इकडे केतकीचे घरच्यांना पण एकुलत्या एक मुलीचे लग्न थाटामाटात करायचे होतेच. पण नवीन पिढीचे काहीसे विचार पण त्यांना पटत होते.
शेवटी दोन्ही घरच्या समंतीने बघुया काय ठरवायचे. दोन्हीही प्रकाराला त्यांची संमती होतीच.त्यामुळे ते दोन्हीही बाजूने सहमत होते.
अचानक सगळी बोलणी चालू होती. निशांतचे आईवडील काका, काकू सगळेच खेळामेळीत बोलणी करत होते. देणेघेण्याचा व्यवहार तर कोणालाच नकोच.निशांतचे बाबा बोलले. तुम्ही तुमचे नातेवाईक मानापमानाचे बघा आम्ही आमचे नातेवाईकांचे बघू! हे ठरले.
मानपान हा शब्द आज्जीच्या कानात असा घुसला. त्या म्हणाल्या,असे कसे लगेच चालेल?
आमचा निशांत एकुलता एक बरका! तेंव्हा सगळे मानपान साग्रसंगीत झालेच पाहिजे.
सगळे कसे व्यवस्थित व्हायलाच हवे.शुभदा आमची एकुलत्या एक मुलाची वरमाई तिचा सगळा मानपान तुम्हांला करायला हवाच.
विहिणीचे पायधुनं, पायघड्या, विहिण पंगत हे सगळं तुम्हांला ठाऊकच असेल ना केतकीच्या आई?
हो आहो आज्जी! सगळे करेल हो मी विहिणबाईचे! आमची पण एकुलती एकच आहे केतकी.याच लग्नात जो काही थाटमाट तो थाटमाट.
बरे दागिन्यांचे बोलून घे रे मुकुंदा मध्ये विषय तोडत आज्जी बोलल्या.
निशांतचे आईबाबा पण आज्जीच्या मागण्या एकूण कष्टप्रद झाले.पण आईला नको बोलू तू, म्हणावे तर आईचा स्वाभिमान दुखावणार.म्हणून ते शांत होते.
वधूकडील मंडळीचा तरी किती फायदा घ्यावा.ते काहीच बोलत नाही. फक्त हो ला हो करतात.हे त्यांनाही पटत होते.
निशांतचे पण आता सॅंडविच झाले होते. तो मधून मधून केतकीकडे बघून तिला धीर देत होता. पण बोलत काहीच नव्हता.
केतकीला या दुतर्फी निशांतचा मनातून राग येत होता.मनातुन केतकीला या सगळ्याच गोष्टींचा मनातून राग येत होता.
नवीन विचार सरणीच्या केतकीने आज्जीचे बोलणे चांगलेच खटकत होतं.शेवटी केतकीला राहवले नाही ती आजोबांना म्हणाली. आजोबा मला तुमच्याशी बोलायचे आहे.आजोबा म्हणाले,केतकी बेटा इथे नको घरी गेल्यावर बोलूयात.
नको इथेच मला काही गोष्टी ज्या त्या वेळी क्लियर केलेल्या बऱ्या असतात आजोबा केतकी आजोबांना म्हणाली.
निशांत या सर्व गोष्टीवर प्रथम मी तुमचे मत मागते.काय बोलणार केतकी पाहूया
पुढील भागात!..
क्रमश:..
भाग 2
©️®️ सौ. ऊज्वला रवींद्र राहणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा