सांग कधी कळणार तुला भाग ४

Ambition of a new generation

मागच्या भागात आपण पाहिले. केतकीला आज्जींचे बरेच मुद्दे म्हणजेच मागण्या खटकत होत्या.

  निशांत आज्जीचे  मुद्दे खोडू शकत होता. पण तोही शांत. म्हणून तिच्या बाळबोध संस्कारात प्रतिउत्तर बसत नसतानाही तिला ते करणे भाग पडले. म्हणून तीने बरेच मुद्दे खोडले.

 केतकीच्या या बोलण्यामुळे सगळेच अवाक् झाले. निशांतकडील मंडळीच्या चेहऱ्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर तिचे मुद्दे पटल्याची भावना दिसत होती. फक्त आज्जी सोडून.

   आज्जीला राग आल्यासारखे वाटत होतं. तिचाही स्वाभिमान दुखावला. एकदंरीत मुलगी उध्धट आहे ही भावना आज्जीच्या चेहऱ्यावर तरळत होती.

  ती परत बोललीच किती तोलामोलाची स्थळे निशांतसाठी सांगून आलीत पण, निशांतने काय बघितलं हिच्यात फक्त गोरं कातड?

 खरे तर, आज्जीचे बोलणे घरातील कोणालाच पटण्यासारखं नव्हते. पण आज्जी समोर 'ब्र' काढायची कोणाची हिम्मत नव्हती. ता काय निर्णय घ्यावा या विचारात सगळे पडले.

  इकडे केतकीच्या घरच्यांची पण यापेक्षा काही वेगळी अवस्था नव्हती. ऐक आज्जी सोडल्या तर सगळे कसे आलबेल होते.

  सगळी माणसे खुप सज्जन आहेत एकत्र कुटुंबाला बांधून ठेवणारी आहेत. केतकीला अगदी फुलासारखे जपतील. केतकीचे वडील केतकीच्या आईला म्हणाले.

   निशांत तर हिरा आहे हो! खरच आपल्या केतकीच्या तोलामोलाचा.पण सगळे पण आणि परंतुच! शेवटी सगळ्या ऋणानुबंधाची गोष्ट आजोबांनी आईबाबांच्या बोलण्याला दुजोरा दिला.

  आज्जीने मात्र इकडे मला ही मुलगी पसंत नाही. याउप्पर तुमची मर्जी म्हणत, तरातरा आपल्या रूममध्ये निघून गेल्या.निशांत सहित घरातील इतर मंडळी एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत राहिले.

 निशांत  जागेवरून उठला व आज्जीच्या मागे तिच्या रूममध्ये गेला एक शेवटच्या आशेवर तिला समजावण्याचा प्रयत्न केला.पण आज्जी आपल्या मताशी ठाम होती. ती मनवून घेणाऱ्यांतील तर मुळीच नव्हती.

  शेवटी तो आज्जीच्या रूमचे दार खाडकन् बंद करत बाहेर आला आणि म्हणाला,"मी लग्न करेन तर केतकीशी नाहीतर अजन्म ब्रम्हचारी राहिल." 

    अचानक निशांतचे बोलणे ऐकून घरातील सगळे अवाक् झाले.आज्जी पण निशांतचे उद्गार ऐकताच तिरीमिरीत बाहेर आली..
  
  तोपर्यंत निशांत पायात चप्पल अडकवून बाहेर पडला. तो थेट गाडी घेऊन केतकीच्या  दारातच उभा राहिला.

  नुकतेच केतकीच्या घरचे घरी पोंहचलं होते. निशांतला अचानक आलेले पाहून ते ही गडबडले.

    केतकीचा हात पकडत निशांत म्हणाला, केतकी तुझ्या शिवाय मी दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही.तुझ्या विचारांशी मी सहमत आहे. मान्य असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.

  अचानक निशांतचा निर्णय एकूण सगळेच गडबडले.पण मला वेळ हवा आहे  केतकी बोलली. दोघांनाही शांत करत सुरेशने खाली बसवले.

   निशांत हा फार मोठा निर्णय आहे. पोरखेळ नव्हे. थोडा वेळ जाऊ द्या. सगळे वादळ शमेल. आम्ही मोठे आहोतच योग्य निर्णय घेण्यासाठी.

  आता हा विषय थोडा बाजूला ठेवू या! थोडा गरमागरम चहा घेऊ. इतक्यात केतकीची आई चहा घेऊन आली.

  फ्रेश होण्याचे नाटक करत सुरेश आत गेला. त्याने निशांतच्या वडीलांना फोन लावला. झालेला प्रकार कानावर घातला.ते म्हणाले, आम्ही येतो तिकडे. ठीक आहे म्हणत,सुरेशने फोन ठेवला.

 निशांतच्या वडिलांनी घरात चर्चा केली. एकमताने सहमत होऊन निर्णय घेणे आता सगळ्यांच्याच हिताचे होते.

   आज्जीला निशांतच्या काकांनी योग्य बाजू समजून सांगितली. आई आता ही नवीन पिढी आहे. दोघेही भरपूर कमावतात आणि समाजात दोघांनाही सारखीच प्रतिष्ठा आहे. दोघेही मोठ्या पदावर काम करतात. 

  आई आणि मुख्य म्हणजे आपल्या घरचे उदाहरण घे, आपले एकत्र कुटुंब आहे त्यामुळे जाणवत नाही. हि गोष्ट वेगळी. 

  पण प्रत्येकी आमच्या पिढीला एक किंवा दोनच मुले आहेत. हे विसरून चालणार नाही.  म्हणजे पुढची जबाबदारी सर्वस्वी एकट्यावरच पडणार कि नाही?

 आता माझी गोष्ट घे, मला एकच मुलगी ऊद्या ती सासरी गेली, आणि होऊ नये पण, आम्ही सगळे पुढे, मागे विभक्त झालो तर.आमचा म्हातारपणाचा आधार कोण असणार?

  अरे शूभ, शूभ बोल मी जिवंत असेपर्यंत या घराचे तूकडे होऊ देणार नाही आज्जी म्हणाली.

  आई म्हणूनच सांगतो, केतकी सारखीच मुलगी पुढेही या कुटुंबाला बांधून ठेवले. कारण तिचे संस्कार तिच्या बोलण्यातून दिसून येतात.

   केतकीच या घराची सुन होण्यास लायक आहे असे माझे ठाम मत आहे. काकांनी बरोबर आज्जीची योग्य नस दाबली होती. 

  आज्जीलाही आता पटत होते. तिने तिच्या लाडक्या म्हणजेच मधल्या सुनेला निशांतच्या काकूंना हाक मारली.

  शरयू माझ्या कपाटातील तुला माहित आहे ना तो दागिन्यांचा डबा आण बर!शरयू लगबगीने घेऊन आली. त्यातला एक नेकलेस आज्जीने काढून घेतला आणि म्हणाली.

"चला तयार व्हा लवकर आपल्याला देशमुखांन कडे जायचे आहे मानाने केतकीला मागणी घालायला.

मला पटले  हो सगळे.सगळ्यांनी एकसुरात आनंदाने टाळ्या वाजवल्या. आणि निशांतच्या बाबांनी केतकीच्या बाबांना ही बातमी लगेच कळवली. 

   मग काय पुढे सगळेच अलबेल निशांत केतकीचे शुभमंगल झाले.

भाग ४
समाप्त
©️®️ सौ.ऊज्वला रवींद्र राहणे 

🎭 Series Post

View all