सांग कधी कळणार तुला?(भाग २)

फक्त मी तुला समजून घेतो बोलून चालत नाही तसं वागावं पण लागतं.


भाग २

हे सगळं रेणू ऐकत होती.
विषाखा किचनमध्ये गेली आणि स्वयंपाकाला लागली. तिच्यामागे रेणू गेली.


" आई, अगं तू मनाला लावून घेऊ नकोस.चल आपण आजीकडे जाऊ उद्या तश्याही मला सुट्या लागल्या आहेत."

आई हसली...जेवण बनवलं आणि टीवी बघत बसल्या दोघी. साधारण एका तासाने वैभव आला.

विषाखाने जेवण वाढलं. आता वातावरण शांत झालं होत. त्यात रेणू म्हणाली,

" बाबा आम्ही उद्या जाऊ का मग आजीकडे?"

" हो, जा ना...आई जाईल तिच्या आईकडे तु जा माझ्या आईकडे."

" नाही!!!! बाबा मी नाही जाणार तिकडे!!.. आई सोबत जाईल मी.आजीला नाही आवडत आम्ही."


" हे बघ तू अशी वागते ना म्हणून ती पण...." वैभव जरा जोरातच बोलला.


" बाबा प्लिज आईला नका ओरडू...आई काहीच सांगत नाही मला आणि तुम्हाला पण."


" म्हणजे?"

" तुम्ही असतांना जाऊ आम्ही आजीकडे आता, तुम्ही नव्हता ना मागच्या वेळी."

विषाखाने रेणुला मध्येच थांबवलं आणि म्हणाली,
" रेणू जेव...जेवताना बोलू नये."

जेवण झाली आई भांडी घासायला गेली. वैभवच्या मनातून ते काही जात नव्हते, काय सांगायचं असेल रेणुला?


"रेणू ए रेणू...चल, आपण आईस्क्रीम आणायला जाऊ."


" अरे वा!. चला ना! ...तुम्ही किती चांगले आहात ना बाबा."

"चल मसका नको लावू....आईला विचार तुला कुठला फ्लेवर हवा आहे?"

"मला माहित आहे..चला तुम्ही."


दोघे बाहेर गेले..रस्त्याने चालतांना  वैभवने तिला विचारलं, "अगं रेणू  मघा काय सांगनार होतीस तू?"


"बाबा आई रागावेल ना मला..."

"अगं ...सांग मी नाही सांगणार तिला."

"बाबा मागच्या वेळी,आपण गेलो होतो आजीकडे, मग तुम्ही आम्हाला सोडून आलात. तेव्हा आजी काहीना काही चुका काढून आईशी भांडायची. हे भांड असचं का घासलं! नीट झाडता येत नाही, मुलीला काही शिकवलं नाही कसं राहायचं?कसं बोलायचं?आम्ही चार दिवस होतो पण एक दिवस असा गेला नाही की आईशी भांडली नाही आजी. दोनवेळा तर आई खूप रडली, जेवली सुद्धा नाही. एवढचं नाही तर आम्ही टीव्ही लावला की आजीला त्रास व्हायचा मात्र ती जेव्हा बघायची तेव्हा  नाही व्हायचा त्रास तिला."

"मग तू हे मला का नाही सांगितले आधी."


"आई म्हणाली आपण परत बाबा सोबत असतील तेव्हाच येऊ. पण बाबांना यातलं काही सांगू नको. म्हणून मी नाही सांगितले. बाबा... आजी आमच्याशी अशी का वागते?"


तेवढ्यात आईस्क्रीमचं दुकान आलं. आईस्क्रीम घेतलं आणि घरी निघाले ..काही अंतर  चालल्यावर घर आले.

"आई...आई... हे, घे आईस्क्रीम."


"अगं... खा तू, माझं मुड नाही."

"अगं घे! तुझा मुड कसा चांगला असेल आता, सासरचा विषय निघाल्यावर."

विषाखाला खूप काही बोलायचं होतं पण लेकीच्या समोर न बोलण्यात शहाणपण होतं असं तिला वाटलं. कारण रेणू जरी तिसरीत होती तरीही तिला सगळं काही कळत होतं."

वैभव आणि रेणू टिव्ही पाहत बसले होते. तर विषाखा काही तरी ऑफिसचं काम करत होती.

रेणू टिव्ही बघत बघत झोपली. वैभवला पण टिव्ही बघायाचा कंटाळा आला म्हणून त्याने रेणुला उचललं आणि बेडरुममधे आला. तिला बेडवर झोपवलं.


" झाली का मॅडमची पॅकिंग?"

"तू कशाला जखमेवर मीठ चोळत आहेस. मघाशी मला बोलायच होतं पण रेणूमुळे बोलली नाही."


" बोल ना! आता."

" आपल्या लग्नाला बारा वर्षे झाली पण तू मला समजून घेतले नाही. तू खरचं सांग तुला कधी कळणार आहे हे की, तुझ्या परवानगीशिवाय मी जाणार आहे का?"


" अगं पण?"
" मग का उगाच मला चिडवतोस."

" नको जाऊ बाई तुझ्या सासरी...जा माहेरी बस."

विषाखाला कळून चुकलं होत की त्याला राग आला आहे.

काय होईल पुढे ते वाचूया पुढच्या भागात.
क्रमशः
©®कल्पना सावळे



🎭 Series Post

View all