलट ते कागद पोहोचल्यावर त्याने
Thanks म्हणून अस्मिता ला मेसेज केला,
विवेक चा मेसेज बघून अस्मिता सोनाली व आणखी चिडली
" बग मावशी या माणसासाठी तू मला माघार घ्यायला सांगत होतीस
अग घेतली देखील असती
फक्त विवेक ला त्याच्या चुकांची साधी जाणीव झाली असती तरी
पण जाणीव दूर,
त्याला थोडे देखील काही वाटले नाही,
मी माझे सवस्व त्याला अर्पण केलं, राहणीमान, बोलणं , चालणं सगळं बदलले
मग तरीही त्याने मला समजून का घेतले नसेल
सांग ना ग मि कुठे चुकले "
अस्मिता रडत रडत म्हणत होती
आज आशाकाकू कडे किंवा सोनाली कडे तिच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नव्हते,
मुलीचा संसार मोडू नये ये मनातून वाटत होते पण मुलीच्या प्रश्नाचे उत्तर देखील नव्हते.........
काकू व सोनाली फक्त शांत बसल्या अस्मिता समोर व ती एकच विचारात होती
सांग ना रे मी कुठे चुकले ...........
कोण चूक कोण बरोबर हे ठरवणारे आपण कोण ???
पण आज एक सुंदर नाते तुटले होते
एकाच्या हेकेखोर पणामुळे
तर दुसऱ्याच्या सोशिकतेमुळे ......
नेमकं चुकलं कोण
नेहमी मनाप्रमाणे वागणारी अस्मिता अचानक बदलली व पुरुषी अहंकार दुखावला गेला म्हणून विवेक ???
की सहन करणे बंद केले म्हणून अस्मिता .................
पण एक गोड नाते आज संपले होते
समाप्त
कथा कशी वाटली नक्की कळवा
आपल्या प्रतिक्रिया खुप मोलाचा असतात, व प्रत्येक पुरुष विवेक च असेल असे नाही काही समजदार देखील असतात त्यामुळे विनंती आहे सर्वाना एका पारड्यात तोलू नका?
लेखकाचा हेतू निव्वळ आनंद देणे हा असून कुणाला दुखावणे नाही
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा