"हे बघा आमचे मोठे कुटुंब आहे",घरात कामाचा धबाडगा असणार, पै पाव्हणे येणार, जाणार भरपूर बरका!
तेंव्हा घरकामात कुशल मुलगी हावी. मग कितीही शिकलेली असली तरी! घरदार, पै पाव्हणे सांभाळून तिने नोकरी केली तर काही हरकत नाही.
लग्नाची बोलणी करायला गेलेल्या संजय आणि रघुनाथरावांच्या समोर आज्जीने आपले मत मांडले.
संजय रघुनाथरावांकडे म्हणजेच बाबांना कडे बघतच राहिला.
केतकी संजयची एकुलती एक लेक,रघुनाथरावांची देशमुखांची लाडकी नात.खुप लाडाकोडात वाढलेली.
आईवडिलांच्या शब्दाबाहेर नाही.शिकली पण भरपूर. वयानुरुप लग्नाची झाली. नव्हे तर लग्नाच्या बाजारात उभी राहिली.
आईवडिलांनी कित्येकदा केतकीला विचारले, केतकी कुठे सुत वगैरे जुळवले नाहीस ना? केतकी म्हणाली नाही हो आई बाबा. तुमच्या योग्यतेचा नवरा बघा मी तयार आहे.हे ऐकताच आजोबांनी कौतुकाने नातीच्या पाठीवर थाप मारली.
केतकी आईवडिलांच्या शब्दाबाहेर नाही.शिकली पण भरपूर. वयानुरुप लग्नाची झाली. नव्हे रीतसर केतकीची वधूवरसूचक मंडळात नावनोंदणी झाली.
आज ना उद्या लेक सासरी जाणार म्हणून आईची केतकीला शिकवणी देखील सुरू झाली. केतकी थोडा स्वयंपाक शिकून घे ग बाई. माझी इज्जत निघायची. आई केतकीच्या मागे लागायची. अग सुनबाईं होईल सगळे. अंगावर पडले कि जमेल तिलाही. सासरे नेहमीच नातीची बाजू घ्यायचे.
केतकी म्हणायची ये आई ते स्वयंपाक बियपाक हे काही मी नाही करणार. तू कशाला आहेस तुला माझ्या बरोबर यावे लागणार.ये बाई आजोबा, बाबा यांचे काय?
सुनबाईं आपण घर जावई शोधून या. वर आजोबांची साखर पेरणी. बाबा थोडा अलिप्तच. लेक सासरी जाणार म्हणून तो जास्तीच हळवा व्हायचा. कारण बाप लेकीचं बॉडींग जरा जास्तच घट्ट.
अश्या खेळामेळीच्या मोकळ्या वातावरणात केतकी वाढलेली. पण याचा गैरफायदा तिने कधीच उचलला नाही.
त्यातच निशांतचे स्थळ वधूवरसूचक मधून सुचवले गेले. सगळे गुण जुळले. दोघेही एकमेकांना अनुरूप होतेच. दोनचार भेटीगाठी झाल्या.स्वभावातील कंगोरे समजले. दोघेही अनुरूप होते एकमेकांना.
निशांत एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पोस्टवर लहान वयात उंचभरारी. तर केतकी देखील एका अँडव्हटाईज कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर.सगळे अगदी तोडीसतोड.
दोन्हीही घरच्यांची पसंती झाली. आता देणे घेणे मानपान हे बोलणी बाकी. खरे तर हे सगळे निशांत आणि केतकीच्या मनाविरुद्धच होते.
दोघेही रजिस्टर मॅरेजला प्राधान्य देत होते. आईवडीलही नवीन विचारसरणी नुसार मुलांच्या मनाविरुद्ध नव्हते.
पण कुठेतरी पण होताच. निशांतच्या आज्जीचा घरात वरचष्मा होता.तिच्या पुढे कोणाचे काही चालायचे नाही.
तिन्हीही सुना, मुले तिच्या शब्दाबाहेर नव्हते. त्यामुळे नाईलाजाने लग्नाची बोलणी करायचा घाट होता.
तसे एकदा निशांत आज्जीला म्हणाला. आज्जी आम्ही रजिस्टर लग्न करतो. लग्नाचा खर्च आम्ही एखाद्या समाज कार्याला देणगीच्या स्वरूपात देऊ.
हे काही नाही. लग्न थाटामाटात करायचे.घरचे पहिलेच
लग्न का गुपचूप करायचे.
काय होणार पुढे लग्नाच्या बोलणीचा बेंडबाजा पाहूयात
पुढील भागात!...
क्रमशः -- १
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा