संधी

i Sandhi


कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. नवीन आभाळ मिळाले गवसणी घालण्या मनाला. एक हुरहूर होती कसे असेल कॉलेज लाईफ.


अवनीला विचाराच्या ओघात कधी कॉलेजमध्ये एंट्री झाली कळलेच नाही. गेटवर चार पाच टवाळ पोराचे टोळके दिसले. येताजाता सर्व मुलींवर कॉमेंट्स पास करत होते. मान खाली घालून ती इतर मुलीप्रमाणे आत गेली. पूर्ण दिवस ओळखी करून घेण्यात क्लास व प्राध्यापकाच्या ओळखी करून घेण्यात गेल्या. त्यात तिला दोन मैत्रिणींची भेट झाली. स्वरा आणि प्रिया तिच्याच क्लास मधील. लगेच मैत्री जमली. घरेही आसपास जवळच होती. त्यामुळे घरी जाताना सोबत झाली. कॉलेज सुटले. आजच्या नोट्स लेक्चर्स शिक्षक यांच्यावर चर्चा करत त्या बाहेर पडल्या. परत तेच सकाळचे टोळके मुलींवर अश्लील जोक्स  मारत होते. सगळ्या मुली बिचाऱ्या मान खाली घालून नजर चुकवत पळ काढत होत्या. हळूहळू हे दररोजचे झाले. तेवढा तो रस्ता पार करणे म्हणजे मुलींना  जीवावर यायचे. कॉलेजमध्ये कंप्लेंट करून झाली होती. कॅम्पसबाहेर आम्ही काही करू शकत नाही अशी उडवाउडवची उत्तरे मिळाली.


असेच दिवस जात होते. कॉलेज मध्ये days चालू झाले. ? day, saree day traditional day आणि बरेच day नुसती तरुणाईला पर्वणीच...



रोझ day दिवशी तर त्या तोलक्यातील मुलाने स्वराचा हातच पकडला. जबरदस्तीने तो गुलाब देवू लागला. स्वराने तो फेकून दिला हात सोडवून ती पळत सुटली. ते तिचा पाठलाग करत होते. ते पाहून प्रिया आणि अवनीची भीतीने गाळण उडाली. त्या थर थर कापत होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वरा सोबत बोलणे टाळले. ती बिचारी एकटी घरी जायला निघाली. तिला एकटीला पाहून तर ते जास्तच त्रास देऊ लागले. प्रिया अवनी कशाबशा धापा टाकतच घरी पोहचल्या. संग्राम दादाने तिच्या मोठ्या भावाने तिला त्याचे कारण विचारले. तिने रडत घाबरत सर्व सांगितले.


प्रथम दादा चिडला."स्वराला एकटीला त्यांच्या तावडीत सोडून तुम्ही पळून का आलात? तुम्हाला तिची मदत करायला पाहिजे होती. समाजाच्या अशा दुर्लक्षाने अश्या समाजकंटकांचे धाडस वाढते.


मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अवनी. तुला ज्युडो कराटेचे प्रशिक्षण काय शोभेला दिलेय. स्वतःच्या व गरज पडल्यास दुसऱ्यांच्या मदतीला उपयोगी पडावे म्हणून.. उद्या मी येतोय कॉलेजला.. पण गरज लागली तरच फुडे येईन तू तुझ्या मैत्रिणीचे रक्षण स्वतःच करायचे. तुला दुसरी संधी देतोय मी सक्षम युवती बनण्याची, अन्यायाचा प्रतिकार करण्याची तू मात्र त्या दुष्ट टोळक्यान दुसरी संधी देऊ नकोस आणखी एक निर्भया घडवायची."



दादाच्या शब्दांनी अवनीला बळ आले. तिने स्वराला फोन केला तिला धीर देवून उद्या कॉलेजमध्ये यायला सांगितले. रस्त्यात त्या टोळक्याने वाट अडवताच तिने आपल्या कराटेच्याच भाषेत त्यांची चांगली धुलाई केली. परत वाटेला जाल तर खबरदार म्हणून चांगलीच समज दिली. स्वराला धीर दिला. दादा हे सर्व लांबून पाहत होता. त्याला समाधान वाटत होते. अवनीच्या आत्मविश्वासाला बळकटी देण्यासाठी दुसरी संधी दिल्याबद्दल एक निर्भया होण्यापासून वाचली होती. व स्वसंरक्षणार्थ सबला झाली होती अवनी....